Latest Post

प्रतिनिधी ।
            सावळीविहीर कारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिर्डी विमानतळा वर जाऊन  विविध विमानांच्या टेकअप व लँडिंग चा मनसोक्त  आनंद घेत तसेच तेथील स्वच्छतेचा आदर्श घेऊन स्वच्छतेचे धडे गिरवत संत गाडगे महाराज यांची आठवण काढत मनोमन स्वच्छतेची शपथ घेतली,
     सावळीविहीर कारवाडी येथील श्री हनुमान क्लास या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पर्यंतच्या सुमारे पन्नास चिमुकल्या विद्यार्थ्यांची सहल नुकतीच शिर्डी जवळील काकडी येथील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेली होती, नेहमी आकाशात दिसणारी विमाने, आता प्रत्यक्ष या विमानतळावर समक्ष बघण्याचा आनंद या विद्यार्थ्यांनी घेतला, तसेच दिल्ली, बेंगलोर आदी ठिकाणाहून आलेल्या 180 सिटर विमानांचे लँडिंग तसेच टेकअप बघण्याचा चा आनंदही या विद्यार्थ्यांनी यावेळी अनुभवला ,त्याचबरोबर या विमानतळावरील स्वच्छता, शिस्त, सुरक्षा याविषयी येथील अधिकारी वर्गाकडून जाणून घेत या विमानतळा प्रमाणेच नेहमीच स्वच्छता राखण्याची मनोमन शपथही या विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली, या छोट्याशा चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेशात पाहून दूरदूरहून विमानाने आलेल्या  प्रवाशांनी व  जाणाऱ्या येणाऱ्या साईभक्तांनी या मुलांबरोबर फोटो काढले, हितगुज साधले ,मुलांना चॉकलेट, खाऊ देण्यात आला, यावेळी विमानतळावर जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे ,जिल्हा परिषद सदस्य आशाताई दिघे ,,पत्रकार राजेंद्र गडकरी , भाजयुमोचे   तालुका अध्यक्ष रावसाहेब एखंडे यांनी व विमानतळ अधिकाऱ्यांनी या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे यावेळी स्वागत व कौतुकही केले, ही सहल यशस्वी करण्यासाठी या शाळेचे शिक्षक संदीप घोलप सर सोमनाथ वाबळे सर, सोनम रा मॅडम आदींनी विशेष परिश्रम घेतले ,

एकरूखे (वार्ताहर)- पत्नीच्या चारित्र्यावर संयश घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांड्याने प्रहार करुन तिला जिवे ठार मारले. तसेच मृतदेह पोत्यात भरुन तो निर्जनस्थळी नेऊन त्यावर पेट्रोल टाकून तो पेटवून दिला. ही घटना शनिवारी रात्री राहाता तालुक्यातील एकरुखे येथे घडली. हे कृत्य केल्यानंतर पती सुनील जनार्धन लेंडे हा राहाता पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने स्वतःहून केलेल्या कृत्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)शहरातून जाणार्‍या-येणार्‍या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटमार करणार्‍या टोळीला कोतवाली पोलिसांनी गजाआड केले आहे. कय्युम काझी कुरेशी (वय- 23 रा. बाबा बंगाली, नगर), सद्दाम मोहम्मद अली (वय- 23 रा. झेंडीगेट, नगर), मोईन बादशहा शेख (वय- 20 रा. भोसले आखाडा, नगर), मुसेफ नासीर शेख (वय- 20 रा. मुकुंदनगर) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक व्हिस्टा कार, एक मांझा कार, सहा मोबाईल, चाकू असा 11 लाख, 46 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.

बुलढाणा - 23 फरवरी
AIMIM के पूर्व विधायक वारिस पठान ने हाल में 100 करोड हिंदुओं पर 15 करोड मुसलमान भारी है,ऐसा विवादित बयान दिया जिस पर काफी बवाल होने के बाद पठान ने माफी भी मांग ली किंतु पठान के विवादित बयान पर अब भी तीखी प्रतिक्रियाएं सामने आ रही है. बुलढाणा जिले के ग्राम जांबुलधाबा में 22 फरवरी को आयोजित शिव छत्रपती जयंती के कार्यक्रम को संबोधित करते हुए बुलढाणा से शिवसेना के विधायक संजय गायकवाड की जुबान फिसल गई और उन्होंने के लिए अपशब्दों का इस्तेमाल करते हुए सोमवार को मुंबई में "खडा फाड" देने की चेतावनी दे दी है.विधायक गायकवाड के इस विवादित भाषण का वीडियो सोशल मीडिया पर बड़ी तेजी से वायरल हो रहा है.इस भाषण का अनुवाद पाठकों के लिए जस का तस पेश है जो इस तरह से है,,,
भाषण का अनुवाद :- मराठी से हिंदी
हमारे घर की शेरनियां बाहर आ गई तो तुम इतना घबरा गए,हम साथ मे आ गए तो क्या करेंगे,मेरा तो वारिस पठान को इतना ही कहना है "देशद्रोही लांडया" अब तक तुमने जितनी महिलाएं घर मे रखे, उन महिलाओं को गुलाम बना कर रखे,उन्हें बाहर नही आने दिया,उन्हें बताया कि मिलिट्री आएगी तुम्हे घर से निकालेगी,तुम्हे इस देश से बाहर करेगी,सब को झूठ बोलकर बाहर लाया और फिर कहा कि 15 करोड मुसलमान 100 करोड हिन्दू पर भारी पडेगा,, ऐसा ही कहा ना,,तू भूल गया वारिस पठान,,,शिवराया का मावला तेरी लाखों की फौज पर 500 मावले भारी है,ये तू भूल गया,,आज भी शिवराया की जमात इस राज्य में जिंदा है,,तू 15 करोड की क्या बात करता है मैं तुझे सोमवार को विधानसभा में मिलता हुँ तू अपनी माँ का लाल होगा तो मुझे वहां बता 15 करोड तुझे खड़ा नही फाड दिया तो मैं मेरे बाप की औलाद नही.

गळनिंब (प्रतिनिधी)-- समाजात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्याची परंपरा सिध्देश्वर चहा चौक बहुउद्देशीय  संस्थेच्या वतीने सुरू करून समाजापुढे चांगला आदर्श घालून दिला त्यातूनच चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना निश्चितच प्रेरणा मिळेल असा विश्वास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी व्यक्त केला              
गळनिंब तालुका श्रीरामपूर येथील सिद्धेश्वर चहा चौक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने  14 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर किरण तुपे व शिक्षण क्षेत्रात विशेष कार्य करणारे रावसाहेब चासकर यांना विशेष सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बहीरट बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा . बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे प्रवरा कारखान्याचे संचालक संपतराव चितळकर बिनसाद न्यूजचे संपादक असलम बिनसाद प्रा.डाॅ.एकनाथ ढोणे सर पंचायत समिती सदस्या कल्याणी काळे एडवोकेट रवींद्र हाळनोर प्रवरा बँकेचे संचालक बापूसाहेब वडीतके अनिल थोरात संजय कुदनर,उपसभापती आण्णासाहेब शिंदे, तुकाराम चिंधे,देवस्थानचे अध्यक्ष सुनिल शिंदे,हेड काॅन्सटेबल पोकळे, लोंढे,आदी उपस्थित होते  यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर किरण तुपे म्हणाले की वैद्यकीय सेवा करताना अनेक ठिकाणी सन्मान झाले परंतु माझ्या मायभूमीतील जन्मभूमी तील झालेला सन्मान  हा काही वेगळाच आहे या सन्मानाने मी भारावून गेलो असून माझे कार्य करण्यास मला आणखी ऊर्जा मिळाली आहे यावेळी पत्रकार देविदास देसाई, बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, लोणी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितेश सूर्यवंशी,चासकर सर, यांचीही भाषणे झाली यावेळी गळनिंब व परिसरात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा .डॉक्टर  विजय कडनोर, डॉक्टर अनुराधा चिंधे, प्राध्यापक डॉक्टर किरण थोरात, प्राध्यापक सुयोग चिंधे, ऋषिकेश बाचकर, प्राध्यापक रवींद्र मारकड, प्राध्यापक अनिल चिंधे, प्राध्यापक ज्योती चिंधे, अक्षय पिलगर, प्रतिभा कडनर आदिचांही  संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला कार्यक्रमास आदिनाथ वडितके,  बोरुडे सर. सौ चित्ते मॅडम, गळनिंब चे सरपंच संदीप जाटे, उपसरपंच दशरथ चिंधे, सेवा संस्थेचे चेअरमन विष्णु चिंधे, आप्पासाहेब मारकड, शामराव काळे, साहेबराव भोसले आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मच्छिंद्र खेमनर गणेश डोमाळे, कैलास ऐनोर संजय वडीतके, अजित देठे, संजय शिंदे, संदीप शेरमाळे, अशोक कडनोर, सचिन चिंधे, भाऊसाहेब विश्वासे, संदीप कचरे, इंद्रभान चिंधे, केशव कडनोर, मनोज विश्वासे मंजाबापू खेमनर, महेश चिंधे, गणेश कडनोर सौरभ वडितके, हनुमान गायकवाड सचिन चिंधे, सयाजी भोसले, राहुल शेरमाळे, श्रीधर शिंदे, रोहित विश्वासे आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलासराव चिंधे सर यांनी केले तर कैलास ऐनोर यांनी आभार मानले प्रास्ताविक संदीप शेरमाळे यांनी केले


बेलापूर  ( प्रतिनिधी  )-- बेलापूर  व परिसरात चोरट्यांनी धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली आहे बंद घरे पाहुन त्याच घरात चोर्या झाल्या असुन दिवसा बंद घराची टेहाळणी करुन रात्री चोरी करणारी टोळी सक्रीय झालेली आसावी असा अंदाज आहे      बेलापूर  ऐनतपुर येथील गट नंबर ८१ मधील विहीरीवर असलेले २० हजार रुपये किमतीचे जनरेटर चोरट्यांनी चोरुन नेले या बाबत बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी बेलापूर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार केली श्रीरामपूर  बेलापूर रोडवरील काही सी सी टि व्ही कँमेरँतही गाडीवर जनरेटर नेताना चोरटे कैद झालेले आहे ही बाब नवले यांनी बेलापूर पोलीसांच्या निदर्शनास आणुन दिली परंतु काहीच कारवाई  झाली नसल्याचे नवले यांचे म्हणणे आहे त्यांनतर चारच दिवसांनी श्रीमती माया कैलास ढवळे यांच्या बंद घराचे कुलुप तोडुन चोरट्यांनी साडे सात तोळे सोन्याचे दागीने लंपास केले या घरातुन जवळपास पावणे दोन लाख रुपयाचा ऐवज चोरीस गेला या बाबत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हा अन्वेषन विभागाच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिली बेलापूर पोलीसांनी तातडीने श्वान पथक तसेच ठसे तज्ञाना निमंत्रीत केले होते  त्यांनतर दोनच दिवसानी पोलीस स्टेशन पासुन अगदी हाकेच्या अंतरावर असणार्या एस टी स्टँडची कँटिंन चोरट्यांनी फोडली कँटींनचा मागील दरवाजा तोडुन चोरट्यांनी आत प्रवेश करुन कँटींनच्या गल्ल्यातील आठशे रुपये रोख एक कुरमुर्याची गोणी चहा पावडर साखर लपांस केली काल पुन्हा चोरट्यानी अनेक बंद घरांना टारगेट केले लक्ष्मी नारायण नगर मधील दिपक जधव यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले परंतु तेथे काहीच हाती लागले नाही त्यांनतंर रमेश मिसाळ व राजेंद्र भराटे यांचेही बंद असलेले घर चोरट्यांनी फोडले परंतु तेथेही चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही बेलापूर येथील पटारे यांची मोटार सायकल चोरट्यांनी चोरुन नेली असुन सलग घडणार्या या घटनामुळे नागरीकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे  बेलापूर  पोलीस या घटनाचा तपास करत असुन आत्ता पर्यत फक्त एकच गुन्हा दाखल झालेला आहे.

शिरसगाव[वार्ताहर]श्रीरामपूर शहरात मराठा समाज बहुउद्देशीय विकास सेवा प्रतिष्ठान श्रीरामपूर यांचे वतीने हिंदवी सम्राज्याचे संस्थापक एक आदर्श शासनकर्ता तसेच शौर्य,पराक्रम,ध्येयवाद,कुशल संघटन,कडक,नियोजनबद्ध प्रशासन असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अभूतपूर्व अशी भव्य पायी शोभायात्रेने,ढोल ताशाचे गजरात,आनंदाने साजरी करण्यात आली.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मंगल आरती करण्यात आली.त्यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार,तहसीलदार प्रशांत पाटील,नगराध्यक्षा अनुराधा आदिक,किशोरअण्णा निर्मळ,आ.लहू कानडे,माजी आ.भाऊसाहेब कांबळे,माजी आ.भानुदास मुरकुटे,मंजुश्री मुरकुटे,नारायण डावखर,वंदना मुरकुटे,अशोक थोरे,आदी मान्यवर उपस्थित होते.प्रतिमा पूजन झाल्यावर शिवाजी महाराज व जिजाऊमासाहेब यांची वेशभूषा असलेले कलाकार दोन रथातून विराजमान होते.
मिरवणूक सुरु होताना प्रथम महिला,पुरुष सवार असलेले घोडेस्वार होते.त्यावेळी पारंपारिक वेशात,पारंपारिक वाद्द्यासह वाघ्या मुरळी,पोतराज,आदींनी आपली कला सदर केली.त्यामागे शिवरायाचे झेंडे हातात घेऊन भव्य पायी शोभायात्रा फटाक्याची  आतिषबाजी करीत थत्ते ग्राउंड बेलापूर रोड ते शिवाजी रोडमार्गे मेनरोड मार्गे परत थत्ते ग्राउंडला आल्यावर विसर्जन करण्यात आले.फार मोठ्या संख्येने महिला पुरुष,पंचक्रोशीतील ग्रामस्थ,विद्यार्थी,बालके सह्भागी झाले होते.सर्व महिला पुरुषांनी भगवे फेटे बांधल्याने आकर्षक मिरवणूक दिसत होती.राममंदिर चौकात भजनी मंडळाने शिवाजी महाराज व तुकाराम महाराज यांच्या भेटीचा देखावा अप्रतिम सादर करण्यात आला.इतका मोठा उत्साह यावर्षी जास्त दिसत होता.शहरात.चौकाचौकात,गावागावात प्रचंड उत्साह जाणवला.शिवजयंती महोत्सवाचे नियोजन मराठा समाज बहुउद्देशीय विकास सेवा प्रतिष्ठान श्रीरामपूर,जिजाऊ महिला मंडळ,वधूवर सूचक मंडळ,युवा ग्रुप,यांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी संस्थापक अध्यक्ष विलासराव जाधव,शिवजयंती उत्सव अध्यक्ष किशोरअण्णा निर्मळ,यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र मोरगे,भागवत लासुरे,रावसाहेब तोडमल,व सर्व सहकारी,महिला मंडळ सीमा जाधव व सहकारी, तसेच युवा ग्रुपचे सर्व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.त्याठिकाणी शिवाजी महाराज यांची अप्रतिम रांगोळी व सर्व रस्त्यांनी रांगोळीच्या पायघड्या प्रज्ञा सातपुते,कलावती देशमुख,ज्योती कवडे,घातल्या होत्या.आभार प्रदर्शन विलासराव जाधव यांनी केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget