राहाता पोलिसांच्या मदतीला शिघ्रकृती दलाची गाडी दाखल झाल्याने अनेकांनी त्याचा घेतला धसका अनेक रस्ते बॅरिगेट लावून बंद केल्याने प्रथमच शहराचे रस्ते निर्मनुष्य.

राहाता (तालुका प्रतिनिधी)  राहाता शहरात मोकाट हिंडणार्‍या टोळक्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राहाता पोलिसांच्या मदतीला शिघ्रकृती दलाची गाडी दाखल झाल्याने अनेकांनी त्याचा धसका घेतला आहे. तर पालिकेने शहरातील अनेक रस्ते बॅरिगेट लावून बंद केल्याने प्रथमच शहराचे रस्ते निर्मनुष्य दिसून आले.सर्वत्र लॉकडाऊन केले असताना राहाता शहरातील नागरीक मोठ्या संख्येने रस्त्यावर दिसत होते. पोलिसांना पाहून रस्ते बदलत होते. विना कामाचे टोळके मनसोक्त फिरताना दिसत होते. अपुर्‍या संख्याबळामुळे पोलिसांवरही मोठा ताण पडत होता. सदर बाब उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांना कळताच त्यांनी शनिवारी शिर्डी येथे कार्यरत असलेली शिघ्र कृती दलाची गाडीच शहरात तैनात करताच अनेकांना त्यांचा प्रसाद मिळाल्याने मोकाट फिरणार्‍यांनी घरचा रस्ता धरला. या तुकडीबरोबर पोलीस निरीक्षक सुभाष भोये, व सहा. पोलीस निरीक्षक श्री. कंडारे हे स्वतः गस्तीवर आहेत.मोकाट व बिगर कामाचे फिरणार्‍यांना आळा घालण्यासाठी राहाता पालिकेनेही कंबर कसली असून शहरातील कोपरगाव नाका ते शनी चौक रस्ता, पिंपळस रस्ता, शिवाजी चौकातील चितळी रस्त्याची एक बाजू, राबियानगर रस्ता तसेच बाजारतळ ते साकुरी रस्ता हे प्रमुख वर्दळीचे रस्ते पालिकेने बॅरिगेट लावून काही दिवसांसाठी बंद करण्यात आले. यामुळे गर्दी कमी होणार आहे.किराणा दुकानदारही सहकार्यासाठी पुढे आले असून किराणाच्या नावाखाली नागरीक रस्त्यावर येत होते. किराणा संघटनेने सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आणखी मदत झाली.त्याचप्रमाणे सर्वच परीसरात भाजी विक्रेत्यांचे जथ्थेच्या जथ्थे दिसून येतात. त्यांनाही पालिकेने विशिष्ट वेळ द्यावी. तेही दिवसाआड दिल्यास रोज भाजी खरेदी करायला येणार्‍यांवर आळा बसून लॉकडाऊनला मदत होईल.
लॉकडाऊनबाबत तहसीलदार, गटविकास अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी एकत्र येऊन तालुक्यात कडक लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला. स्वतः तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, व पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी दोन तास राहाता शहरातील मुख्य रस्त्यावर थांबून त्यांनी परिस्थीती जाणून घेत कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. 
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget