शिक्षक बँकेला राज्यस्तरीय दोन पुरस्कार, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते वितरण.

श्रीरामपूर ( प्रतिनिधी )जिल्ह्यातील शिक्षकांची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला  महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड, मुंबई या राज्यातील बँकांच्या शिखर संस्थेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रातून पगारदार नोकरांची  सर्वोत्कृष्ट नागरी सहकारी बँक तसेच शतकोत्तर वाटचाल करणारी बँक म्हणून विशेष सन्मान असे दोन पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते देऊन मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात सोमवारी गौरव करण्यात आला. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे देखील उपस्थित होते. सदरचा पुरस्कार बँकेचे वतीने गुरुमाऊली मंडळाचे नेते व जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे , बँकेचे चेअरमन संतोष दुसुंगे , व्हाईस चेअरमन नानासाहेब बडाख,शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष सलीमखान पठाण,संचालक अविनाश निंभोरे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण देशमुख यांनी स्वीकारला.

 शिक्षक बँकेने शंभर वर्षाची वाटचाल पूर्ण करताना एक हजार कोटींच्या ठेवीचा टप्पा ओलांडला आहे. कमीत कमी व्याजदर व जास्तीत जास्त सुविधा सभासदांना देणारी व अत्यंत काटकसरीने कारभार करून सभासदांच्या हितास प्राधान्य देणारी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक ही महाराष्ट्रातील एकमेव पगारदार नोकरांची नागरी सहकारी बँक असल्याचे फेडरेशनचे कार्याध्यक्ष मुकुंद कळमकर यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनीसुद्धा बँकेची कामगिरी ऐकून आनंद व्यक्त केला तसेच बँकेचे पदाधिकारी,सभासद व  ठेवीदार यांचे अभिनंदन केले.
राज्यातील पगारदार नोकरांची उत्कृष्ट बँक म्हणून शिक्षक बँकेची राज्यभरातून एकमेव निवड करण्यात आली आहे. बँकेचा शताब्दी सांगता समारंभ लवकरच होणार असून या कार्यक्रमाचे निमंत्रण बँक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री तसेच सहकार मंत्री यांना दिले. शिक्षक बँकेला राज्य बँक असोसिएशनचे मानाचे दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेचे संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचारी यांचे शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे ,प्रवीण ठुबे, अरुण आवारी,निळकंठ घायतडक ,राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट,महिला आघाडीच्या विद्याताई आढाव, मिनाक्षी तांबे,मिनाक्षी अवचरे,संगीता कुरकुटे,सत्यवान मेहेरे,ना.चि.शिंदे,बाबा पवार,रमेश साबळे, राम निकम,बाळासाहेब सरोदे, विठ्ठल फुंदे,संदिप मोटे,मच्छिंद्र लोखंडे,बाळासाहेब तापकीर, रामेश्वर चोपडे,अल्ताफ शाह,महिला आघाडीच्या अंजली मुळे,सुजाता पुरी, नर्गिस ईनामदार,मिनाज शेख,राजकुमार साळवे,बाळासाहेब चाबुकस्वार,राजु इनामदार, जगन्नाथ विश्वास,दिपक बोऱ्हाडे, बेनहर वैरागर, मोहमद बदर शेख , हनिफ शेख ,भाऊराव राहिंज,रमेश दरेकर,सयाजीराव रहाणे, पी.डी.सोनवणे,लक्ष्मण सोनवणे, विठ्ठल काकडे, कैलास गिते आदींनी अभिनंदन केले आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget