Latest Post

शिरसगाव[वार्ताहर]दि.१ फेब्रु.रोजी डॉ आंबेडकर स्मारक विकास कामाच्या जागेची प्राधान्याने मोजणी करण्यात आल्याने या स्मारकाचे विकास काम लवकर पूर्ण होण्याची स्वप्ने सर्वाना दिसत आहेत.हरिगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक विकासाचे काम शासनाच्या आदेशानंतर,माजी सामाजिक न्यायमंत्री यांच्या हस्ते दि ४ नोव्हे.२०१८ रोजी झालेल्या भूमिपूजनानंतर १४ महिने झाले तरी अद्याप सुरु झाले नाही.शासनाकडून ९५ लाख रु त्यासाठी मंजूर झाले निविदा निघून वर्क ऑर्डर झाली परंतु काम सुरु झाले नसल्याने रवींद्र वाहूळ,बाळू बोर्डे,माधव झाल्टे हे तिघे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २४ जानेवारीपासून आमरण उपोषणास बसले होते.उपोषण संदर्भात २७ जाने.रोजी तातडीने अहमदनगर येथे संबंधित अधिकारी यांची बैठक झाली.हरिगाव शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालय,नगर रचना विभागीय कार्यालय येथे भेटले.दि २४ जाने.पासून अहमदनगर येथे बसलेल्या डॉ आंबेडकर स्मारक विकास काम तातडीने सुरु करणे बाबत उपोषणार्थीना पाठींबा देणेसाठी व्यापारीवर्ग,ग्रामस्थ,रिक्षा चालक मालक संघटना,हरिगाव,उन्दिरगाव आउटसाईट यांनी दि २७ जाने रोजी हरिगाव बंद शांततेत पाळला.२७ जानेवारी रोजी लेखी पत्र मिळाल्याने आमरण उपोषण स्थगित झाले.दि २८ जाने.रोजी तातडीने नगररचना अहमदनगर कार्यालयाने पुढील योग्य कार्यवाही केली.आज दि १ फेब्रु.रोजी स्मारकाजवळच्या जागेची मोजणी करण्यात आली.या कामास विशेष बाब म्हणून प्राधान्याने पाहून योग्य कार्यवाही करण्याची पाउले जिल्हाधिकारी,नगररचना अधिकारी नगर,व पुणे,तहसीलदार [नगर]सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीरामपूर,संगमनेर आदींनी तातडीने उचलल्याने १ फेब्रु.रोजी सादर जागेची पुन्हा मोजणी करण्यात आली.त्यानंतर सा.बां.विभागाचे पत्र घेऊन संगमनेर मुख्यालयकडे,तसेच इतर प्रस्ताव पूर्ण होऊन ते पुणे नगररचना,त्यानंतर जिल्हाधिकारी संबंधित शाखा,नगररचनानंतर,नासिक कार्यालय,नंतर जिल्हाधिकारी कार्यालय अशी जलद कामे संबंधित पदाधिकारी करीत आहेत त्यामुळे डॉ आंबेडकर स्मारक विकास काम जलद गतीने पूर्ण होणार असून डॉ आंबेडकर स्मारकाचे स्वप्न पूर्ण होणार असे दिसते.त्याकामी जिल्हाधिकारी कार्यालय,निवासी जिल्हाधिकारी,गृह विभाग,तहसीलदार महसूल विभाग नगर,नगररचना कार्यालय अहमदनगर,व पुणे येथील अधिकारी,यांनी नियमानुसार सहकार्य केल्याबद्दल व ग्रामस्थ व्यापारी,रिक्षा चालक मालक हरिगाव उन्दिरगाव आउटसाईट यांना ३ उपोषणार्थी यांनी धन्यवाद दिले.

वडाळा महादेव  [वार्ताहर ]  श्रीरामपूर येथील श्रीकृष्ण मंदिर, महानुभाव आश्रम चे संचालक श्रीदत्तराज बाबाजी शास्त्री  यांनी महानुभाव पंथाच्या विविध मागण्यासाठी माननीय राज्यपाल श्री कोशीयारी यांची नुकतीच भेट घेतली यावेळी श्रीदत्त जन्मस्थान बद्रिकाश्रम (गोपेश्वर चमोली, उत्तराखंड) आणि महानुभाव पंथासाठी  प्रशासनाकडुन वेळोवेळी मदत मिळावी तसेच  धर्माचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी शासनाकडून मदत मिळावी यासाठी श्रीरामपूर येथील श्रीदत्त राज बाबाजी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले  प्रसंगी माननीय राज्यपाल श्री कोशीयारी यांनी  महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान आचार प्रणाली दिनचर्या यांच्याविषयी माहिती घेऊन  आदरभाव व्यक्त केला व  शासनाकडून नक्कीच मदत करण्यात येईल  असे आश्वासन देण्यात आले आपल्यासारख्या थोर संताचे दर्शन होणे तसेच धर्मग्रंथ व तत्वज्ञान श्रवण करण्याचे भाग्य लाभल्याचे मत माननीय राज्यपाल श्री  कोशीयारी यांनी व्यक्त  प्रसंगी श्री दत्तराज बाबाजी यांच्या शुभहस्ते माननीय राज्यपाल श्री कोशीयारी यांचा  सन्मान करण्यात आला प्रसंगी श्री दिपकराज बाबाजी श्री निलेशदादा  उपस्थित होते.

बेलापूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर तालूक्यातील गळनिंब येथील तीन वर्षाची बालिका कु.ज्ञानेश्वरी नामदेव मारकड हिच्यावर तीन दिवसापूर्वी झालेल्या बिबट्याच्या हल्याने परीसरात बिबट्याची दहशत पसरल्याने अहमदनगर वनविभागाचे रेड्डी  यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक देवखिळे यांच्या सुचनेनुसार गळनिंब,कुरणपूर,फत्याबाद,मांडवे,कडित येथे तातडीने अतिरीक्त कर्मचार्‍यांसह दक्षता पथक,ट्रॅप कॅमेरा ठिकठिकाणी पिंजरे लावून यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. असे असले तरी परिसरातील ग्रामस्थ अद्यापही भेदरलेल्या परिस्थितीत आहेत त्या बिबट्याच्या तोंडाला मानवाचे रक्त लागल्यामुळे पुन्हा आणखी एखाद्यावर हल्ला होण्याच्या धा स्तीने शेतकरी शेतात जाण्यास घाबरता आहे तर शेतमजुर देखील  धास्तावले आहे कोपरगाव वनपरीक्षेत्र अधिकारी एस एम जाधव वनपाल बी एस गाढे पी एस निकम आर एस धनवडे एस एम लांडे थोरात व्ही के पवार सुरासे  .हे स्वत: सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून ठाण मांडून आहे.
    यावेळी गावातील तरूणांच्या मदतीने वन अधीकारी परिस्थीतीवर लक्ष ठेवुन आहेत विज वितरण कंपनीचे पथक देखील  परीसरात सतर्क असुन त्यामुळे विज चोरी करणारांचे धाबे दणाणले आहे.

वर्धा - 3 फेब्रूवारी
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातील नंदोरी चौकात एक तरुणांनी दुचाकीने येऊन शाळेत शिकवणीसाठी जात असलेल्या तरुण शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याची हदयविकारक घटना आज 3 फेब्रूवारीला सकाळी साढे सात वाजेच्या दरम्यान घडली आहे.
          यात घटनेत तरुण शिक्षीका जवळपा 40 टक्के जळाली असून तिला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.या घटनेला जबाबदार तरुण विकास विवेक नगराळे  व त्याचा एक मित्र असे दोघे आहे. घटनास्थळा वरून हे आरोपी फरार झाले. तरुण शिक्षीका ही शहरातील तुळसकर काॅलेज मध्ये शिकविण्यासाठी जाते असतांनाच हे तरुण आले व तिच्या सोबत शाब्दिक वाद घालून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून आरोपी फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला पुढिल पोलिस तपास सुरू आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडालेली आहे.या घटने मागचे कारण सद्या समोर आलेले नाही.

*पाथर्डी_प्रतिनिधी सचिन दिनकर*
पाथर्डी_शेवगाव येथील लांडे वस्ती (नेवासा रोड) येथे आज अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणारा किंग कोब्रा जातीचा नाग सर्पमित्र भाऊ बैरागी व शुभम मासाळकर यांनी पकडला.कोब्रा जातीच्या आठ प्रचलीत जाती पैकी हा नाग नाही.
   या बाबत सर्प मित्रांनी प्रांताधिकारी देवदत्त केकन व तहसीलदार नामदेव पाटील यांना पाथर्डी येथे दुर्मीळ कोब्रा नागाचा परिचय करून दिला.कोब्रा नागाच्या फडीवर जे प्रचलीत चिन्ह असते तसले कोणतेही चिन्ह या नागाच्या फडीवर नसून वेगळे रेषेच्या आकाराचे चिन्ह आहे.जायकवाडी धरणाच्या बाजूकडून हा नाग वस्तीवर आला असावा,असे लोकांना वाटते. याबाबत माहिती देतांना बैरागी म्हणाले,महाराष्ट्रात आशा प्रजातीचा नाग आतापर्यत कोणत्याही सर्प मित्राला आढळून न आल्याने त्याला कोणत्या नावाने ओळखावे असा संभ्रम आम्हाला पडला आहे. पण हा अत्यंत विषारी असून घनदाट जंगलात याचे वास्तव्य असावे.मनुष्य वस्तीत आशा प्रकारचे नाग सहसा आढळत नाहीत.
     आज सायंकाळी पाथर्डी-शेवगाव रस्त्यावरील निर्जन स्थळी कोब्राला निसर्गात मुक्त करण्यात आले.त्याच्या हूड मार्क चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले असून त्याचा अभ्यास सर्पमित्र संघटना करीत आहेत. यावेळी प्रांताधिकारी
 देवदत्त केकाण,तहसीलदार
नामदेव पाटील,नायब तहसीलदार
ससाणे,दीपक चन्ने,अमित टिळेकर,हरिभाऊ सानप,बनसोडे,
 उपस्थित होते.

गंगापूर (प्रतिनिधी)- मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या श्रीरामपूर आणि गुरूधानोराचे दरोडेखोर व गंगापूर पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी हवेत गोळीबार केला. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीमध्ये पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे हे जखमी झाले असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही घटना औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर भेंडाळ्याजवळ घडली.मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास महामार्गावर पाच दरोडेखोर घातक शस्त्रांसह दरोडा घालण्याच्या हेतूने फिरत असल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार गंगापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली महामार्गाकडे धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच पाच दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या पथकावर दगडफेक करून हल्ला चढवला. या वेळी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांना दगडाचा मार लागल्याने ते जखमी झाले.
(पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे)
त्यामुळे सुरवसे यांनी त्यांच्या सर्व्हिस पिस्टलमधून दोन राउंड हवेत गोळीबार केल्यानंतर दरोडेखोरांनी मिळेल त्या दिशेने पळायला सुरुवात केली. त्यातील एक दरोडेखोर गंगापूरकडे जाणार्‍या अंतापूर शिवाराच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. इतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या वेळी अटक केलेल्या दरोडेखोराचे नाव अमोल सोपान पिंपळे (19) असून त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या इतर साथीदारांची नावे दादा गोविंद साळुंके (रा. खोकर), साजन पवार (रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर), आदित्य शामराव पवार (गुरुधानोरा, ता. गंगापूर) व सागर अशी आहे. आरोपीकडून दोन चोरीच्या मोटारसायकल, एक सत्तूर, दोर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक एम.डी सुरवसे यांच्यासोबत पीएसआय अर्जुन चौधर, पीएसआय रामहरी चाटे, पोहेका जितेंद्र बोरसे, विजय भिल्ल, भागचंद कासोदे, बंडू कुचेकर, चालक दत्तात्रय गुंजाळ व चालक शेख रिझवान इब्राहिम यांनी सहभाग घेतला.

बुलडाणा - 2 फेब्रूवारी
पोलीस महासंचालक यांच्या एका पत्रा मुळे संपूर्ण बुलडाणा पोलीस दल सद्या हादरलेला आहे,,त्याचा कारणी ही तसाच आहे,एका एपीआय वर कार्यवाही करत त्यांना निलंबन नाही तर सरळ सेवामुक्त करण्यात आले आहे.
     बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात कार्यरत एपीआय करुणाशील तायडे यांना सेवामुक्त करण्याचा आदेश राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या कडून 2 दिवस अगोदर बुलडाणा एसपी कार्यालायात धळकला आहे. या बाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्याशी माहिती घेतली  असता त्यांनी सेवामुक्तची कार्यवाहीचा दुजोरा देत ते म्हणाले की एपीआय तायडे बुलडाणा येण्या अगोदर ज्या ठिकाणी ते कार्यरत होते तिथे त्यांच्या वर सदर कार्यवाही प्रस्तावित होती.या बद्दल अधिक माहिती घेतली असता एपीआय करुणाशील तायडे हे नांदेड रेल्वे पोलीस मध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर काही आरोप होते त्याची कार्यालयीन चौकशी सुरु होती व शेवटी त्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे.
     तर दूसरी कडे पोलीस दलात अशी चर्चा रंगत आहे की पोलीस विभागातील अंतर्गत वादा मुळे नांदेड येथे एका पीआई ने "चिंदी का सांप" करुण एपीआय करुणाशील तायडे यांचा बळी घेतला आहे.या कार्रवाई विरोधात तायडे गृह विभागात दाद मागणार असल्याचे कळते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget