Latest Post

बुलडाणा - 13 फेब्रूवारी
मागील दोन महिन्यात एक नव्हे तर दोन वेळी बुलडाणा अन्न व औषध प्रशासन कर्यालयाच्या गोदामातून जप्त केलेला गुटखा चोरी गेला याची गंभीर दखल घेत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज 13 फेब्रुवारी 2020 रोजी स्वत: बुलडाणा येथील प्रशासकीय इमारतीत असलेल्या सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालयाची पाहणी करीत संपूर्ण विभागाची झाडाझडती घेतली. 
       यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी आता पर्यंत कारवाईमध्ये जप्त करून ठेवलेल्या गुटखा गोदामची ही पाहणी केली व आता पर्यंत किती कारवाया केले व किती गुटखा जप्त केला याची संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.तसेच याबाबतची संपूर्ण तपशील सादर करण्याचा सूचना त्यांनी संबंधीतांना दिल्या.जप्त गुटखा प्रकरणी तपशील सादर न केल्यास संबंधीतांवर कठोर कारवाई करण्याची तंबीही पालकमंत्री यांनी दिली.गोदामातुन गुटखा चोरी प्रकरणी त्यांनी पोलीसांना यासंदर्भात तात्काळ पंचनामा करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी गोदामात 22 लाख रूपयांचा गुटखा व सुगंधीत तंबाखू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.पोलीसांकडून संपूर्ण कारवाई होईपर्यंत सदर कार्यालयाला सील लावावे व कारवाई पुर्ण होईपर्यंत गुटखा गोडावून, सहाय्यक आयुक्त कार्यालयात पोलीसांची तैनाती ठेवावी. संपूर्ण प्रशासकीय इमारतीला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही यावेळी पालकमंत्री यांनी दिले.  याप्रसंगी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पालकमंत्री डॉ.शिंगणे यांची ही अनअपेक्षित भेटीमुळे संपूर्ण प्रशासकीय इमारतीत असलेले सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी घाबरले होते.

शिर्डीत गुरुवारी रात्रि सर्व शांत झोपेत असतान्ना पिम्पलवाडि रोड होटेल संजीवनी समोर शिर्डी येथील माजी नगरसेवक राजेंद्र शिन्दे याण्चा मूलगा श्रीकांत राजेंद्र शिंदे याने विठल मोरे राहनार येवला हल्ली राहनार शिर्डीतिल कुप्रसिद्ध ठिकान  कालिका नगर येथील विठल साहेबराव मोरे याला इनोवा mh17 1100  ह्या गाड़ीने उडविले प्रथम आलेल्या माहीतीतुन हत्या झाली आहे असे  उघड़ झाले आहे  परंतु हे खरे आहे की खोटे आजूण स्पष्ट झाले नाहि कारण पोलिस आजुन तपास करित आहे थोड्याच वेळात निष्पन्न होईल मात्र याची उलट सुलट चर्चा साध्या शिर्डीत सुरु आहे

श्रीरामपूर ( प्रतिनिधी )जिल्ह्यातील शिक्षकांची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला  महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड, मुंबई या राज्यातील बँकांच्या शिखर संस्थेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रातून पगारदार नोकरांची  सर्वोत्कृष्ट नागरी सहकारी बँक तसेच शतकोत्तर वाटचाल करणारी बँक म्हणून विशेष सन्मान असे दोन पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते देऊन मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात सोमवारी गौरव करण्यात आला. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे देखील उपस्थित होते. सदरचा पुरस्कार बँकेचे वतीने गुरुमाऊली मंडळाचे नेते व जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे , बँकेचे चेअरमन संतोष दुसुंगे , व्हाईस चेअरमन नानासाहेब बडाख,शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष सलीमखान पठाण,संचालक अविनाश निंभोरे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण देशमुख यांनी स्वीकारला.

 शिक्षक बँकेने शंभर वर्षाची वाटचाल पूर्ण करताना एक हजार कोटींच्या ठेवीचा टप्पा ओलांडला आहे. कमीत कमी व्याजदर व जास्तीत जास्त सुविधा सभासदांना देणारी व अत्यंत काटकसरीने कारभार करून सभासदांच्या हितास प्राधान्य देणारी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक ही महाराष्ट्रातील एकमेव पगारदार नोकरांची नागरी सहकारी बँक असल्याचे फेडरेशनचे कार्याध्यक्ष मुकुंद कळमकर यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनीसुद्धा बँकेची कामगिरी ऐकून आनंद व्यक्त केला तसेच बँकेचे पदाधिकारी,सभासद व  ठेवीदार यांचे अभिनंदन केले.
राज्यातील पगारदार नोकरांची उत्कृष्ट बँक म्हणून शिक्षक बँकेची राज्यभरातून एकमेव निवड करण्यात आली आहे. बँकेचा शताब्दी सांगता समारंभ लवकरच होणार असून या कार्यक्रमाचे निमंत्रण बँक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री तसेच सहकार मंत्री यांना दिले. शिक्षक बँकेला राज्य बँक असोसिएशनचे मानाचे दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेचे संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचारी यांचे शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे ,प्रवीण ठुबे, अरुण आवारी,निळकंठ घायतडक ,राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट,महिला आघाडीच्या विद्याताई आढाव, मिनाक्षी तांबे,मिनाक्षी अवचरे,संगीता कुरकुटे,सत्यवान मेहेरे,ना.चि.शिंदे,बाबा पवार,रमेश साबळे, राम निकम,बाळासाहेब सरोदे, विठ्ठल फुंदे,संदिप मोटे,मच्छिंद्र लोखंडे,बाळासाहेब तापकीर, रामेश्वर चोपडे,अल्ताफ शाह,महिला आघाडीच्या अंजली मुळे,सुजाता पुरी, नर्गिस ईनामदार,मिनाज शेख,राजकुमार साळवे,बाळासाहेब चाबुकस्वार,राजु इनामदार, जगन्नाथ विश्वास,दिपक बोऱ्हाडे, बेनहर वैरागर, मोहमद बदर शेख , हनिफ शेख ,भाऊराव राहिंज,रमेश दरेकर,सयाजीराव रहाणे, पी.डी.सोनवणे,लक्ष्मण सोनवणे, विठ्ठल काकडे, कैलास गिते आदींनी अभिनंदन केले आहे.

 दरोडेखोरांच्या टोळीतील ३जण जेरबंद
अहमदनगर - संगमनेर येथे दुकान बंद करून सरफा हा सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बँग घेऊन जात असताना, त्याच्याकडील ती बँग बळजबरीने चोरुन नेत असतना मदतीसाठी आलेल्याची गोळी घालून खून करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळी स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी (दि.९) जेरबंद केली. दरोडेखोरांच्या टोळीतील तिघांना पकडण्यात आले असून अन्य तिनजण फरार झाले आहेत.आरोपी गणेश राजेंद्र गायकवाड (वय ३३, रा.घुलेवाडी एरिगेशन काँलनी, ता.संगमनेर), याला घुलेवाडी येथे सापळा रचून पकडले. त्याच्या कडे चौकशी केली असता, त्याने आरोपी दीपक विनायक कोळेकर (वय ३४, रा.सिडको त्रिमूर्ती, नाशिक, ह.मु.बुधवार पेठ पाण्याच्या टाकीजवळ, नाईकवाडी, नाशिक), आरोपी भरत विष्णु पाटील (वय २६, रा.पचवंटी गंगा, नाशिक) याची माहिती दिली. त्यानुसार एलसीबी पथकाने नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन त्याचा पाठलाग करून पकडले. उर्वरित आरोपी अविनाश जगन्नाथ मारके (रा.घुलेवाडी, ता.संगमनेर), समाधान कुंडलीक गोडसे (रा.परीते सोलापूर ह.मु.वाघोली, पुणे) व निलेश (पूर्ण नाव माहीत नाही) याचा मुंबई, कर्जत (रायगड), पुणे, सोलापूर येथे जाऊन पोलिसांनी तपास केला परंतु ते मिळून आले नाहीत.एलसीबीचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि संदीप पाटील, शिशिरकुमार देशमुख, पोहेकाँ मनोज गोसावी, दत्तात्रय हिंगडे, पोना सुनील चव्हाण, शंकर चौधरी, आण्णा पवार, संतोष लोंढे, सचिन अडबल, संदिप कर्डीले, विशाल दळवी, दीपक शिंदे, रवी सोनटक्के, विनोद मासाळकर, मेघराज कोल्हे, संदीप घोडके, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल सोळुंके, चापोना बबन बेरड, चापोकाँ सचिन कोळेकर, संभाजी कोतकर, बाळासाहेब भोपळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

शिरसगाव[वार्ताहर]जागतिक संविधान व संसदीय संघ श्रीरामपूर मुख्यालय यांच्या वतीने आयोजित केलेल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवर सदस्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे टपाल तिकीटाचे अनावरण गिनीच बुक ऑफ रेकोर्ड होल्डर डॉ.बाळासाहेब मुंगसुळे,नगराध्यक्षा अनुराधा आदिक,डब्लूसीपीए अध्यक्ष दत्ता विघावे,विष्णू वाघ,नगरसेवक राजेंद्र पवार आदींच्या हस्ते करण्यात आले.प्रास्तविक अध्यक्ष दत्ता विघावे,भाऊराव माळी यांनी केले त्यावेळी लवकरच स्व.खा.गोविंदराव आदिक यांच्या पोस्ट टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात येईल असे दत्ता विघावे यांनी सांगितले.सुनील पवार-धार्मिक सामाजी,क्रीडा,संगीता रामटेके-सामाजिक क्रीडा,बाबासाहेब जाधव-क्रीडा शिक्षण प्रशिक्षण,सौजन्या क्षीरसागर-शिक्षण व सामाजिक,दीपक राजगुरू-क्रिकेट समालोचक,सांस्कृतिक,ऐतिहासिक वस्तू संग्रह,कविता आटोळे-साहित्य सामाजिक,प्रिया मुपडे-आरोग्य,सामजिक,शकुंतला
सारडा-चित्रकारिता नक्षीकाम,मेहंदी,कलाकुसर,साहित्य,भाऊराव माळी-सामाजिक सांस्कृतिक,प्रा.शैलेंद्र भणगे,-साहित्य,शिक्षण सामाजिक,डॉ दादाराव म्हस्के,-कला,साहित्य,शिक्षण,संगीत,ऋषिकेश विघावे-शासकीय क्रिकेट ३२ सामन्यात पंचगिरी,जागतिक विक्रम,संजय कोळेकर-सामाजिक या मान्यवर व जागतिक संविधान व संसदीय सदस्यांना सन्मानार्थ पोस्टाचे टपाल तिकीट अनावरण करून सोबत सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी सामजिक कार्यकर्ते प्रा.कैलास पवार पुणे यांची सदस्यपदी नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी या संस्थेमार्फत सुरु असलेल्या चांगल्या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.प्रारंभी दिप्रज्वलन न करता मान्यवरांनी तुळशीरोपास जलसमर्पण करून वेगळा आदर्श दिला.कारण पर्यावरणास तुळशी झाडापासून ऑक्सिजन मिळत असल्याने तो एक फायदा आहे.व महत्व आहे.दि १५ फेब्रु.रोजी खासदार सुप्रिया सुळे,जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले,नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे,आदी मान्यवर श्रीरामपूर येथे विकास कामांचा शुभारंभासाठी येणार आहेत असेही नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सांगितले.प्रमुख अतिथी डॉ बाळासाहेब मुंगसुळे,प्रा.डॉ दादाराव म्हस्के,विष्णू वाघ यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.यावेळी सदस्य बाबासाहेब चेडे,भीमराज बागुल,प्रा.कैलास पवार,सी के भोसले,अंबादास राउत,सुनील पवार,आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्र संचालन प्रसन्ना धुमाळ व आभार प्रदर्शन भाऊराव माळी यांनी केले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) शहर व तालुक्यातील मतदान अधिकारी म्हणून काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी मतदार याद्यांचे पडताळणीचे काम नाकारून जिल्हा समन्वय समितीच्या निर्देशानुसार या कामावर बहिष्कार घातला होता. त्यामुळे प्रांताधिकारी अनिल पवार यांनी तालुक्यातील या बीएलओचे काम करणाऱ्या शिक्षकांना कारवाईच्या नोटिसा दिल्या होत्या. त्या नोटिशीला आज तालुक्यातील सर्व नियुक्त बीएलओ शिक्षकांनी तहसील कार्यालयामध्ये उपस्थित राहून लेखी उत्तर दिले. त्यामुळे तहसील कार्यालयामध्ये शिक्षकांची जत्रा भरली होती. यामध्ये महिला शिक्षकांची संख्याही लक्षणीय होती.
 केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या राज्यात मतदार याद्यांचे पडताळणीचे काम सुरू असून सदरचे काम 31 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. यासाठी जिल्हाभरातील प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्त्या गावोगावी करण्यात आलेल्या आहेत. परंतु सदर कामामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे व हे काम खूप किचकट असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इतर 12 खात्यातील लोकांनादेखील नियुक्‍त्या देण्यात याव्यात व शिक्षण हक्क कायद्यानुसार आम्हाला आमचे शैक्षणिक काम करू द्यावे यासाठी जिल्हा समन्वय समितीने जिल्हाभर या कामावर बहिष्कार घातला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील शिक्षकांनी देखील या कामावर बहिष्कार घातल्यामुळे प्रांताधिकार्‍यांनी 31 जानेवारी रोजी तालुक्यातील सर्व बीएलओ म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना कामामध्ये हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवून कारवाईच्या नोटिसा दिल्या होत्या. त्याला आज जिल्हा समन्वय समितीच्या निर्देशानुसार सर्व बीएलओ शिक्षकांनी तहसील कार्यालयात उपस्थित राहून वैयक्तिक खुलासे सादर केले. सदर खुलासामध्ये नोटीशीमध्ये दिलेले सर्व आरोप नाकारण्यात आले असून आरटीईनुसार शिक्षकांना फक्त निवडणूक, जनगणना व आपत्कालीन कामे करण्याची तरतूद आहे. तसेच सदरचे काम दीर्घकालीन असल्यामुळे अध्यापनाचे कार्य करणे अवघड होणार आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षक सोडून इतर खात्यातील कर्मचारी हे प्रत्येक गावात उपलब्ध आहेत. त्यांना हे काम द्यावे तसेच उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार सदरचे काम न करणाऱ्या शिक्षकांबाबत कोणत्याही प्रकारची सक्ती न करता काम न करणाऱ्या शिक्षकांवर कोणती कारवाई करू नये अशी मागणी या खुलासा मध्ये करण्यात आलेली आहे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने धुळे जिल्ह्यातील एका याचिकेवर याबाबत तीन दिवसापूर्वी निर्णय देताना शिक्षकांना या कामाची सक्ती करता येणार नाही असे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या आंदोलनाला बळ प्राप्त झाले असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षकांना या कामातून वगळले आहे .त्याप्रमाणे श्रीरामपूर व जिल्ह्यात सुद्धा अशाच प्रकारे प्राथमिक शिक्षकांना या कामातून मुक्त करून त्यांना ज्ञानदानाचे कार्य करू द्यावे अशी अपेक्षा सर्व बीएलओ शिक्षक, शिक्षिकांनी व्यक्त केली आहे. यावेळी श्रीरामपुर तालुका समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेलापूर(वार्ताहर)सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या प्रभु श्रीराम मंदिराच्या समितीचे विश्वस्त म्हणुन अहमदनगर जिल्ह्यातील ,श्रीरामपूर तालुक्यातील  बेलापूरचे भूमिपुत्र स्वामी गोविंददेव गिरी यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमी येथील मंदिर उभारणीचा मार्ग जवळपास पाचशे वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मार्गी लागला. लवकरच अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. या मंदिराच्या विश्वस्तांची घोषणा आजच केंद्र सरकारने केली. त्यात बेलापूर येथील  राष्ट्रसंत स्वामी पंडित गोविंददेव गिरि यांच्या नावाचा समावेश झाल्यामुळे बेलापूरात फटाके फोडुन मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला 
त्यांचा जन्म बेलापूर येथे १९४९ मध्ये व्यास परिवारात झाला.  ११ वी पर्यंत शिक्षण जे टी एस् हायस्कूल मधे झाले. कांची कामकोटीचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांचेकडून स्वामींनी अनुग्रह घेतला. तसेच स्वामी सत्यमित्रानंद महाराज यांच्याकडून संन्यास दिक्षा घेतली.भागवत, रामायण, महाभारत, श्रीमदभगवद्गीता आणि अन्य धर्मग्रंथांचे देश विदेशात प्रबोधन करून संपूर्ण आयुष्य राष्ट्रधर्म आणि अध्यात्मासाठी समर्पित केले आहे. स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक प. पू. पांडुरंग शास्त्री आठवले यांचे विद्यार्थी व प्रज्ञाचक्षु प. पू. मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचे ते सहयोगी आहेत.त्यांच्या धार्मिक कार्याची केंद्र सरकारने दखल घेतली आहे.
त्यांच्या नियुक्तीने बेलापूरला थेट देशपातळीवर सन्मान मिळाला आहे. ही बातमी समजताच जिल्ह्यात ठिकठिकाणी आनंद व्यक्त करण्यात आला.त्याप्रीत्यर्थ पेठेतील बालाजी मंदिरापुढे फटाके वाजविण्यात आले.या वेळी पंडीत महेश व्यास रणजीत श्रीगोड  दिलीप दायमा दिलीप काळे रमेश बैरागी रवि कोळपकर ओमप्रकाश व्यास आदिसह नागरीक उपस्थित होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget