Latest Post

निवासी संपादक जितेश लोकचंदानी     सोलापूर : संचारबंदीच्या काळात कारवाई न करण्यासाठी पैशाची मागणी केल्याप्रकरणी सोलापुरातील एका पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोलापुरातील औद्योगिक पोलीस चौकीत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे सोलापूरतल्या अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने देखील बंद करून घरात बसावे, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार संपूर्ण सोलापूरमध्ये बंद पाळण्यात आला. परंतु विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई न करण्यासाठी संबंधीत पोलीस अधिकाऱ्याने पैशाची मागणी केली होती. ही घटना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यापर्यत पोहोचली. त्यावरून पोलीस आयुक्तांनी त्याबाबत चौकशी केली आणि तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. आता सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे यांना नियंत्रण कक्षात बसवल्याची माहिती मिळते आहे

बेलापूर  (प्रतिनिधी  )-शासनाच्या सुचने नुसार   जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानातुन तीन महीन्याचे धान्य उपलब्ध करुन देण्यात येणार वाटपात कसुर करणार्यावर कायदेशीर कारवाई  केली जाईल असा ईशारा जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिला आहे                      या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात जिल्हा पुरवठा अधिकारी माळी यांनी पुढे म्हटले आहे की जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानदारांना एप्रिल  मे जुन असे  तीन महीन्याचे धान्य  वाटप करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत सर्व प्रथम अत्यंत गरजु मोल मजुरी करणारे हातावर पोट भरणारे या सर्वांना पहील्या टप्प्यात प्राधान्याने धान्य द्यावयाचे असुन दुसर्या टप्प्यात गरजु उत्पन्नाचे मर्यादित साधने असणारे कार्डधारक यांना वाटप करावयाचे आहे त्या नंतर राहीलेल्या कार्डधारकांना वाटप करावयाचे असुन कुणीही धान्यापासुन वंचित राहु नये याची काळजी दुकानदाराने घ्यावयाची आहे काम चुकारपणा करणार्या तसेच धान्य वाटपात कसुर करणार्या  दुकानदारावर कठोर कारवाई केली जाईल कार्डधारकांनी एकाच वेळेस दुकानावर गर्दी करु नये कुणाच्या वाटपा बाबत तक्रारी असल्यास पुरवठा निरीक्षक  तहसीलदार यांच्याशी संपर्क  साधावा असेही अवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी माळी यांनी केले आहे.

कोरोना विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी बाहेरून आलेल्या नागरिकास घरातच बंदिस्त ठेवण्यासाठी आवश्यक असलेला “होम कोरोंटाईनचा” शिक्का मारणे व मास्क लावण्यास सांगण्यास गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना कल्याण येथे नोकरीस असलेले मात्र कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे ग्रामपंचायत हद्दीतील कायम निवासी असलेले आरोपी लक्ष्मीकांत कारभारी विघे व त्यांचे दोन मुले सौमित्र लक्ष्मीकांत विघे,सौरभ लक्ष्मीकांत विघे यांनी धक्काबुक्की केल्याचा गुन्हा कोपरगाव महसूल विभागाचे कर्मचारी रवींद्र नारायण देशमुख यांनी दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली होति ह्या आरोपींना कोपरगाव येथे हजर कोर्टात समोर हजर केले असता 1दिवसाची पोलिस कोठडी सुणवण्यात आली.

शिर्डी,प्रतिनिधि  राजकुमार गडकरी दि.30- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष या नात्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अन्वये आदेश पारित केले असून त्याची जिल्हात अंमलबजावणी करण्यात येत आहे. शिर्डी नगर पंचायत हद्दीतील स्थलांतरीत कामगार व बेघर व्यक्ती यांना अन्नदान व अन्न पाकिटांचे वाटप करण्यात येत आहे. अशाप्रकारच्या सार्वजनिक उपक्रमांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊन उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे आवश्यक आहे.
            यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, शिर्डी भाग ,शिर्डी श्री.गोविंद शिंदे यांनी, साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीतील तरतूदीनुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार  व आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 चे कलम 30 अन्वये लॉकडाऊन या उपाययोजनेमुळे शिर्डी शहर आणि पंचक्रोषी परिसरात अडकलेल्या, स्थलांतरीत कामगार व बेघर व्यक्ती यांना अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय देखभाल पुरविणे आवश्यक असल्यामुळे निघोज ता.राहाता येथील साई पालखी निवारा या संस्थेचे दोन हॉल 30 मार्च,2020 पासून पुढील आदेशापर्यत अधिग्रहीत केले आहेत. सर्व संबधितांनी याची नोंद घ्यावी असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी व सर्व प्रशासकीय यंत्रणा जनतेच्या भल्यासाठी नागरिकांनी घरातच रहावे कोणीही बाहेर विनाकारण येऊ नये प्रशासनास सहकार्य करा आपली सुरक्षा परिवाराची सुरक्षा -श्रीहरी बहिरट पो . निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन 


बुलढाणा - 29 मार्च
देश ही नही पूरे विश्व मे कोरोना वायरस की दहशत फैली हुई है.इस वायरस का संसर्ग ना हो इस लिए देशभर को लॉकडाउन कर दिया गया है ऐसे में जीवनावश्यक वस्तु छोड़कर सभी दुकाने एंव कारोबार बंद रखने के कडे निर्देश होने के बाद भी टायर पंक्चर की 2 दुकाने खुली रखनेवाले 2 लोगों पर रापयुर थाने में आज 29 मार्च को अपराध दर्ज कर दोनों को गिरफ्तार किया गया है.
    बुलढाणा तहसिल अंतर्गत के ग्राम पिंपलगांव सराय में आज दोपहर के समय रायपुर पुलिस थाने की टीम पीएसआई योगेंद्र मोरे,पुलिस कर्मी विजय हुडेकर, सुरेश मोरे,अमोल गवई आदि गश्त पर थे कि उन्हें ग्राम पिंपलगांव सराय में दोपहर 4 बजे के समय शासन के आदेश का उल्लंघन कर 2 टायर पंक्चर की दुकानें खुली नज़र दोनों दुकान चालकों को पकड़कर रायपुर थाने में लाया गया जहां पीएसआई योगेंद्र मोरे की शिकायत पर आरोपी दुकान चालक संजय भीमराव चौहान (45) व रमेश भीमराव चौहान (40) के खिलाफ धारा 188,269 के तहत अपराध दर्ज कर लिया गया है.आगे की जांच बिटजमादार यशवंत तायडे कर रहे है.

अहमदनगर, दि. २९ - जिल्ह्यात आज आणखी दोन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे पुण्याच्या एनआयव्हीने दिलेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. या व्यक्ती परदेशी नागरिक असून त्यातील एक फ्रान्स तर दुसरी व्यक्ती आयव्हरी कोस्ट येथील आहे. या व्यक्तीसोबत असणार्‍या इतर व्यक्तींनाही ताब्यात घेतले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध आता पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने सुरु केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांनी स्वताहून जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांची तपासणी करुन घ्यावी, तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाणे टाळावे.स्वताच्या आणि समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, या व्यक्ती थांबलेल्या परिसराला सील करण्याचे आणि हा परिसर औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
या दोन व्यक्तीसह १४ जणांचा ग्रुप मॉरिशस येथून दिल्ली येथे आला होता. त्यानंतर हा ग्रुप २ आठवडे दिल्ली येथे थांबला. या कालावधीत त्यांनी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि पुन्हा दिल्ली असा प्रवासही केला. विविध ठिकाणांना भेटी दिल्या. दिनांक १४ मार्च रोजी रेल्वेने हे सर्वजण नगर येथे आले. ते शहरातील मुकुंदनगर भागात राहिले. दुसर्‍या दिवशी ते जामखेडला रवाना झाले. तेथे ते २६ मार्चपर्यंत होते. मात्र या व्यक्ती तेथे राहत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलीस, महसूल प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करुन या १४ जणांना ताब्यात घेत थेट जिल्हा रुग्णालयात पाठवले. काल या १४ जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडून एनआयव्हीकडे पाठविण्यात आले. त्यापैकी ५ स्त्राव नमुन्यांचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यातील या दोन व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले. इतर तीन जणांचा अहवाल निगेटीव आला असून उर्वरित ०९ अहवाल अद्याप येणे बाकी आहे. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून बाधित दोन रुग्णांना बूथ ह़ॉस्पिटलमधील आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात पाठवले जाणार आहे.
यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या पाच झाली असली तरी एका रुग्णाचा १४ दिवसांनंतरचा अहवाल निगेटीव आल्याने त्याला घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे आयसोलेशनमध्ये सध्या ०४ जणांना ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, आता आज कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची माहिती जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणेकडून काढली जात आहे. मुकुंदनगर आणि जामखेड या भागात ज्याठिकाणी या व्यक्ती राहिल्या, तेथे त्यांना अनेकजण भेटल्याची शक्यता गृहित धरुन प्रशासनाने माहिती घेणे सुरु केले आहे. मुकुंदनगर परिसर आता सील करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरु केली आहे. तसेच, मुकुंदनगर आणि जामखेड येथील ज्या व्यक्ती या बाधित नागरिकांच्या संपर्कात आल्या, त्यांनी स्वताहून पुढे येऊन त्यांची आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणचा संपर्क टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी केले आहे. प्रशासनातील सर्व यंत्रणा या जिल्ह्याचे आरोग्य व्यवस्थित राहावे, यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना नागरिकांनी साथ दिली पाहिजे. जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget