पोलीस महासंचालक यांच्या एका पत्रा मुळे संपूर्ण बुलडाणा पोलीस दल सद्या हादरलेला आहे,,त्याचा कारणी ही तसाच आहे,एका एपीआय वर कार्यवाही करत त्यांना निलंबन नाही तर सरळ सेवामुक्त करण्यात आले आहे.
बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात कार्यरत एपीआय करुणाशील तायडे यांना सेवामुक्त करण्याचा आदेश राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या कडून 2 दिवस अगोदर बुलडाणा एसपी कार्यालायात धळकला आहे. या बाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्याशी माहिती घेतली असता त्यांनी सेवामुक्तची कार्यवाहीचा दुजोरा देत ते म्हणाले की एपीआय तायडे बुलडाणा येण्या अगोदर ज्या ठिकाणी ते कार्यरत होते तिथे त्यांच्या वर सदर कार्यवाही प्रस्तावित होती.या बद्दल अधिक माहिती घेतली असता एपीआय करुणाशील तायडे हे नांदेड रेल्वे पोलीस मध्ये कार्यरत असतांना त्यांच्यावर काही आरोप होते त्याची कार्यालयीन चौकशी सुरु होती व शेवटी त्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे.
तर दूसरी कडे पोलीस दलात अशी चर्चा रंगत आहे की पोलीस विभागातील अंतर्गत वादा मुळे नांदेड येथे एका पीआई ने "चिंदी का सांप" करुण एपीआय करुणाशील तायडे यांचा बळी घेतला आहे.या कार्रवाई विरोधात तायडे गृह विभागात दाद मागणार असल्याचे कळते.
Post a Comment