लांडे वस्ती (नेवासा रोड) येथे आज अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणारा किंग कोब्रा जातीचा नाग सर्पमित्र भाऊ बैरागी व शुभम मासाळकर यांनी पकडला..

*पाथर्डी_प्रतिनिधी सचिन दिनकर*
पाथर्डी_शेवगाव येथील लांडे वस्ती (नेवासा रोड) येथे आज अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणारा किंग कोब्रा जातीचा नाग सर्पमित्र भाऊ बैरागी व शुभम मासाळकर यांनी पकडला.कोब्रा जातीच्या आठ प्रचलीत जाती पैकी हा नाग नाही.
   या बाबत सर्प मित्रांनी प्रांताधिकारी देवदत्त केकन व तहसीलदार नामदेव पाटील यांना पाथर्डी येथे दुर्मीळ कोब्रा नागाचा परिचय करून दिला.कोब्रा नागाच्या फडीवर जे प्रचलीत चिन्ह असते तसले कोणतेही चिन्ह या नागाच्या फडीवर नसून वेगळे रेषेच्या आकाराचे चिन्ह आहे.जायकवाडी धरणाच्या बाजूकडून हा नाग वस्तीवर आला असावा,असे लोकांना वाटते. याबाबत माहिती देतांना बैरागी म्हणाले,महाराष्ट्रात आशा प्रजातीचा नाग आतापर्यत कोणत्याही सर्प मित्राला आढळून न आल्याने त्याला कोणत्या नावाने ओळखावे असा संभ्रम आम्हाला पडला आहे. पण हा अत्यंत विषारी असून घनदाट जंगलात याचे वास्तव्य असावे.मनुष्य वस्तीत आशा प्रकारचे नाग सहसा आढळत नाहीत.
     आज सायंकाळी पाथर्डी-शेवगाव रस्त्यावरील निर्जन स्थळी कोब्राला निसर्गात मुक्त करण्यात आले.त्याच्या हूड मार्क चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले असून त्याचा अभ्यास सर्पमित्र संघटना करीत आहेत. यावेळी प्रांताधिकारी
 देवदत्त केकाण,तहसीलदार
नामदेव पाटील,नायब तहसीलदार
ससाणे,दीपक चन्ने,अमित टिळेकर,हरिभाऊ सानप,बनसोडे,
 उपस्थित होते.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget