 |
दरोडेखोरांच्या टोळीतील ३जण जेरबंद |
अहमदनगर - संगमनेर येथे दुकान बंद करून सरफा हा सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बँग घेऊन जात असताना, त्याच्याकडील ती बँग बळजबरीने चोरुन नेत असतना मदतीसाठी आलेल्याची गोळी घालून खून करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळी स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी (दि.९) जेरबंद केली. दरोडेखोरांच्या टोळीतील तिघांना पकडण्यात आले असून अन्य तिनजण फरार झाले आहेत.आरोपी गणेश राजेंद्र गायकवाड (वय ३३, रा.घुलेवाडी एरिगेशन काँलनी, ता.संगमनेर), याला घुलेवाडी येथे सापळा रचून पकडले. त्याच्या कडे चौकशी केली असता, त्याने आरोपी दीपक विनायक कोळेकर (वय ३४, रा.सिडको त्रिमूर्ती, नाशिक, ह.मु.बुधवार पेठ पाण्याच्या टाकीजवळ, नाईकवाडी, नाशिक), आरोपी भरत विष्णु पाटील (वय २६, रा.पचवंटी गंगा, नाशिक) याची माहिती दिली. त्यानुसार एलसीबी पथकाने नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन त्याचा पाठलाग करून पकडले. उर्वरित आरोपी अविनाश जगन्नाथ मारके (रा.घुलेवाडी, ता.संगमनेर), समाधान कुंडलीक गोडसे (रा.परीते सोलापूर ह.मु.वाघोली, पुणे) व निलेश (पूर्ण नाव माहीत नाही) याचा मुंबई, कर्जत (रायगड), पुणे, सोलापूर येथे जाऊन पोलिसांनी तपास केला परंतु ते मिळून आले नाहीत.एलसीबीचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि संदीप पाटील, शिशिरकुमार देशमुख, पोहेकाँ मनोज गोसावी, दत्तात्रय हिंगडे, पोना सुनील चव्हाण, शंकर चौधरी, आण्णा पवार, संतोष लोंढे, सचिन अडबल, संदिप कर्डीले, विशाल दळवी, दीपक शिंदे, रवी सोनटक्के, विनोद मासाळकर, मेघराज कोल्हे, संदीप घोडके, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल सोळुंके, चापोना बबन बेरड, चापोकाँ सचिन कोळेकर, संभाजी कोतकर, बाळासाहेब भोपळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.
Post a Comment