Latest Post

शिर्डी -  श्री.गेणू हे श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता शिर्डी येथे आले होते. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी त्‍यांचे स्‍वागत करुन सत्‍कार केला. यावेळी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मॉरिसशचे श्री.जी.ए.गणू, स्‍टर्लिंग प्रकाशनचे अध्‍यक्ष श्री.सुरेंद्र के.घई, राकेश जुनेजा आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना श्री.गेणू म्‍हणाले, मॉरिशस या देशात सुमारे ६० टक्‍के हिंदु लोक वास्‍तव्‍य करतात. तसेच मॉरिशसमध्‍ये सुमारे ५ ते ६ श्री साईबाबांची छोटी- छोटी मंदिरे असून या‍ ठिकाणी भाविक बाबांच्‍या दर्शनाकरीता गर्दी करतात. यामुळे आम्‍ही गंगा लेख येथे श्री साईबाबांचे भव्‍य मंदिर बांधण्‍याचे ठरवले असून यासाठी जागाही निश्चित करण्‍यात आली असल्‍याचे सांगून आज श्री साईबाबांच्‍या दर्शन घेवून अतिशय आनंद झाला असल्‍याचे ही श्री.गेणू यांनी सांगितले.

बेलापुर (-प्रतिनिधी )- शिवसेना खा.संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे  मारून  प्रतिमा दहन केली.               छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्याकडे छञपतीचे वंशज असल्याचे पुरावे मागणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात भारतीय जनता पार्टी,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेलापूर विभाग,छत्रपती तरुण मंडळाच्या कार्यकत्यांनी खा संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडो मारो मारून प्रतिमेचे दहन केले.या वेळी  विष्णुपंत डावरे,भाजपा बेलापूर शहर अध्यक्ष प्रफुल्ल डावरे,संघटन सरचिटणीस पुरुषोत्तम भराटे चिटणीस राकेश कुंभकर्ण युवा मोर्चा अध्यक्ष धनंजय (पप्पु) पोळ  ,राहुल माळवदे,रोहित शिंदे,विकि माळवदे,प्रुथ्वीराज कोळसे,अमोल खैरे,महेश कुंभकर्ण,शुभम् भराटे, स्वप्निल खैरे,सचिन काळे,मनोज माळवदे,अनिकेत भडके,किरण माळवदे,प्रतिक भराटे, तुषार पवार,विकास बोरूडे, सागर ढवळे,प्रकाश जाजु, प्रशांत ढवळे, भास्करराव कोळसे प्रभाकर ढवळे यांच्या सह कार्यकर्त्यांनी खा,राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले

बुलडाणा - 16 जानेवारी
बुलढाणा कारागृहात आज रात्री एका न्यायालयीन बंदिचा मृत्य झाला असून त्यांचा शव पोस्टमार्टम साठी अकोला येथील मेडिकल कॉलेजला रवाना कण्यात आला आहे.
      बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील वार्ड नम्बर 14 मध्ये राहणारे 60 वर्षीय मृतक शालिकराम पांडुरंग उम्बरकर यांच्यावर नांदुरा ठाण्यात वर्ष 2017 मध्ये शेजारी राहनारी एका अल्पवायीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असल्याने बलात्कार व पोक्सो कायद्या नुसार गुन्हा दाखल झाला होता.आरोपीला नांदुरा पोलीसाने अटक केली व तेव्हां पासून ते न्यायालयीन कस्टडी मध्ये बुलडाणा कारागृहात होते.काल 15 जानेवारीला आरोपी उम्बरकर यांची तब्यत बिघडल्याने त्यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल कण्यात आले व रात्री त्यांचा निधन झाला.आज दुपारी मा. न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे,उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते,ठानेदार शिवाजी कांबळे,जेलर भामरे नायब तहसीलदार अमरसिंह पवार,पीएसआई करुणाशील तायडे,अमित जाधव यांच्या उपस्थितीत पंचनामा करुण शव पोसटमार्टम साठी अकोला मेडिकल कॉलेज ला पाठविन्यात आले आहे.

बुलडाणा - 16 जानेवारी
येथील सहकार विद्या मंदिर येथे शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत श्रीकांत निंबोकार हे खामगांवहुन परत येत असतांना त्यांच्या मोटरसाइकिलला रान डुककरने  जोरदार धड़क दिल्याने ते गंभीर जख्मी झाले व उपचारा आभावी जागेवरच मरण पावले.ही दुर्दैवी घटना आज सकाळी भादोला जवळ उघडकिस आली आहे.
      मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत देवीदास निम्बोकार (वय 32) रा. बोबडे कॉलोनी,खामगांव हे मागील 10 वर्षा पासून बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिर येथे शारीरिक शिक्षक या पदावर कार्यरत होते.काल 15 जानेवारीला रात्री 10 वाजेच्या सुमारास ते आपली मोटरसाइकिल ने खामगांवहुन बुलडाणा कडे येत होते दरम्यान भादोला गावा जवळील पेट्रोल पंपा जवळ त्यांच्या बाइकला रान डुकराने जोरदार धडक दिली व ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला रात्रिची वेळ असल्याने त्यांना कोणतीही मदत वेळेवर मिळू शकली नाही.आज सकाळी भादोलाचे पोलिस पाटील सूर्यकांत गवई व इतर काही लोक मॉर्निंगवॉक साठी वरवंड फाट्या कडे जात असतांना त्यांना शिक्षक निबोकार हे पडून दिसले याची माहिती बुलडाणा ग्रामीण पोलिसाला दिल्याने बिटजमादार रमेश बनसोडे, जनार्धन इंगले घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करुण शव बुलडाणा सामान्य रुग्णालयात नेन्यात आले.ही माहिती सहकार विद्या मंदिर च्या इतर शिक्षकांना मिळताच शोककळा पसरली.या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अहमदनगर - नगर - सोलापूर महामार्गावरील मांडवगण शिवारातील अपघातात मयत झालेले चापोहेकाँ शहाजी भाऊराव हजारे यांच्या वारसदार पत्नी लता शहाजी हजारे यांना ३० लाख रुपयांचा अपघात विमाचा चेक प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी शहर पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, एचडीएफसी बँकेचे शाखा प्रमुख विशाल खडके, उपशाखा प्रमुख उपस्थित होते.
कै. शहाजी हजारे यांचा अपघात दावा ते वेतन घेत असलेल्या एचडीएफसी बँकेकडे पाठविण्यात आला होता. हा दावा बँकेने तातडीने निकाली काढून कै.हजारे यांच्या वारस पत्नीस अपघात विमाची रक्कम मिळून दिली. यासाठी प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील व शहर पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके आदिसह कार्यालयीन पाठपुरावा करुन मयत पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मदत केली आहे. 

बुलडाणा - 15 जानेवारी
बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव-चिखली मार्गावर कार अपघातात 2 जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवारी 15 जानेवारीच्या सकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली.जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलाचा समावेश असून त्यांना उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे.चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून  वर्तविण्यात येत आहे.
        सद्या पुण्यात स्थायिक लोक काही कामानिमित्त एमएच-30-एटी-3009 क्रमांकाच्या कारने खामगाव तालुक्यातील कांचनपूर या आपल्या मूळ गावी येत असतांना आज बुधवारी पहाटे 7 वाजेच्या दरम्यान खामगांव-चिखली मार्गावरील अमडापूर या गावा नजीक कार रस्त्याच्या बाजूने खोदलेल्या नालीत कोसळली. यामध्ये पार्वताबाई प्रकाश बहुरुपे (50) व प्रीती विलास बहुरुपे (24) यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रकाश प्रल्हाद बहुरुपे (60), स्नेहल श्रीकांत भोजने (27) व विलास श्रीकांत भोजने (दीड वर्ष ) असे तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच अमडापुर ठाणेदार अमित वानखडे यांनी एएसआय टेकाळे, परमेश्वर शिंदे, तडवी, वैद्य यांना घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन जखमी व मृतकांना चिखली येथील ग्रामिण रुग्णालयात पाठविले.चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडल्याची आशंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बुलडाणा - 15 जानेवारी 
भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन विवेकानंद आश्रमाच्या वतीने आयोजित विवेकानंद जन्मोत्सव सोहळयास आज बुधवार ता.15 पासून हिवरा आश्रम ता.मेहकर येथे सुरूवात होत असून कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या आसनस्थ रथारूढ प्रतिमेची सवाद्य शोभा यात्रा हे प्रमुख आकर्षण राहणार आहे. 
        या शोभायात्रेसाठी पंचक्रोशीतील दिंड्या,पालख्या व भजनी मंडळे यांचे विवेकानंद नगरीकडे आगमन सुरू झाले आहे. दि 15 जानेवारी ते 17 जानेवारी असे तीनही दिवस यानिमित्त भरगच्च सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शेवटच्या दिवशी तीन लाख भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून सांगता करण्यात येईल. तीनही दिवस सकाळी थुट्टे शास्त्री महाराज यांचे व्याख्यान तर दि.15 जानेवारी रोजी विवेकानंद आश्रम संगीत विभागाचे अनुभूती गायन व अभंग गायन,हभप येवले शास्त्री महाराज यांचे प्रवचन होईल. हभप प्रकाश महाराज जवंजाळ यांचे कीर्तन,डॉ.विकास बाहेकर यांचे प्रवचन,विवेकानंद विचारदूत जान्हवी केळकर यांचे व्याख्यान,हभप महादेव महाराज राऊत यांचे कीर्तन पार पडणार आहे. विवेकानंद जन्मोत्सव हा व्हिलेज ते ग्लोबल असा सर्वदूर पोहोचला असून, तीनही दिवस चालणा-या भरगच्च कार्यक्रमांचे विवेकानंद आश्रमाच्या युट्यूब वाहिनीसह सोशल मीडियाद्वारे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.  गतवर्षी तब्बल साडेचार लाख भाविक व भारतीयांनी हे लाईव्ह प्रक्षेपण जगाच्या विविध भागात पाहिले होते. त्यादृष्टीने विवेकानंद आश्रमाच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाने चोख नियोजन केले आहे.  तीनही दिवसांच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते यांनी केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget