बुलडाणा - 5 फेब्रूवारी
बुलडाणा तालुक्यातील रायपुर पोलिस ठाणेच्या हद्दीतील भडगांव शिवारात सुरु असलेल्या जुगार क्लब वर काल सायंकाळी बुलडाणा एसपी डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या विशेष पथकाने धाड टाकून 10 जुगाऱ्यांना अटक करून 3 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंदे बंद असतांना जिल्हा मुख्यालय जवळ असलेल्या रायपुर पोलिस स्टेशन अंतर्गत बिनधास्तपणे सुरु असलेल्या या क्लब मध्ये दूर वरुन "खिलाडी" येत असताना ठानेदाराला या क्लबची माहिती नव्होती का? एसपी पथकाची या कार्यवाही मुळे हा प्रश्न उपस्थित होत आहे.
सैलानी जवळ भडगांव शिवारात एका शेतात अवैध जुगार क्लब सुरु असल्याची गुप्त माहिती बुलडाणा एसपी डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना मिळाल्या नंतर त्यांनी एक विशेष
पथक तयार केले. या पथकाने 5 फेब्रूवारीच्या सायंकाळी शेख जावेद, रा.सैलानी यांच्या शेतात पैशाच्या हारजीतवर चालणा-या एक्का बादशहा जुगार क्लबवर छापा टाकून समाधान देविदास शिंदे रा.धाड, विनोद उकर्डा परमेश्वर रा.धाड, शेख सादिक शेख अफसर रा. रायपूर, रामनाथ दगडू पिटेकर रा.पिंपळगांव सराई, शेख फिरोज शेख जानी रा. पिंपळगांव सराई, फकीर शाह हैदर शाह, रा.पिंपळगांव सराई, शेख इरफान शेख सांडू, रा. सैलानी, शेख शकील फतेमोहम्मद रा.रायपूर, रविसिंग चरणसिंग गौंड रा. सैलानी व श्रीकांत सदाशिव जैन, रा.धाड यांना पैशाच्या हारजितवर एक्का बादशहा जुगार खेळतांना रंगेहाथ अटक करण्यात आले. यावेळी त्यांच्या ताब्यातून एकुण 3 लाख 90 हजार 465 रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पो.स्टे. रायपूर येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक
अधिनियम,1887 चे कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदरची कार्यवाही सपोनि गजानन वाघ जनसंपर्क अधिकारी बुलडाणा, सपोनि अमित वानखेडे ठाणेदार पो.स्टे.अमडापूर व शीघ्र कृती दलाचे (QRT) पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.ही कार्यवाही उशिरा रात्री पर्यंत सुरु होती तर या पथकाने पूर्ण क्लब उध्वस्त करुण टाकले.
Post a Comment