Latest Post

अहमदनगर(प्रतिनिधी )भोजडे ता.कोपरगाव येथील सुरेश शामराव गिरे व रवि आप्पसाहेब शेटे व त्याचे टोळीतील साथीदारांसोबत
सुरेश गिरे हे रवि शेटे यांचे पुर्व वैमनस्य होते. सदर वैमनस्यातुनच वारंवार भांडणे होवुन त्यांचे एकमेकांविरुद्ध कोपरगाव
तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत. त्यातुनच सन-२०१२ मध्ये रवि शेटे व त्याचे साथीदारांनी सुरेश गिरे यांचा
मित्र बंटी ऊर्फ विरेश पुंजाहरी शिनगर यांचा खुन केला होता. सदर गुन्ह्यामध्ये रवि शेटे व त्याचे इतर साथीदारांना जन्म
ठेपेची शिक्षा झालेली आहे.दिनांक.१५/०३/२०२० रोजी सायंकाळी ०६:४५ वाजेचे सुमारास भोजडे ता.कोपरगाव जि.अहमदनगर येथे सुरेश शामराव गिरे हे त्यांचे राहते घरी भोजडे शिवारातील त्यांचे कुटूंबासह बसलेले असताना एक पांढरे रंगाची स्विफ्ट कार व एक काळे रंगाची पल्सर मोटारसायकल अशा गाड्या त्यांच्या घरासमोर येवुन थांबल्या. स्विफ्ट कार मधुन ४ लोक व पल्सर मोटारसायकलवर १) रवि आप्पासाहेब शेटे २) विजु खर्डे व अनोळखी इसमांनी येवुन सुरेश गिरे यांचे दिशेने पिस्तुल मधुन अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केल्याने सुरेश गिरे हे जिव वाचविण्यासाठी घराचे पाठीमागे पळु लागल्याने रवि शेटे, विजु खर्डे व त्यांचे सोबतचे अनोळखी साथीदार मारेकऱ्यांनी सुरेश गिरे यांचा पाठलाग करुन त्यांचेवर गावठी कट्याने गोळीबार करुन, हातातील कोयत्याने तोंडावर व शरीरावर इतर ठिकाणी गंभीर वार करुन सुरेश गिरे यांना जिवे ठार मारुन त्यांचा निघुन खुन करुन मारेकऱ्यांनी आणलेल्या वाहनांवर निघुन गेले वगैरे मजकुराची फिर्याद फिर्यादी श्री.शामराव भिमराव गिरे रा.भोजडे ता.कोपरगाव यांनी दिलेल्या फियादीरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे
गु.र.नं। ८८/२०२० भा.दं.वि.कलम.३०२, ४४२, १४३, १४७, १४८, १४९ सह आर्म अॅक्ट ३/२५, ४/२५, ७/२५, २७
प्रमाणे दिनांक.१६/०३/२०२० रोजी ०४:४३ वाजता दाखल करणेत आलेला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.प्रभारी पोलीस अधीक्षक श्री.सागर पाटील सोा. अहमदनगर यांचे आदेशाने
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.दिलीप पवार सो. यांचेकडे वर्ग करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक श्री. दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी
मिळाली की, सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी रवि आप्पासाहेब शेटे याने सुमारे १५ दिवसांपासुन गुन्ह्याचा नियोजनबद्ध कट करुन तळेगाव जि.पुणे येथुन भाडोत्री मारेकरी आणुन गुन्हा केलेला आहे. त्याअनुशंगाने गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास करत असताना रवि शेटे व विजु खर्डे याचे सोबत असलेले अनोळखी मारेकरी व इतर आरोपी नामे १) नितीन सुधाकर अवचिते राहणार-तळेगाव स्टेशन, वाघेला पार्क, लाख्ने वस्ती शेजारी, खांडगे कॉलनी समोर, भारत पेट्रोलपंप मागे,ता-मावळ, जि-पुणे २) शरद मुरलीधर साळवे रा.काळेवाडी फाटा, पिंप्री चिंचवड ता.हवेली जि.पुणे मुळ रा. घर.नं ३४५,गारख्नेडा परिसर, इंदीरानगर, ता.जि.औरंगाबाद ३) रामदास माधव बलटे रा.लौकी पोस्ट दहेगाव बोलका ता.कोपरगाव जि.अहमदनगर ४) आकाश मोहन गिरी रा.खराबवाडी, संजिवनी हॉस्पिटल समोर, चाकण ता.खेड जि.पुणे यांना सदर गुन्ह्यात विवीध ठिकाणी सापळा लावुन शिताफीने नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असुन त्यांनी सदर गुन्हा केल्याची
कबुली दिली आहे.गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी नामे नितीन सुधाकर अवचिते रा.तळेगाव जि.पुणे हा सहाईत गुन्हेगार असुन त्याचे विरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) तळेगाव दाभाडे पो स्टे जि.पुणे गु.र.नं २०४/२०१६ भा.दं.वि.३०२, १४३, १४७, १४८, १२०(ब), २०१
२) तळेगाव दाभाडे पो स्टे जि.पुणे गु.र.नं ७६/२००८ भा.दं.वि.३४१, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४
३) वडगाव मावळ पो स्टे जि.पुणे गु.र.नं २४/२०१८ भा.ह.का.३/२७
४) वाकड पो स्टे जि.पुणे गु.र.नं ५६१/२०१८ भा.ह.का.४/२५
५) दत्तवाडी पो स्टे जि.पुणे गु.र.नं ३०६३/२०१५ म.पो.अधि.३७(१),७, १३५
६) येरवडा पो स्टे जि.पुणे गु.र.नं ५८६/२०१७ म.पो.अधि.३७(१),३, १३५
गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी नामे शरद मुरलीधर साळवे रा.काळेवाडी फाटा, पिंप्री चिंचवड ता.हवेली जि.पुणे मुळ.रा. घर.नं ३४५, गारखेडा परिसर, इंदीरानगर, ता.जि.औरंगाबाद हा सहाईत गुन्हेगार असुन त्याचे विरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. 
१) चाकण पो स्टे जि.पुणे गु.र.नं.६२२/२०१९ भा.दं.वि.३४१, ३२३, ४२७, १२०(ब), ३४
२) जी.आर.पी पो स्टे जि.पुणे गु.र.नं २५/२०१६ भा.दं.वि.३७६
३) चाकण पो स्टे जि.पुणे गु.र.नं ३४२/२०१९ म.पो.अधि.३७, १३५
सदरची कारवाई ही मा.प्रभारी पोलीस अधीक्षक, अहमदनगर श्री.सागर पाटील सो, अपर पोलीस
अधीक्षक, श्रीरामपुर श्रीमती.दिपाली काळे मॅडम, उप विभागीय पोलीस अधिकारी शिर्डी श्री.सोमनाथ
वाकचौरे सोा. यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्री.दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा
अहमदनगर, पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके कोपरगाव तालुका पो स्टे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे
सपोनि-संदिप पाटील, सपोनि-शिशीरकुमार देशमुख, पो उपनिरी- गणेश इंगळे कर्मचारी सफौ- नानेकर,
गाजरे, पोहेकॉ- मुळीक, गोसावी, वेठेकर, गव्हाणे, पोना-कर्डीले, सोनटक्के, शिंदे, चौधरी, लोढे, दळवी, पोकॉ-
सातपुते, वाघ, ढाकणे, धनेधर, मासाळकर, बर्डे, मिसाळ, सोळंके, ससाणे, घोडके, माळी, जाधव, पवार, वाबळे,
कोल्हे, गायकवाड, चालक- भोपळे, बेरड, कोतकर, बुधवंत, कोळेकर, काळे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री.दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर हे करत आहेत.

सावळीविहीर प्रतिनिधी
   राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे गुरुवारचा आठवडे बाजार जिल्हाधिकारी यांचा प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही रुई  रोड येथे भरला गेला,
 या  बाजाराकडे येथील शासकीय अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले, संपूर्ण राज्य, देश कोरोनो व्हायरसमुळे शांततेत असताना येथे मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले,
   । कोरनो व्हायरसमुळे जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी जमावबंदीचे आदेश संपूर्ण जिल्ह्यात लागू केलेले असताना व जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले असताना राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे मात्र आज गुरुवारचा आठवडे बाजार जागा बदलून रुई रोड येथे भरला गेला या बाजारात अनेक व्यापारी शेतकरी किराणा दुकानदार भेळे वाले, भाजीपाला वाले, मोठ्या प्रमाणात आल्याने आसपासच्या गावातील लोकही खरेदी करण्यासाठी येथे येऊन मोठी गर्दी करण्यात आली असे असतानाही शासकीय कर्मचारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत होते रस्त्यावर बाजार भरल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता
  या भरलेल्या आठवडे बाजारात अनेक बाजार विक्रेते व भाजीपाला व इतर सामान खरेदी करणाऱ्या लोकांनीही महिलांनी ही दक्षता म्हणून कोणतीही काळजी घेताना दिसत नव्हते दुपारी या बाजारात आणखी गर्दी वाढत होती तरी प्रशासन मात्र होते,जमाव बंदी आदेशाचे उल्नघन,
सावलीविहिर येथिल शासकीय अधिकारी यांच्यावर  कर्तव्यात कसूर केल्यामुळे ,मा जिल्हा अधिकारी यांनी कारवाही करावी अशी मागणी जनतेतून होत आहे
सगळीकडे कोरोना चा प्रसार होत असताना खबरदारी म्हणून  जमाव बंदी चा आदेश असतांना  सावळीविहीर येथे गुरुवारचा आठवडे बाजार
 सुरूच ,प्रशासनाचे ही गोस्ट गांभीर्याने घेतली नाही, जर या जमावातील बाजारात कोणाला कोरोनाचा रुग्ण असेल तर त्या पासून अनेक रुग्ण तयार होतील
याला जबाबदार कोण, आशा या नाजूक घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधीकारी यांच्यावर कारवाही करून त्याची बदली करावी अशी मागणी परिसरात जोर धरून आहे

बुलडाणा - 17 मार्च
वैद्यकिय क्षेत्रातील शिक्षणासाठी फिलीपीन्स येथील अमा विद्यापिठात भारतातुन शिकायला
जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यात बुलडाणा जिल्ह्यातील 13 विद्यार्थांचाही समावेश असून या विद्यार्थांना स्वदेशी आणण्यासाठी योग्य ती ठोस पाऊले उचलण्यात यावीत अशी आग्रही मागणी केंद्रिय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी भारत सरकारचे विदेश मंत्री श्री.सुब्रमण्यम जयशंकरजी यांच्याकडे आज केली आहे.
        विद्यमान परिस्थीतीत करोना विषाणु वेगाने फैलत आहे. त्यामुळे 17 मार्चला यात्रा प्रतिबंधित आदेश भारत सरकारने लागु केला आहे. या आदेशान्वये परदेशातुन येणाऱ्यांना रोखण्यात आले आहे. सोबतच पर्यटनही थांबविले आहे. फिलीपीन्स मध्ये बुलडाणा जिल्हयातील सुमारे 13 जण वैद्यकिय उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत.करोनाच्या चिंतेमुळे हे विद्यार्थी घराकडे स्वदेशी यावेत अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांकडुन केली जात आहे. सद्या त्या राष्ट्रातील नियमानुसार माहिती शिवाय विद्यार्थांना परत आणण्यावर निर्बंध आहे. विना परवानगी ते विद्यार्थी परत आले तर त्यांचे पारपत्र (पास पोर्ट) आणि त्यांचा शिक्षण प्रवेशही रद्द केला जाऊ शकतो. तसेच त्यांना पुन्हा देशात प्रवेश मिळणे अथवा शिक्षण प्रवेश मिळणे थांबविले जाणार आहे. यातील अनेक विद्यार्थांसमोरील मोठे संकट म्हणजे त्याचा व्हिजा सुध्दा संपला असुन त्यांनी नविन व्हिजा मिळण्यासाठी संबधित कॉलेज आणि संस्थेच्या अनुमतीने अर्ज दाखल केला आहे. मात्र करोनाच्या संक्रमणाच्या पार्श्वभुमिवर या संबधी काही निबंध लादले असुन व्हिजा मिळायला आडकाठी झाली आहे. बुलडाणा जिल्हयातील सुमारे 13 विद्यार्थी यांच्या नातेवाईंकाची मागणी असुन या विद्यार्थांना स्वदेशात आणण्यासाठी ठोस योग्य निर्णय घेतल्या जावा अशी मागणी भारत सरकार चे विदेश मंत्री श्री.सुब्रमण्यम जयशंकरजी यांच्याकडे केंद्रिय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खा.प्रतापराव जाधव यांनी केली आहे. सोबत सदर विद्यार्थांची माहीती सुध्दा दिली आहे.

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)शहरातील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौका समोरील मोरे कॉम्पलेक्स मधील प्रवीण कोठारी यांच्या मालकीच्या असलेल्या कोठारी सेल्स एजन्सीमध्ये मंगळवार दि.17 मार्च रोजी रात्री साडे आठवाजेच्या सुमारास अज्ञात पाच ते सहा हल्लेखोरांनी पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.मोरे कॉम्प्लेक्समध्ये प्रवीण कोठारी यांच्या मालकीचे कोठारी एजन्सी नावाचे दुकान आहे.नेहमी प्रमाणे ते दिवसभराच्या कामकाजाचा हिशोब चालू असताना अज्ञात पाच ते सहा हल्लेखोर मोटरसायकलवर येऊन दुकानात बळजबरीने घुसून पिस्तूलचा व चॉपरचा धाक दाखवून तेथे कामाला असलेल्या कामगाराकडून एकूण रोख 68 हजार रुपयांची रक्कम लुटून पळून गेल्याची घटना मंगळवारी रात्री साडे आठ वाजता घडली.घटनेची माहिती वार्‍यासारखी पसरताच त्याठिकाणी एकच गर्दी उडाली होती. दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद या दुकानामध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमुळे हल्लेखोरांचा सर्व गुन्हा सीसी टीव्हीत कैद झाला आहे. दरोड्याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर हे पोलीस फौज फाट्यासह दाखल झाले होते.

शिर्डी ।प्रतिनिधी ।
   शिर्डी हे श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थस्थान असून येथे श्री साईंवर श्रद्धा ठेवूनच नुकतीच शिर्डी परिक्रमा झाली पण पोलीसांनी या शिर्डी परिक्रमा करणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल केले मात्र ज्या पवित्र शिर्डीत बंदी असतानाही राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत, त्यावर मात्र अशी तत्परता ,कारवाई करण्याचे धाडस पोलिसांनी आत्तापर्यंत कधी केले नाही, हे कशाचे द्योतक आहे ,?असा सवाल शिर्डी ग्रामस्थ व साई भक्तांना मधून सध्या सर्वत्र चर्चिला जात आहे,
      शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे ,येथे श्री साईंवर श्रद्धा ठेवून अनेक साईभक्त कशाचीही तमा न बाळगता स्वतःहून श्री साई दर्शनासाठी येत असतात, येथे  साईंवर श्रद्धा ठेवून साई भक्त सर्वकाही  दुःख, ,संकटे विसरून जात असतात ,अशा श्रद्धेतून येथे नुकतीच साईभक्त  व शिर्डी करांनी श्री साई बाबांवर श्रद्धा ठेवून शिर्डी परिक्रमा केली शिर्डीत श्री साईबाबा हयात असताना बाबांनी सुद्धा शिर्डीत प्लेगची साथ येऊ नये म्हणून शिवेवर जाऊन पीठ टाकायला लावले होते व त्यावेळी भयंकर असा प्लेग  आजार सुद्धा शिर्डीत शिरकाव करू शकला नव्हता, हे सत्य असताना ,शिर्डीत कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून येथील साईभक्त महिलांनी शिर्डीच्या शिवेवर जाऊन श्री साईंवर श्रद्धा ठेवून पीठ टाकले ,कोरोनाचा आजार शिर्डीत येऊ नये  म्हणून शिर्डी कर व राज्यातून इतर राज्यातून साई भक्तांनी येथे येवून परिक्रमा  काढली,  मात्र  या परिक्रमा करणाऱ्या आयोजकांवर पोलिसांनी  तातडीने कारवाई करून गुन्हेदाखल केेले,

   ज्या शिर्डीत साई संस्थाने सन 1987 ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन येथे साईभक्तांना व ग्रामस्थांना त्रास होऊ नये म्हणून कायमची दारूबंदी करण्यात यावी असे पत्र दिले असताना व येथे केव्हापासून दारूबंद

असताना आज शिर्डीत राजरोसपणे अनेक अवैध धंदे दारू धंदे ,,मटका, जुगार सर्रासपणे सुरू आहेत ,मात्र त्यावर कारवाई होत नाही ,अधून मधून कागदपत्रे दाखवण्यासाठी थातूरमातूर कारवाई केली जाते,
                      शिर्डी परिक्रमा करणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाते ,तर मग शिर्डीत काही वर्षापासून अनेक अवैध धंदे सुरू असताना त्यावर कारवाई का केली जात नाही ,कुठे माशी शिंकते,हे साई भक्त
जाणत आहे शिर्डीत प्रथम पोलिसांनी हे अवैध धंदे बंद करावेत ,अवैध धंदे करणाऱ्यावर तत्परता दाखवून तातडीने कारवाई करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत,
 उगाच कोरनोचा बागुलबुवा दाखवत व कायद्याचा बडगा उगारत साईवर श्रद्धा ठेवणाऱ्या साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांच्या श्रद्धेला तडा देण्याचा प्रयत्न पोलिसांनी करू नये, असा इशाराही साईभक्त यांनी दिला आहे,

,
शिर्डी। प्रतिनिधी।
         शिर्डीत कोरोनामुळे श्री साईबाबा संस्थान ने प्रसादालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे येथे या संस्थान प्रसादालयावर अवलंबून असणारे येथील भिकारी, साधुसंत ,तसेच ठरलेल्या प्रमाणे श्री साईं वर श्रद्धा ठेवून आलेल्या साईभक्तांची त्यामुळे भोजनाची गैरसोय होणार असून येथील ग्रामस्थ व साईभक्तांनी काही दिवसासाठी तरी स्वखर्चातून अशा लोकांसाठी, भक्तांसाठी भोजन प्रसादाची सोय करावी, अशी साईभक्त मधून मागणी होत आहे,
       जगात ,देशात कोरोनो व्हायरसमुळे हाहाकार उडाला असून राज्यातील सर्वच देवस्थानानी  अनेक महत्त्वाचे निर्णय त्यामुळे घेतले आहेत, शिर्डी हे तर जगद्विख्यात देवस्थान असून येथे दररोज हजारो साईभक्त देश-विदेशातून येत असतात, मात्र सध्याच्या कोरोनो वातावरणामुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या खूपच रोडावली आहे, श्री साईबाबा संस्थान नेही ही येथे काही महत्वाचे निर्णय घेतले असून मंगळवारपासून प्रसादालय तसेच भक्तनिवास व मंदिरही दर्शनासाठी पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ,परंतु हा आदेश आज जाहीर झाला परंतु येथे रेल्वेने अगोदर बुकींग करून आलेल्या व ज्यांना या आदेशाची माहिती नाही अशा येथे आलेल्या ची तसेच राज्यातुन, परराज्यातून येणाऱ्या साई भक्तांची संख्या कमी परंतू ती आहेस, या माहीत नसलेल्या साईभक्तांसाठी प्रसादालय बंद असल्याने मोठी गैरसोय होणार आहे, तसेच येथील भिकारी, संत साधू, यांचेीही मोठी गैरसोय होणार आहे, अशा शिर्डीत आलेल्या साई भक्त व इतरांसाठी हॉटेलात जाऊन प्रसाद किंवा भोजन घेणे भाग पडणार आहे ,त्यासाठी मोठी रक्कम ही द्यावी लागणार आहे , शिर्डीत  श्री साईबाबा हयात असताना  ते स्वतः गोरगरिबांना, भक्तांना  अन्नदान करत,  तीच प्रथा आजपर्यंत येथे सुरू आहे , मात्र  प्रसादालय बंद झाल्याने  ग्रामस्थांनी  येथे  ही प्रथा सुरू ठेवत अचानक आलेल्या साईभक्तांसाठी  तसेच भिकारी, साधू , यांच्यासाठी शिर्डी करांनी एकत्र येऊन  भोजनाची काही दिवसांसाठी तरी व्यवस्था  करण्याची गरज आहे ,
      शिर्डी करांनी व साई भक्तांनी काही दिवसांसाठी तरी येथे अचानक व काही माहीत नसताना दर्शनासाठी आलेल्या भक्तांची सोय व्हावी म्हणून भोजनाची व्यवस्था करावी तसेच संस्थांचे भक्त निवासस्थाने बंद असल्याने खाजगी लॉज, निवासस्थाने कमी रेटमध्ये द्यावीत अशी येथे  आलेल्या काही साईभक्तांनी मागणी केली आहे,

शिर्डी -श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या तदर्थ समितीच्‍या वतीने कोरोना व्‍हायरसचा प्रसार रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणून श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनाकरीता बंद ठेवण्‍याचा निर्णय घेतला असून मंदिरातील दैनंदिन पूजा-अर्चा नेहमीप्रमाणे सुरु राहतील अशी माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

श्री.डोंगरे म्‍हणाले, जगभरातील काही देशांमध्‍ये कोरोना व्‍हायरसची लागण झालेले रुग्‍ण मोठयाप्रमाणात आढळून आलेले असून सदर व्‍हायरसची लागण झालेले काही रुग्‍ण भारतातही आढळून आलेले आहेत. श्री क्षेत्र शिर्डी हे देशातील नंबर दोनचे देवस्‍थान असून श्री साईबाबांच्‍या  समाधीच्‍या दर्शनाकरीता देशाच्‍या व जगाच्‍या कानाकोप-यातुन भक्‍त दर्शनाकरीता शिर्डी येथे येत असतात. त्‍यामुळे मंदिर व मंदिर परिसरात भाविकांची मोठी वर्दळ होत असते. कोरोना व्‍हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये म्‍हणून राज्‍य शासनाने मार्गदर्शक सूचना केलेल्‍या आहेत. यामध्‍ये धार्म‍िक स्‍थळे, सामाजिक ठिकाणी गर्दी होऊ नये अथवा करु नये असे निर्देश देण्‍यात आलेले आहे. याच पार्श्‍वभूमीवर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या तदर्थ समितीच्‍या वतीने दिनांक १७ मार्च २०२० रोजी दुपारी ३.०० वाजेपासुन श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता साईभक्‍तांना बंद ठेण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असून समाधी मंदिरातील दैनंदिन पूजा-अर्चा सुरु राहतील यामध्‍ये कुठलाही खंड पडणार नाही. दर गुरुवारी निघणारी श्रींची नित्‍याची पालखी नियमित सुरु राहणार असून पालखीकरीता पुजारी व आवश्‍यक कर्मचारी उपस्थित राहणार आहे.

याबरोबरच या कालावधीत संस्‍थानचे श्री साईप्रसादालय व भक्‍तनिवासस्‍थाने ही बंद ठेवण्‍यात येणार आहे. ऑनलाईनव्‍दारे दर्शन बुकींग केलेल्‍या साईभक्‍तांना दिनांक १७ मार्च २०२० दुपारी ०३.०० वाजेपर्यंत दर्शनासाठी परवानगी दिली जाणार असून संकेतस्‍थळावरुन ऑनलाईन दर्शन बुकींग बंद करण्‍यात आलेले आहेत. याबाबतची माहिती साईभक्‍तांना ई-मेल, दुरुध्‍वनी व संकेतस्‍थळावरुन देण्‍यात येत आहे. सदर कालावधीत गांवकरी गेट ही बंद ठेवण्‍यात येणार असून हे सर्व नियम शासनाचे पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत. तरी साईभक्‍तांनी यांची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन ही श्री.डोंगरे यांनी केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget