माथेफिरुने तरुण शिक्षिकेला पेट्रोल टाकुन जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न,शिक्षिका 40 टक्के जळाली
वर्धा - 3 फेब्रूवारी
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातील नंदोरी चौकात एक तरुणांनी दुचाकीने येऊन शाळेत शिकवणीसाठी जात असलेल्या तरुण शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याची हदयविकारक घटना आज 3 फेब्रूवारीला सकाळी साढे सात वाजेच्या दरम्यान घडली आहे.
यात घटनेत तरुण शिक्षीका जवळपा 40 टक्के जळाली असून तिला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.या घटनेला जबाबदार तरुण विकास विवेक नगराळे व त्याचा एक मित्र असे दोघे आहे. घटनास्थळा वरून हे आरोपी फरार झाले. तरुण शिक्षीका ही शहरातील तुळसकर काॅलेज मध्ये शिकविण्यासाठी जाते असतांनाच हे तरुण आले व तिच्या सोबत शाब्दिक वाद घालून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून आरोपी फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला पुढिल पोलिस तपास सुरू आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडालेली आहे.या घटने मागचे कारण सद्या समोर आलेले नाही.