Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील गोंडेगाव येथील चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह काल गोडेंगाव शिवारातील विहीरीत आढळून आला. तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. श्रीरामपूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी गावात याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे

बेलापूर( प्रतिनिधी )--कामाचे ठेके कोणीही घ्या निधी कुणीही आना पण गावचा विकास झाला पाहिजे विकास कामात कोण तक्रारी करते याचे नाव ग्रामसभेत जाहीर करा अशी जोरदार मागणी बेलापूरच्या ग्रामसभेत करण्यात आली बेलापूरचे उपसरपंच रवींद्र यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेला सुरुवात झाली ग्राम विकास अधिकारी संग्राम चांडे यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखविले यावेळी अभिषेक खंडागळे यांनी प्रभाग निहाय निधी देऊन विकास कामे करावीत कामाची ई-निविदा करूनच कामे देण्यात यावीत ग्रामपंचायतीने खरेदी केलेले एलईडी बल्ब निकृष्ट दर्जाचे असून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी खंडागळे यांनी केली यावेळी संबंधित ठेकेदाराचे बिल आदा करण्यात आले नसल्याचे ग्रामविकास अधिकारी चांडे यांनी सांगताच सदस्य विवेक वाबळे यांनी ग्रामसभेस खोटी माहिती देऊन दिशाभूल करू नका संबंधित ठेकेदाराचे बिल केव्हाच  आदा केले असल्याचे सांगितले महेंद्र साळवे यांनी गायकवाड वस्ती वर निधी खर्च केला जात नाही तसेच ठराविक ठिकाणी बल्प बसविण्यात आले असून गरजेची कामे होत नसल्याची तक्रार केली यावेळी रमेश अमोलिक सुधीर तेलोरे विजय शेलार यांनी दलित वस्ती ची कामे का होत नाही त्यास कोण विरोध करतो ते जाहीर करा विकास कामाला खोडा कोण आणतो ते जाहीर करा अशी मागणी करत दलितांची कामे होत नसेल तर आम्ही या गावात राहायचे की नाही असा संतप्त सवाल केला यावेळी अभिषेक खंडागळे यांनी आपण सर्वजण मिळून गुण्यागोविंदाने राहत असल्याचे सांगून गैरसमज करू नये  तसेच सदस्यांनाच ग्रामसभेत विकास कामाबाबत आवाज ऊठवावा लागत असेल तर ते दुर्दैव आहे असे मत मांडले वसुलीबाबत ग्रामसेवक पांडे यांनी थकबाकीदारांना एखादी योजना राबवून बाकी भरण्याकरिता उत्साहित करण्याची सूचना मानतात पत्रकार देविदास देसाई यांनी मग नियमित नळपट्टी पाणीपट्टी भरणारा चे काय असा सवाल करून बोगस नळ कनेक्शन व थकबाकी त्याबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी केली जि प सदस्य  शरद नवले यांनीघन कचरा प्रकल्प राबविणे आवश्यक आहे तसेच पाझर तलाव अशोक बंधारे गावतळी या करीता पाण्याचे आरक्षण करण्याची मागणी केली बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी कामाबाबत वेळोवेळी तक्रारी होत असल्यामुळे कामे करताना अडचणी येत असल्याचे सांगितले  ग्रामसभेत माजी सरपंच भरत साळुंके चंद्रकांत नाईक पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक प्रसाद खरात दत्ता कुरे मनोज श्रीगोड यादव काळे आदींनी सूचना मांडले यावेळी व्यायाम शाळेकरिता मराठी शाळेच्या प्रांगणात असलेल्या समाज मंदिराचा वापर करण्यात यावा अशी सूचना विजय शेलार यांनी केली त्यास देवीदास देसले यांनी अनुमोदन दिले  ग्रामसभेस सरपंच राधाताई बोंबले लैला शैख नंदा पवार दिलीप दायमा आदिसह नागरीक उपस्थित  होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील पालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद डिजिटल नगर पालिका उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये प्रजासत्ताकाचा 71 वा दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाकभाई पठाण यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख, हाजी मुजफ्फरभाई शेख, ताराचंद रणदिवे, मुक्तार शाह, जायदाबी कुरेशी, माजी नगरसेवक निसार कुरेशी, नजीर मुलानी, याकुब बागवान, कलीम कुरेशी, साजिद मिर्झा, जलीलभाई काजी, अशपाक शेख, हमीद चौधरी, अब्दुललतीफ शेख, अकिल सुन्नाभाई, अकिल आत्तार, किशोर शिंदे, अॅडवोकेट शफीअहमद शेख, हारुन शाह, जाफर शाह, असलमभाई सय्यद,डॉ.मन्सूर  सय्यद, गणीभाई टिनमेकर, फिरोज शेख, इस्माईल शाह, अमीर अलहामेद,शेख फिरोज बशीर , शेख मोहम्मद रफीक, काकर जाकिर , शेख अनीस, शेख यूसुफ इब्राहिम , शाह यूनुस , पिंजारी शमशूददीन, मन्सुरी बरकतअली आदिंसह शाळा क्र ४ व ९ चे विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी सामुदायिकपणे ध्वजारोहणापूर्वी संविधानाच्या उद्दिशकेचे वाचन केले. शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत , ध्वज गीत व देशभक्तिपर गीतांचे गायन व भाषणे केली.
शाळेच्या क्रिडा महोत्सवातील विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलतांना नगरसेवक हाजी अंजूमभाई शेख यांनी शाळेला नगरपालिकेमार्फत स्वच्छतागृहांचे काम व पेवींग ब्लॉक बसवून देण्याचे जाहीर केले.
प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली फारूक शाह,सय्यद वहीदा, नसरीन इनामदार, शाहीन शेख, जमील काकर, अस्मा पटेल, नीलोफर शेख, बशीरा पठाण, मिनाज शेख, आसिफ मुर्तुजा, एजाज चौधरी, युवराज पाटील, सदफ शेख, यास्मिन शेख, नाझिया शेख, रजिया मोमीन, सलमा शेख, सफिया शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ मुर्तुझा यांनी केले तर आभार फारुकशाह यांनी मानले.

श्रीरामपूर :- जगात भारतातील लोकशाहीचे वेगळे नाव आहे.नावाजलेल्या लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक मतदार महत्वाची भूमिका पार पडत असतो ही लोकशाही आणखी बळकटीसाठी सर्व नागरिकांसह प्राधान्याने नवमतदार तरुणांनी जागरूक मतदार म्हणून पुढे येण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या आयोगाच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून सर्वत्र २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.यावेळच्या १० व्या मतदार दिनानिमित्त जनजागृतीसाठी शहरातून काढलेल्या रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय चे राष्ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी कल्याण मंडळ,चंद्ररूप डाकले जैन वाणिज्य महाविद्यालय,खा.गोविंदराव आदिक अॅग्लो उर्दू कनिष्ठ महाविद्यालय,हजरत मौलाना मकदूम उर्दू
हायस्कूल,भि.रा.खरोड कन्या विद्यालय,डी.डी.काचोळे विद्यालय,क.जे.सोमैय्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचा समारोप समारंभ पोलीस परेड ग्राउंडवर पार पडला.त्याप्रसंगी अध्यक्षपदावरून प्रांताधिकारी अनिल पवार बोलत होते.
व्यासपीठावर नायब तहसीलदार अशोक उगले,प्रा.सादिक सय्यद,रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश कुंदे ,प्रा.जलाल पटेल,दादा साठे,डॉ.बी जी घोडके,प्रा.व्ही एम मोरे,प्रा. व्ही बी नागपुरे,प्रा.एस डी पवार,शाहीन अहेमद रियाज अहेमद आदी उपस्थित होते.
याप्रसंगी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना लोकशाहीची रचना सांगून उद्याचे मतदार होणाऱ्या विद्यार्थ्यांना सजग राहण्याचे तसेच भविष्यात नि:पक्ष मतदान करण्याचे आवाहन केले.      प्रारंभी प्रास्ताविक करताना शकील बागवान यांनी निवडणूक आयोगाची रचना,निवडप्रक्रिया व आयोगाच्या कार्याचा इतिहास,मतदार नोंदणी प्रक्रियेतील क्रमबद्धता सांगितली तसेच विद्यार्थ्यांना नवमतदाराची शपथ दिली.
याप्रसंगी विधानसभेमध्ये उत्कृष्ठ कार्य केलेबद्दल श्रीधर बेलसरे,शकील बागवान,संजीवन दिवे,जितेंद्र भगत,पुरुषोत्तम चौधरी,संदीप पाळंदे,आसमा शेख यांचा महसूल मित्र म्हणून गौरव करण्यात आला.तर मतदार नोंदणी चे कार्य सर्वोत्कृष्ठपणे पार पाडणारे केंद्रस्तरीय मतदार अधिकारी एकनाथ रहाटे,मुख्याध्यापक जलील शेख,ग्रामसेविका अलका साळवे,संभाजी फरगडे,रामदास जाधव,प्रशांत दर्शने यांचा बहुमान करण्यात आला.राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध  स्पर्धेतील विजेत्यांना गुलाबपुष्प व प्रशस्तीपत्रकाने सन्मानित करण्यात आले.       
सूत्रसंचालन शकील बागवान यांनी केले तर प्रा.जलाल पटेल  यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बुलडाणा - 24 जानेवारी
घरफोडी व चोरीच्या प्रकरणात असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी आज 24 जानेवारी रोजी सकाळी बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लोणी लव्हाळा गावात गेले असता आरोपीची पोलिसांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी पारध्यांनी पोलिस पथकावर प्राणघातक हल्ला केला. यात चार पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले तर या झटापटीत आरोपी पोलिसांच्या हाताला झटका देवून पसार झाला. 
        अमडापूर, साखरखेर्डा या पोलिस स्टेशनमध्ये चोरी, घरफोडी सारखे गुन्हे दाखल असलेला आरोपी जखमेश्वर शेनफळ शिंदे हा साखरखेर्डा पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम लोणी लव्हाळा येथे आलेला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाला. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक आढाव, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय मोरे, पोहेकॉ सुधाकर काळे, सैय्यद हारुण, संजय नागवे, मपोका अनुराधा उबरहंडे व चालक रविंद्र भिसे हे लोणी लव्हाळा येथे सकाळी 8 वाजेच्या सुमारास पोहचले. आरोपी जखमेश्वर शिंदे हा पोलिसांना पाहून पळाला. त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले असता अचानक आरोपीचे नातेवाईकांनी पोलिस पथकावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करत दगडफेक केली. इतकेच नव्हेतर उकळता चहा देखील पोहेकॉ सुधाकर काळे यांच्या अंगावर फेकला.या झटापटीत आरोपी जखमेश्वर हा हातातून पळून जाण्यास यशस्वी झाला.या प्राणघातक हल्ल्यात विजय मोरे, सुधाकर काळे, आढाव, संजय नागवे जखमी झाले आहे. या प्रकरणी स्था.गु.शा.चे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय मोरे यांच्या फिर्यादीवरुन साखरखेर्डा पोलिस ठाण्यात आरोपी जखमेश्वर शिंदे, शेनफळ शिंदे, रवि उर्फ बबल्या, शिवगंगा शिंदे,आरती, वैशाली, सुनिता भोसले व इतर अनोळखी तिन पुरुष, दोन महिला यांच्या विरोधात भादविची कलम 143,147,148,148, 332,353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ठानेदार संग्राम पाटील करीत आहे.या अगोदर ही या गावात पारध्यांनी पोलिस पथकावर हल्ले केलेले आहे,हे विशेष.

बुलडाणा - 23 जनवरी
अन्न व औषध प्रशासन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या स्वजिल्ह्यात काही वेळा पूर्वी खामगांव येथील गुटखा माफिया "राठी" च्या "सुरुची ट्रेडर्स" वर अमरावती येथील सहायक आयुक्त वाकडे अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या पथकाने स्थानिक पोलिस प्रशासनाची मदत घेत छापा मारला परंतु जेंव्हा हे पथक सदर ठिकाणी पोहोचली असता त्यांच्या हाती काहीच आले नाही.शहरात अशी चर्चा आहे की,राठी ला अगोदरच या रेड ची माहिती मिळाली होती म्हणून त्याने सर्व माल गायब करून टाकला, आता अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची ही नामुशकि चर्चेचा विषय बनला आहे,,आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की राठीला अगोदरच या कार्यवाहीची माहिती देणारा तो "घर का भेदी"  कोण??अन्न व औषध प्रशासनातला की पोलिस विभागातील??? तर दूसरी कडे अशीच धाड चिखलीत गुटखा किंग "हाजी" च्या ठिकाणावर ही टाकण्यात आल्याचे समझते.चिखली मध्ये 2 ठिकाणी फक्त एक ते दीड लाखाचा गुटखा पकडण्यात आला आहे तर बातमी लिहिस्तव चिखलीत कार्यवाही सुरु होती.

अहमदनगर (प्रतिनिधी)-कॉलेजचे शिक्षण घेणार्‍या मुलीचे लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणात लोणीचे विखे आरोपीच्या पिंजर्‍यात उभे ठाकले आहेत. विराज राजेंद्र विखे असे या गुन्ह्यातील आरोपीचे नाव असून नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात तसा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी तो लोणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.354 (ड) 506, 507 सह महिलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 11(4),12 सहा माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी) (डी) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडित मुलगी ही नगरच्या आगरकर मळा भागात राहणारी असून तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 2017 ते 2018 याकाळात प्रवरानगरच्या पद्मश्री विखे पाटील जुनिअर कॉलेज परिसरात ही घटना घडली.पिडित तरुणी ही 2017 ते 2018 मध्ये प्रवरानगर (लोणी) येथे पद्श्री विखे पाटील ज्युनियर व सीनियर कॉलेजला शिक्षण घेत असताना विराज विखे यांनी तिचा सतत पाठलाग केला. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू जर मला होय म्हणाली नाही तर मी माझे जीवाचे बरे-वाईट करीन’ असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.त्यानंतर पिडित तरुणी शिक्षण अर्धवट सोडून अहमदनगर येथे आली. येथे पुढील शिक्षण घेत असताना विराज विखे यांनी विराज विखे, श्रद्धा कानडे पाटील, स्मिता अशा नावाने फेसबुक अकौंट ओपन केले. त्यावर पिडित तरुणीच्या नावाचा वापर करून बदनामी करण्याच्या हेतूने नातेवाईकांना फ्रेंड रिक्वेस्ट टाकली. आरोपी  नगरात असल्याचे लोकेशन फेसबुकवर टाकून पिडितेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करून पाठलाग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.कॉलेजचे शिक्षण घेणार्‍या मुलीचे लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणात विराज राजेंद्र विखे वर गुन्हा दाखल झाला आसून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे पुढील तपास रहाता पी. आय. सुभाष भोय करीत आहे. 

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget