आता रस्त्यावर भटकंती करणार्यावर पोलीसांची करडी नजर विनाकारण फिरणार्यावर होणार कारवाई.


श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  )- वांरवार सांगूनही नागरीक रस्त्यावर फिरताना दिसत आहे आता रस्त्यावर फिरु नका हे सांगण्यासाठी पोलीसांनी रुट मार्चचे नियोजन केले असुन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट हे आपल्या सर्व पोलीसा सहीत रस्त्यावर ठाण मांडून आहे विनाकारण फिरणार्यावर कडक कारवाई  करण्याचा ईशारा पोलीसांच्या वतीने देण्यात आलेला आहे     
रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असुन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट हे स्वतः रस्त्यावर उभे असुन रस्त्याने जाणार्या येणार्यांची कसुन चौकशी केली जात आहे कुणालाही विनाकारण फिरु न देण्याचा चंगच पोलीसांनी बांधला आहे पोलीस अधिकारी प्रत्येकाची कसुन चौकशी करत आहे ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे अशांची देखील  कसुन चौकशी केली जात आहे खरोखर काम आहे की विनाकारण फिरत आहे याची शहनिशा केली जात आहे कुणालाही दुचाकी वरुन शहरात फिरु दिले जाणार नाही विनाकारण फिरणार्या वहानावर देखील  कारवाई  सुरु करण्यात आलेली आहे या माध्यमातुन नागरीकांनी घराबाहेर न पडण्याचे व आपली  व आपल्या कुटुंबाची काळजी आपणच घ्यावी असे अवाहन करण्यात आले आहे        कोरोनाचा फैलाव होवु नये या  करीता शासकीय पातळीवर विविध उपाय योजना केल्या जात असुन पोलीस बांधव आपल्या जिवाची बाजी लावुन नागरीकांना  घरात थांबण्याचे अवाहन करत असताना नागरीक मात्र बिनधास्त भटकंती करताना दिसत आहे काही ठिकाणी  विनाकारण फिरणार्यावर कारवाई देखील झालेली आहे तरी देखील  परिस्थितीचे गांभीर्य फिरणारांना वाटत नाही त्यामुळे आता पोलीसांनी कठोर पाऊल उचलले आहे अति महत्वाचे काम असेल तरच घराबारेहा पडा अन्यथा कारवाईला सामोरा जा असा ईशारा पोलीसांनी दिला आहे चौकाचौकात पोलीस कडक पहारा देत आहे असे असले तरी काही लोक हा विषय गांभिर्याने घेताना दिसत नाही सुरुवातीला पोलीसांनी विनंती करुन पाहीली रस्त्यावर दिसणारी गर्दी कमी होत नसल्याचे पाहुन आता पोलीस आधिकार्यांनीच कारवाईचा बडगा उगारला आहे यातुन तरी नागरीकांनी बोध घ्यावा व घरातच थांबावे असे अवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget