Latest Post

अहमदनगर (प्रतिनिधी) लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडीओ (चाईल्ड पोर्नोग्राफी), फोटो, मजकूर समाज माध्यमावर टाकून प्रसिद्ध करून व्हायरल करणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध सायबर पोलीस घेत आहेत. या गुन्ह्यांत जिल्ह्यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे.केतन बाळासाहेब मुंगसे (वय- 21 रा. वळदगाव, ता. श्रीरामपूर), नामदेव तुकाराम शेळके (वय- 59 रा. संगमनेर), सागर सुरेंद्र राऊत (वय- 29 रा. कुंभारगल्ली, जामखेड), अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी सायबर सेलचे पोलीस हवालदार अरुण सांगळे यांनी फिर्याद दिली आहे.सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींना अटक करण्याची कामगिरी झाली. गेल्या आठवड्यात राहुरीतील एक व भिंगारमधील एक अशा दोन तरुणांना अटक करण्यात आली होती. श्रीरामपूर, संगमनेर, जामखेडमधून तिघांना अटक करण्यात आली आहे. सायबर सेल जिल्ह्यातील 11 व्यक्तींचा शोध घेत आहे.समाजमाध्यमावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडीओ (चाइल्ड पोर्नोग्राफी), फोटोची तांत्रिक माहिती नॅशनल क्राईम ब्युरोने संकलित केली आहे. एनसीआरबीकडून ही माहिती सायबरला मिळाली असून गेल्या पाच महिन्यात राज्यभरात 1700 अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील 16 जणांच्या आयपी अ‍ॅड्रेसवरून अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. यापैकी आत्तापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर, बाकी 11 लोकांचा शोध सायबर सेल घेत आहे. इंजिनीअर, कर्मचारी अन् दुकानदार.श्रीरामपूरमधून अटक करण्यात आलेला तरुण इंजिनीअर असून एका ठिकाणी नोकरीला आहे. संगमनेरमधून 59 वर्षीय व्यक्तीला पकडण्यात आले असून, ही व्यक्ती एका साखर कारखान्यामध्ये नोकरीला आहे. जामखेडमधील दुकानदाराला पकडण्यात आले असून त्यांचे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

बुलडाणा - 5 फेब्रूवारी
बुलडाणा तालुक्यातील रायपुर पोलिस ठाणेच्या हद्दीतील भडगांव शिवारात सुरु असलेल्या जुगार क्लब वर काल सायंकाळी बुलडाणा एसपी डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या विशेष पथकाने धाड टाकून 10 जुगाऱ्यांना अटक करून 3 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंदे बंद असतांना जिल्हा मुख्यालय जवळ असलेल्या रायपुर पोलिस स्टेशन अंतर्गत बिनधास्तपणे सुरु असलेल्या या क्लब मध्ये दूर वरुन "खिलाडी" येत असताना ठानेदाराला या क्लबची माहिती नव्होती का? एसपी पथकाची या कार्यवाही मुळे हा प्रश्न उपस्थित होत आहे.
     सैलानी जवळ भडगांव शिवारात एका शेतात अवैध जुगार क्लब सुरु असल्याची गुप्त माहिती बुलडाणा एसपी डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना मिळाल्या नंतर त्यांनी एक विशेष
पथक तयार केले. या पथकाने 5 फेब्रूवारीच्या सायंकाळी शेख जावेद, रा.सैलानी यांच्या शेतात पैशाच्या हारजीतवर चालणा-या एक्का बादशहा जुगार क्लबवर छापा टाकून समाधान देविदास शिंदे रा.धाड, विनोद उकर्डा परमेश्वर रा.धाड, शेख सादिक शेख अफसर रा. रायपूर, रामनाथ दगडू पिटेकर रा.पिंपळगांव सराई, शेख फिरोज शेख जानी रा. पिंपळगांव सराई, फकीर शाह हैदर शाह, रा.पिंपळगांव सराई, शेख इरफान शेख सांडू, रा. सैलानी, शेख शकील फतेमोहम्मद रा.रायपूर, रविसिंग चरणसिंग गौंड रा. सैलानी व श्रीकांत सदाशिव जैन, रा.धाड यांना पैशाच्या हारजितवर एक्का बादशहा जुगार खेळतांना रंगेहाथ अटक करण्यात आले. यावेळी त्यांच्या ताब्यातून एकुण 3 लाख 90 हजार 465 रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पो.स्टे. रायपूर येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक
अधिनियम,1887 चे कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदरची कार्यवाही सपोनि गजानन वाघ  जनसंपर्क अधिकारी बुलडाणा, सपोनि अमित वानखेडे ठाणेदार पो.स्टे.अमडापूर व शीघ्र कृती दलाचे (QRT) पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.ही कार्यवाही उशिरा रात्री पर्यंत सुरु होती तर या पथकाने पूर्ण क्लब उध्वस्त करुण टाकले.

६२ हजार ६७२ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नाशिक : भरदिवसा बंद घरांवर दरोडे टाकणारी सुरत येथील आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांची टोळी काही दिवसांपुर्वी गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने जेरबंद केली होती. त्या टोळीकडून शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सुमारे १० गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. या टोळीने सुरतच्या एका सोनाराला विक्री केलेले २२ तोळे सोने १८० ग्रॅम चांदी जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे.देशी बनावटीच्या पिस्तूलचा धाक दाखवत दरोडे टाकणारी सुरत, उत्तरप्रदेशमधील चार संशयित गुन्हेगार गुन्हे शाखेचे सहायक निरिक्षक महेश कुलकर्णी यांच्या पथकाने रात्रीच्या गस्तीदरम्यान ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून विविध गुन्हे उघडकीस आले. संशयित रियासतअली मन्सुरी (रा.चांदपूर, जि.बिजनौर, उप्र), सिकंदरखान छोटूखान पठाण, रा.जहांगीरपूरा, राधेर सुरत), अरबाज रफिकअहमद शेख, अझहर सरफराज शेख (दोघे रा. (रा.शिवालाकला, बिजनौर) हे चौघेही अट्टल घरफोडे असून त्यांचा एक सलमान शेख नावाचा साथीदार अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे. त्याचाही पोलीस शोध घेत आहे. ही टोळी गावठी पिस्तुल, दोन जीवंत काडतुसांसह दरोडा टाकण्याची पुर्व तयारी करताना पोलिसांना आढळून आले होते. त्यांनी तशी क बुलीही पोलिसांना दिली. या गुन्ह्याचे तपासी अधिकारी बलराम पालकर यांनी पोलीस कोठडीत त्यांची कसून चौकशी करत सखोल विचारपूस केली असता त्यांनी टोळीने शहरातील मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत ४, इंदिरानगर हद्दीत ३, सरकारवाडा, उपनगर, गंगापूर या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी १ असे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहे. या आंतरराज्यीय टोळीतील सगळे संशयित गुन्हेगार हे सराईत असून त्यांच्याकडून अधिक घरफोडीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत वर्तविली.हॉटेलच्या खोलीत वास्तव्यशहरातील लॉज, हॉटेलच्या खोल्यांमध्ये बेकायदेशीरपणे परराज्यातील संशयित गुन्हेगार आश्रयास येत असल्याचे समोर आले आहे. घरफोड्या, दरोडे टाकणारी ही पाच गुन्हेगारांची टोळीनेही नाशिकरोडच्या एका हॉटेलमध्ये आश्रय घेतला होता. मात्र त्या हॉटेलचालक, मालकासह कोणालाही त्यांच्या हालचालींवर संशय आला नाही. पोलिसांनी ते राहत असलेल्या खोलीतून घरफोडीतील सोन्याचांदीचे दागिणे, मोबाईल असा एकूण ६२ हजार ६७२ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

संगमनेर (प्रतिनिधी)-  घुलेवाडी शिवारातील साईकृपा ज्वेलर्सच्या मालकावर दरोडेखोरांनी हल्ला केला. मुद्देमाल लुबाडून धूम ठोकत असताना हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात रस्त्याने जाणार्‍या मोटारसायकलवरील तरुणाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. हल्लेखोर नाशिकच्या दिशेने पसार झाले.ही घटना घुलेवाडी शिवारातील आदर्शनगर येथे काल सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास घडली. सदर तरुणाचा रात्री उशिरा मृत्यू झाला. सदर सराफावर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अविनाश सुभाष शर्मा (रा. केशवनगर, घुलेवाडी) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. घुलेवाडी फाटा येथे साईकृपा ज्वेलर्स या नावाने ज्ञानेश्वर अनिल चिंतामणी यांचे दुकान आहे.काल सायंकाळी नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वर चिंतामणी हे दुकान आवरुन दुकानातील मुद्देमाल सोबत घेवून आपल्या वेगनार कार क्रमांक एमएच 12 ईएम 0107 मधून घराकडे जाण्यासाठी निघाले. आदर्शनगर येथे असलेल्या त्यांच्या घराजवळ आले. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या कारमध्ये चौघेजण होते. कारमधून तिघेजण उतरले. लाकडी दांड्याच्या सहाय्याने तिघांनी मारुती वेगनार कारवर हल्ला केला. ज्ञानेश्वर चिंतामणी यांनी आरडाओरड केला.तोपर्यंत हल्लेखोरांनी गाडीच्या सर्व काचा फोडल्या. कारमधील बॅग घेवून हल्लेखोर पसार होण्याच्या मार्गावर असतांना त्याचवेळी आवाजामुळे तेथून मोटारसायकलवरुन जात असलेले अविनाश शर्मा व वाळूंज हे दोघेजण थांबले. त्याचवेळी हल्लेखोरांच्या पांढर्‍या कारमध्ये बसलेल्या एका हल्लेखोराने शर्मा यांच्यावर गोळीबार केला. शर्मा यांच्या डाव्या मांडीतून गोळी पोटात गेली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. गोळीबार झाल्याने चिंतामणी, शर्मा यांनी आरडाओरड केला. हल्लेखोर चारचाकी वाहनातून नाशिकच्या दिशेने पसार झाले.घटनेची माहिती कळताच शहर पोलीस निरीक्षक अभय परमार हे घटनास्थळी दाखल झाले. जखमी अविनाश शर्मा यास तातडीने तांबे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र शर्मा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोषन पंडीत हे देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली. पोलीस अधिकार्‍यांना घटनेच्या तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या. दरम्यान घटनास्थळी एक जिवंत बुलेट (बंदूकीची गोळी) मिळून आले.घटनेची माहिती श्रीरामपूरच्या अतिरीक्त पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे यांना मिळाल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात जावून जखमी तरुणाची माहिती घेतली. या प्रकरणा संदर्भात पोलीस अधिकार्‍यांना त्यांनी सूचना केल्या. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

बुलडाणा - 5 फेब्रूवारी
प्रेयसीच्या घरात रात्रीच्या वेळेस मिळून आलेल्या प्रियकराला प्रेयसीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याने प्रियकराचा मृत्यू झाल्याची घटना खळबळजनक घटना आज बुधवारी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या सावळा या गावात घडली असून याप्रकरणी तामगाव पोलिस ठाण्यात प्रेयसीकडील 8 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर देवेन्द्र घिवे वय 32 याचे लग्न झालेले असून त्याचे घरासमोरच राहणाऱ्या एका युवतीसोबत मागील दोन वर्षांपासून त्याचे प्रेम संबंध होते. सदर युवतीचे लग्न 7 फेब्रुवारी 2020  रोजी होणार होते दरम्यान 4 फेब्रुवारीच्या रात्री 8.30 वाजेच्या दरम्यान ज्ञानेश्वर घिवे हा युवक प्रेयसीच्या घरात लपून बसलेल्या स्थितीत आढळून आल्याने प्रेयसीच्या नातेवाईकांनी त्याला कुऱ्हाडीचा दांड्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप मृतक ज्ञानेश्वरचे वडील देवेंद्र घिवे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केलेले असून या मारहाणीत ज्ञानेश्वरचा आज बुधवारी 5 फेब्रूवारीला शेगावात उपचारा दरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी मृतकाच्या वडिलच्या फिर्यादवरुन प्रेयसीच्या 8 नातेवाइकां विरोधात खुनाचा व दंगलीचा गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी सध्या फरार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास तामगाव पोलिस करीत आहेत.

हरेगाव (प्रतिनिधी ) आज आपल्या देशातील वातावरण दूषित झाले असून जातीजातीमध्ये विष कालवून देशाला कमकुवत करण्याचे कार्य काही प्रतिगामी शक्ति करीत आहेत. गावागावातून पिढ्यानपिढ्या एकत्र राहत आलेली माणसं आज एकमेकावर अविश्वास दाखवत आहेत. हे वातावरण देशासाठी घातक आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर देश प्रेम रुजवितांना माणुसकी अबाधित राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे. उर्दू भाषा ही या देशाची पायाभूत भाषा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्व रेकॉर्ड उर्दूमध्ये आहे. या भाषेची गोडी सुद्धा वेगळीच आहे. उर्दू शाळातुन उर्दू शिकणाऱ्यांयांची संख्या वाढली पाहिजे. असे मत पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे यांनी व्यक्त केले.
 जिल्हा परिषद उंदिरगाव उर्दू शाळेला ग्रामपंचायत हरेगाव मार्फत बांधून देण्यात आलेल्या तार कंपाउंड चे लोकार्पण व वृक्षारोपण कार्यक्रम  शाळेमध्ये संपन्न झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री पटारे बोलत होते. पंचायत समितीच्या सभापती सौ. संगीता शिंदे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, उंदीरगाव चे सरपंच सुभाष बोधक, हरे गावच्या सरपंच अस्मिता नवगिरे, दीपक नवगिरे, पंचायत समिती सदस्या वैशाली मोरे, माजी सरपंच अनिता भालेराव, उपसरपंच बाळासाहेब पवार, उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण, ग्रामसेवक एम.बी. शेळके, केंद्रप्रमुख रमेश वारुळे. शिक्षक येथे राजू इनामदार, अल्ताफ शाह आदी या प्रसंगी उपस्थित होते. ग्रामपंचायतीने बांधून दिलेल्या तार कंपाउंड चे फीत कापून सभापती शिंदे, उपसभापती तोरणे, माजी सभापती पटारे व इतर मान्यवरांनी उद्घाटन केले.  शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वच्छ भारत समर्थ भारत अंतर्गत स्वच्छतेची कव्वाली उत्कृष्टपणे सादर केली. तिला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. शाळेतर्फे सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सलीमखान पठाण, राजू इनामदार, दीपक नवगिरे, बाळासाहेब तोरणे, संगीता शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सादिक भाई शेख  मोहम्मद भाई  भाजी सात भाई शौकत भाई रमजान भाई शकील भाई भाई भाई रसूल भाई टेलर  गणीभाई  मुस्‍तकीम भाई तसेच  मुख्याध्यापक जलील शेख , उस्मान तांबोळी, अमजद आतार, हबीबा शेख, आसिफ मुर्तुजा युवराज पाटील, सुयोग सस्कर , अकिल शेख,साजिद कुरेशी, मदिना शेख,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, पालक, तालुक्यातील उर्दू शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक मोहम्मद बदर शेख यांनी मानले.

साईबाबांच्या पावनभूमी शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते प्रितम परसवाणी यांची सिंधीसमाज साईझूलेलाल ट्रस्टच्या  अद्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले त्या प्रसंगी ट्रस्टचे मार्गदर्शक सूरेश केसवाणी माजी अद्यक्ष रमेश प्रेमाणी सचिव खुपचन्द फतनानि खजिनदार गोविंद गरुड  उपअद्यक्ष गोपीचंद फुण्दवणी  ॐ  प्रकाश
प्रेमाणी नरेश दादवाणी शाम थावाणी गिरीश मेवाणी वासुदेव रोहरा प्रेम दादवाणी नन्द्लाल मोटवानी आदी उपस्थित होते त्या प्रसंगी सिंधी समाजाचे शिष्टमंडळने शिर्डीत झूलेलाल ट्रस्टच्या माध्यमातुन भव्य मंदिर बनविण्याचे संकल्प केले  आहे समाजाच्या वतीने कायम सामाजिक कार्य चालू असते अशे सांगितल्यास विखे पाटील यांनी सिंधी समाजाचे कौतुक केले सत्कार प्रसंगी शिर्डी शहराच्या नगरअद्यक्षा उपनगर अद्यक्ष सर्व नगरसेवक माजी उपनगरअद्यक्ष व विविध षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांनी आमच्या सिंधी समाजाचे सन्मान केल्याने त्या सर्वांचे झूलेलाल ट्रस्टच्या वतीने आभार मानण्यात आले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget