शिर्डी ।जितेश लोकचंदानी। ।।।निवासी संपादक।
सध्या कोरोना चा मुकाबला करण्यासाठी देशभर लॉक डाऊनलोड आहे, शिर्डीत सर्वत्र बंद आहे, अशा परिस्थितीत कोरोना चा संसर्ग होऊ नये किंवा या आजाराला बळी पडू नये म्हणून शिर्डीकर घराघरात बसून आहेत, अशा शिर्डी करांना मात्र नगरपंचायतकडून सध्या दूषित पाणीपुरवठा होतआहे, आजच सकाळी नगरपंचायतीने केलेल्या पाणीपुरवठा मध्ये काही वार्डातील अनेक कुटुंबांना कचरा व आळ्या आल्याने या नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त होत आहे, यापुढे असे होऊ नये अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे शिर्डी अध्यक्ष समीर वीर यांनी केली असून जर नगरपंचायतने यामध्ये त्वरित सुधारणा व दखल घेतली नाही व शुद्ध पाणीपुरवठा केला नाही तर नगरपंचायत समोर अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला असून राहता तहसीलदार, पोलीस निरीक्षक शिर्डी व शिर्डी नगरपंचायतला त्यांनी तसे निवेदन पाठवले आहे,
शिर्डी हे आंतराष्ट्रीय तीर्थस्थान आहे, येथे शिर्डी नगर पंचायतीने लाखो रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना यापूर्वीच राबवलेली आहे, शिर्डीकरांसाठी स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा मिळावा म्हणून लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे, असे असताना व सध्या कोरोना मुळे लोक कामधंदा,व सर्व काही सोडून घरात आहेत , कोरोना चे संकट मोठे आहे, मात्र अशा संकट समयी सुद्धा शिर्डी नगर पंचायतीने आरोग्याच्या दृष्टीने अधिक लक्ष देणे गरजेचे असताना येथे मात्र सध्या दूषित पाणीपुरवठा होत आहे, त्यामुळे नागरिका कडून नगरपंचायत विरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे,
आज पहाटे येथील काही वार्डात शिर्डी नगरपंचायत ने पाणीपुरवठा केला, मात्र नळाला आलेल्या या पिण्याच्या पाण्यामधून कचरा व आळ्या सुद्धा आल्या, पिण्यासाठी नागरिकांना हे अशुद्ध, दूषित पाणी विविध आजारांना कारण ठरू शकते, सध्या देशात, राज्यात कोरोनाने हाहाकार माजला आहे, अशात येथे दूषित पाणी जर पिण्यासाठी नळाद्वारे घराघरात आले, व हे पाणी पिण्यासाठी वापरले गेले, तर मोठी आरोग्याची समस्या येथे निर्माण होणार आहे, शिर्डी नगरपंचायत पाणीपुरवठा साठी लाखो रूपये खर्च करते, स्वच्छतेच्या बाबतीत शिर्डीला देशात तिसरे व राज्यात दुसरे बक्षीस मिळाले आहे, असे असतानासुद्धा असा अशुद्ध व दूषित पाणी पुरवठा नागरिकांना नळाद्वारे होत असेल व या दूषित पाण्यामुळे जर शिर्डीतील नागरिक विविध आजारांना बळी पडले तर कोरोनाच्या या संकटकाळात सर्वांना ते मोठे धोकादायक व मोठे आपत्ती जनक परिस्थिती निर्माण करणारे ठरणार आहे ,याकडे शिर्डी नगरपंचायतने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे, सध्या लोक कामा धंदा विना घरात बसून आहेत, पैशाची अडचण आहे, खाण्यापिण्याची ही मोठी अडचण आहे, शिर्डीत अनेक लोक गरीब आहेत, कोरोनामुळे सर्व शिर्डी करांच्या आरोग्याची दक्षता, काळजी व खबरदारी घेण्याचे काम नगरपंचायतीचे असतानाही अशा अशावेळी ही येथील लोकांना असा दूषित पाणीपुरवठा केला गेला व ते आजारी पडले तर त्याला जबाबदार कोण ।।असा प्रश्न काही वॉर्डातून नगरपंचायतला विचारला जात असून शिर्डी नगरपंचायत पदाधिकारी, अधिकारी यांनी त्वरित याकडे लक्ष द्यावे, अन्यथा नगरपंचायत समोर परवापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले जाईल व याला जबाबदार शिर्डी नगरपंचायत राहील, असा इशारा भारतीय लहुजी सेनेचे शिर्डी अध्यक्ष समीर वीर यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे व त्यांनी हे निवेदन राहता तहसीलदार शिर्डी पोलीस स्टेशन व नगरपंचायत ला पाठवले आहे.
Post a Comment