पालक मंत्री डॉ. शिंगणे यांच्या आदेशाने बुलडाणा येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालय होणार सील,पालकमंत्र्यांकडून कार्यालयाची झाडाझडती,जप्त केलेला गुटखा दोनदा झाला चोरी.

बुलडाणा - 13 फेब्रूवारी
मागील दोन महिन्यात एक नव्हे तर दोन वेळी बुलडाणा अन्न व औषध प्रशासन कर्यालयाच्या गोदामातून जप्त केलेला गुटखा चोरी गेला याची गंभीर दखल घेत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज 13 फेब्रुवारी 2020 रोजी स्वत: बुलडाणा येथील प्रशासकीय इमारतीत असलेल्या सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालयाची पाहणी करीत संपूर्ण विभागाची झाडाझडती घेतली. 
       यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी आता पर्यंत कारवाईमध्ये जप्त करून ठेवलेल्या गुटखा गोदामची ही पाहणी केली व आता पर्यंत किती कारवाया केले व किती गुटखा जप्त केला याची संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.तसेच याबाबतची संपूर्ण तपशील सादर करण्याचा सूचना त्यांनी संबंधीतांना दिल्या.जप्त गुटखा प्रकरणी तपशील सादर न केल्यास संबंधीतांवर कठोर कारवाई करण्याची तंबीही पालकमंत्री यांनी दिली.गोदामातुन गुटखा चोरी प्रकरणी त्यांनी पोलीसांना यासंदर्भात तात्काळ पंचनामा करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी गोदामात 22 लाख रूपयांचा गुटखा व सुगंधीत तंबाखू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.पोलीसांकडून संपूर्ण कारवाई होईपर्यंत सदर कार्यालयाला सील लावावे व कारवाई पुर्ण होईपर्यंत गुटखा गोडावून, सहाय्यक आयुक्त कार्यालयात पोलीसांची तैनाती ठेवावी. संपूर्ण प्रशासकीय इमारतीला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही यावेळी पालकमंत्री यांनी दिले.  याप्रसंगी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पालकमंत्री डॉ.शिंगणे यांची ही अनअपेक्षित भेटीमुळे संपूर्ण प्रशासकीय इमारतीत असलेले सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी घाबरले होते.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget