शिर्डी तीर्थक्षेत्राच्या शहरात व परिसरात सध्या अवैद्य धंदे यांन मोठा जोर,,जिल्हा पोलीस अधीक्षक अखीलेश कुमार सिंह यांच्याकडून शिर्डीकर व साई भक्तांना अपेक्षा
शिर्डी - निवासी संपादक। जितेश लोक चंदानी।। श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून अशा देशातील प्रसिद्ध असणाऱ्या या शिर्डी तीर्थक्षेत्राच्या शहरात व परिसरात सध्या अवैद्य धंदे यांनी मोठा जोर पकडला आहे, सध्या कोरोना मुळे सर्वत्र लॉक डाऊनआहे, त्यामुळे सर्व अधिकृत दारूधंदे बंद असताना शिर्डी व परिसरात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनधिकृत दारूधंदे मात्र जोरात सुरू आहे, जर लॉकडाऊन च्या काळात अशी परिस्थिती जिल्ह्यात असेल तर मग इतर वेळी कशी परिस्थिती असणार ।याची साधी कल्पनाही करवत नाही, त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याला नवीन आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक अखीलेश कुमार सिंह यांच्यापुढे या अवैध धंद्यांना आळा घालण्याचे मोठे आव्हान आहे.
अखिलेश कुमार हे मुंबई येथे पोलीस उपायुक्त होते, ते आयपीएस असून एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे ते नक्कीच या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन जिल्ह्यात तसेच प्रसिद्ध अशा शिर्डी व परिसरात असणारे अवैद्य धंदे यांना आळा
घालतील व लवकर या अवैध धंदे यांचा बंदोबस्त करतील ,अशी शिर्डीकर व साई भक्तांना अपेक्षा आहे,
। अहमदनगर जिल्हा राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा असा जिल्हा आहे ,राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात हा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे, मात्र तसा तो अवैध धंद्यातही आघाडीवर चालला आहे ,येथे वाळू तस्करी ,अवैध दारू ,मटका, जुगार ,चोऱ्या ,मोठ्या प्रमाणात होत असतात व सारख्या सुरू आहेत ,सध्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक ईशू सिंधू हे लंडनला गेल्यामुळे येथे प्रभारी पोलीस अधीक्षक पाटील साहेब होते, त्यांनी आपल्या परीने या अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला, आता तर कर्तव्यदक्ष असे आयपीएस असणारे व मुंबईला चोख कर्तव्य बजावणारे प्रसिद्ध असे अखिलेश कुमार सिंह हे अहमदनगर जिल्ह्याला पोलीस अधीक्षक म्हणून लाभले आहेत, त्यामुळे जिल्ह्यावासियांना त्यांच्याकडून अधिक अपेक्षा वाढली आहे ,जिल्ह्याप्रमाणे शिर्डी व परिसरात सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन असल्याने सर्व बंद आहे ,अत्यावश्यक सेवा सोडता सर्व काही ठप्प आहे, सर्व अधिकृत परमिट रूम ,वाईन्स देशी दारू दुकाने बंद आहेत ,मात्र अनधिकृत दारू अड्डे मात्र सर्रास खेडोपाडी व शहरात गल्लोगल्ली चुपचाप पणे सुरु असून दामदुप्पट किमतीला दारू विक्री होत आहे ,लॉक डाऊन काळात संचारबंदी असतानाही जर असे घडत असेल तर संचारबंदी नसताना ,इतर वेळी या अवैध धंद्यांना मोठा ऊत येतो ,अवैध धंद्यातून मोठी कमाई करायची व गुंडगिरी करायची असा प्रकार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे, जिल्हा प्रमाणेच शिर्डी व परिसरात अवैध दारू, मटका, जुगार ,पाकीटमारी ,चोऱ्या तसेच मोटरसायकल चोरी, सोनसाखळ्या ओरबाडणे, रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या मालवाहतुक वाहने आडवून लुटणे ,असे प्रकार सुरू असतात, लॉकडाऊन काळात याला थोडा पायबंद बसला असला तरी कालच रात्री राहता शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असणारे देशी दारूचे दुकान रात्री चोरट्यांनी फोडले, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे स्वागत या चोरीने चोरट्यांनी केले आहे की काय असा प्रश्न नागरिकांना पडत आहे, त्यामुळे कर्तव्यदक्ष असणारे व नव्याने जिल्ह्याला मिळालेले पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी या जिल्ह्यात विशेषत शिर्डी व परिसरात विशेष लक्ष घालून येथील अवैध धंदे दारू ,मटका, जुगार, पाकीटमारी ,चैंनस्नेकींग,माल ट्रक लुटणे, चोऱ्या,अश्या प्रकारांना आळा घालावा व अवैध धंदे करणारे व त्यांना सपोर्ट करणारे यांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी जिल्ह्यासह शिर्डी कर व साई भक्तांन मधून होत आहे.