कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन च्या काळात आलेली श्री हनुमान जयंती शिर्डी परिसरात साध्या पद्धतीने
शिर्डी । ।राजकुमार गडकरी।। कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन च्या काळात आलेली श्री हनुमान जयंती शिर्डी परिसरात साध्या पद्धतीने व घराघरात श्री हनुमान चालीसा वाचून साजरी करण्यात आली,व कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांना शक्ती मिळो, अशी श्री हनुमान चरणी प्रार्थना करण्यात आली, देशात सर्वत्र कोराेनाने हाहाकार उडाला असून महाराष्ट्रातही मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, त्यामुळे सर्वत्र लॉक डाऊनआहे, शिर्डी व परिसरातही लॉक डाऊन मुळे सर्व बंद आहे, अशा काळात हनुमान जयंती आज आल्याने येथे दरवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात गर्दी करून व विविध कार्यक्रम घेऊन हनुमान जयंती साजरी न करता श्री साई सेवा समितीच्या वतीने रावसाहेब एखंडे, रवी कापसे,यांनी करण्यात आलेल्या आवाहनानुसार सावळीविहीर येथे अनेकांनी आप आपल्या घरातच राहून श्री हनुमान चालीसाचे वाचन करत श्री हनुमान जयंती साजरी केली, व श्री हनुमान चरणी ,कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आम्हाला शक्ती मिळू दे ।अशी मनोमन प्रार्थना करण्यात आली, तसेच सावळीविहीर येथील श्री हनुमान मंदिरात सौ बेबीताई सोनवणे, मनोज बिडवे, पत्रकार राजेंद्र गडकरी, सौ, वैशाली जपे ,यांनी लॉक डाऊन चे नियम व दक्षता पाळत मंदिरात पाळणा बांधून त्यात श्री हनुमानाची प्रतिमा ठेवून आज सूर्यदया च्या वेळेस हनुमान जन्मोत्सव प्रथा व परंपरेने परंतु गर्दी न करता मोजक्या दोन-तीन लोकांच्या उपस्थितीत साजरा केला, हनुमान जयंतीनिमित्त श्री हनुमान मंदिरा ला आंब्याच्या पानाचे तोरण व पुष्पहार माळा लावण्यात आल्या होत्या, यावेळी कोणत्याही आकर्षक विद्युत रोषणाई व दरवर्षाप्रमाणे मोठी सजावट करण्यात आली नव्हती, साध्या पद्धतीने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला, शिर्डीत श्री हनुमान जयंती निमित्त श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिरात गर्दी न करता साध्या पद्धतीने जन्मोत्सव साजरा करण्यात आला, दरवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रम यावर्षी लॉक डाऊनमुळे करण्यात आले नाहीत,तसेच शिर्डी परिसरातील निमगाव ,निघोज, रुई ,कोहकी, पिंपळवाडी, नांदुर्खी अशा प्रत्येक गावात साध्या पद्धतीने श्री हनुमान जयंती यावर्षी साजरी करण्यात आली.