सिल्लोड, : तालुक्यातील भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयात अंतराळवीर कल्पना चावला यांच्या स्मुर्ती दिनानिमित्त शनिवारी माता पालक मेळावा घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. या मेळाव्याला जिल्हा परिषद सदस्या सौ .शिल्पाताई अशोक गरुड, लताबाई केरे यांच्यावरील चित्रपटाचे छायाचित्रकार प्रतीक कचरे, सहाय्यक दिगदर्शक संदीप सिद्धांम, श्रीनिवास चारी, भगवान केरे, सरपंच शारदाताई महाजन, पोलिस पाटील यमुनाबाई राकडे, अंगणवाडी पर्यवेकशिका सुनीता सनान्से, रुपाली सोनवणे, रोहिणी देशमुख, सायली गरुड, नलिनी देशमुख आदिंची प्रमुख उपस्थिती होती. मी काल ही संघर्ष केला, आजही माझा संघर्ष सुरूच आहे आणि पुढेही माझ्या जिवनात असाच संघर्ष सुरू असेल. प्रयत्नांना वयाचे कोणतेही बंधन नसते. त्यामुळे जिंकणे चिरतरुण आहे. एक मुंगी सुद्धा प्रचंड समुद्र पार करून जाऊ शकते आणि हे सामर्थ्य तुमच्यातही आहे, असा सल्ला उपस्थित विद्यार्थी व माता- पालक यांना पुढे बोलताना लताबाई केरे यांनी दिला.
मेळाव्याचे प्रास्ताविक संगीता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संजना साखला यांनी केले तर आभार अनिता टाकळकर यांनी मानले.
लताबाई केरेंवर चित्रपट
पतीच्या उपचारासाठी लागणाऱ्या 5 हजार रुपयांसाठी वयाच्या 61 वर्षी सन 2013 मध्ये बारामतीत शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत लताबाई केरे धावल्या होत्या. अंगावर नऊवारी साडी, डोक्यावर पदर आणि कडाक्याच्या थंडीत अनवाणी पायांनी धावणाऱ्या लताबाई करे यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांचावर आधारीत चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
Post a Comment