Latest Post

बुलडाणा-13 जानेवारी
दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देणाऱ्या एका तोतया परिक्षार्थी परीक्षा देत असल्याचा गंभीर  प्रकार  समोर आलाय. बुलडाणा येथील संजय दांडगे याच्या आसनावर औरंगाबाद जिल्ह्यातील राजेवाडीच्या चंदन बहुरे या आरोपीला परीक्षा देतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
       बुलडाणा येथील शारदा विद्यालयात 12 जानेवारीला अनुसुचित जमातीची विशेष भरती मोहीम सरळसेवा भरती आयोग, आरोग्य सेवा पुरुष या पदासाठी परिक्षा घेण्यात आली.  आरोग्य सेवक पदाची परीक्षा देत असतांना बुलडाणा येथाल संजय विनायक दांडगे याच्या आसन क्र. 1491 वर चंदन बहुरे हा संशयास्पद परीक्षार्थी केंद्राध्यक्ष पवार यांना आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळ सॅमसंग कंपनीचा स्मार्ट फोन व पॅन कार्ड आढळून आले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात संजय हिवाळे यांनी फिर्याद दिल्यावरुन आरोपी विरोधात भादवी ची कलम 420 नुसार गून्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला अटक कण्यात आलेआहे. 
.

अहमदनगर – विना परवाना गांजाची वाहतूक करताना कोतवाली पोलीसांनी पकडलेल्या आरोपीने आज सकाळी जिल्हा रुग्णालयातून पोलीसाच्या हातावर तुरी देत पलायन केले. सागर रामचंद्र धनापुरे (रा. तपोवन रोड, सावेडी) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. सकाळीच झालेल्या या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात गोंधळ उडाला असून पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर आहेत. या प्रकरणामुळे 'कोतवाली' पोलिसांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
कोतवाली पोलीसांनी तीन दिवसापूर्वी नगर-पुणे महामार्गावर केडगाव बायपास येथे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला होता. यातील सागर धनापुरे हा एक आरोपी होता.दोन दिवसापासून सागरच्या पोटाचा त्रास होत असल्याने रविवारी रात्री कोतवाली पोलीसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. आज सकाळी एक पोलीस कर्मचारी त्याला जिल्हा रुग्णालयात प्रांत:विधिसाठी घेऊन जात असताना त्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका मारून धूम ठोकली.
कर्मचाऱ्यांने त्याचा पाठलाग करत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो पसार झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे.

उम्मती फौंडेशनच्या 'उम्मती मॅरेज ब्युरो' या मोफत विवाह ब्युरोच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. 'उम्मती मॅरेज ब्युरो' चे उदघाटनासाठी अध्यक्ष म्हणून अहमदनगर शहरातील प्रसिद्ध धर्मगुरू मौलाना खलील तर प्रमुख पाहुणे म्हणुन मुफ्ती रिजवान, वकील संघाचे मा.अध्यक्ष अ‍ॅड. वाय. के.शेख, अ‍ॅड.रफिक शेख टी. सी, प्रा.बँकेचे संचालक पत्रकार सलीम पठाण, नगरसेवक मुख्तार शाह, अल्तमश पटेल, मेहबूब कुरेशी, मौलाना इस्माईल, डॉ.अफरोज तांबोळी, साजिद मिर्जा आदी उपस्थित होते.
       कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उम्मतीचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला यांनी हे विवाह ब्युरो संपूर्णपणे मोफत असून यात सर्वधर्मीय तरुण मुला-मुलींच्या बायोडाटाची संपूर्ण आणि अद्ययावत नोंद ठेवण्यासाठी अत्याधुनिक असे दालन उपलब्ध आहे तसेच हा मॅरेज ब्युरो विवाहयोग्य उमेदवारांच्या सामन्याचे तपशील जाणून पालकांची तातडीची गरज भागवण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. अध्यक्ष मौलाना खलील यांनी ब्युरोच्या कार्यप्रणाली विषयी उपस्थित पालकवर्गांना कानमंत्र दिला. अ‍ॅड. वाय.के.शेख यांनी विवाह ब्युरोच्या कायदेविषयक विविध बाबींचा ऊहापोह केला. ईतर सर्व मान्यवरांनी 'उम्मती' च्या अभिनव मोफत उपक्रमाचे तोंडभर कौतुक करून कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत केले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव डॉ.तौफिक शेख यांनी केले तर आभारप्रदर्शन अ‍ॅड.आरिफ शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष फिरोज पठाण, खजिनदार शाकिफ शेख, समीर शेख, माजिद मिर्जा, डॉ.सुदर्शन रानवडे, इंजि.अयाज शेख, दानिश पठाण, अरबाज बेग, सुलतान शहा, नवेद तांबोळी, शाहरुख बागवान आदींनी विशेष परिश्रम घेतले.

बेलापूर( प्रतिनिधी  )--प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला असला तरी तालुक्यातील अकरा हजार शेतकऱ्यांचे आधार जुळत नसल्यामुळे त्यांनी तातडीने सेतू केंद्रात जाऊन आपले आधार जुळवून घ्यावे व शेतकरी सन्मान योजनेस पात्र व्हावे असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केली आहे शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेची माहिती देण्याकरिता तहसीलदार प्रशांत पाटील हे बेलापूर येथे आले होते  या वेळी जमलेल्या शेतकऱ्यांना या योजनेविषयी माहिती देताना तहसीलदार पाटील म्हणाले की आधार कार्ड वरील माहिती व पोर्टल वरील माहिती चुकीची
असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी अर्ज दुरुस्त करून घेतल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे शेतकऱ्याने केवळ आधार कार्ड घेऊन सेतू केंद्रात जावयाचे आहे त्या ठिकाणी केवळ दहा रुपये फी घेऊन आपले आधार अपडेट केले जाईल कर्जमाफी बाबत बोलताना तहसीलदार पाटील म्हणाले की कर्जमाफी च्या याद्या बँकाकडून मागण्यात आलेल्या आहेत परंतु अजूनही शेतकऱ्यांनी आपले आधार आपल्या बँक खात्यास लिंक केलेले नाही आठ दिवसात शेतकऱ्यांनी आपले खाते आपल्या आधार कार्डास लिंक करून घ्यावे आपल्या अज्ञानामुळे आपण कर्जमाफी  पासून वंचित राहू नये दुष्काळ निधी ची सर्व कागदपत्रे व अहवाल वरिष्ठांकडे पाठवलेला आहे परंतु अद्याप अनुदान आलेले नाही अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचीही पंचनामे करण्यात आले असून निधी येताच त्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग केली जाईल यावेळी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक उपसरपंच रवींद्र खटोड चंद्रकांत नाईक कामगार तलाठी कैलास खाडे मिलिंद दुधाळ दत्ता कुर्हे  रमेश वाबळे ज्ञानदेव वाबळे बाळासाहेब लगे बेलापूर सेवा संस्थेचे चेअरमन अनिल नाईक मनोज श्रीगोड कलेश सातभाई सेतू चालक  प्रसाद लड्डा इंगळे आदी सह अनेक शेतकरी उपस्थित होते प्रास्ताविक पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर उपसरपंच रवींद्र खटोड यांनी आभार मानले

🔹आरोपी
 5 दिन पुलिस कस्टडी में

बुलढाणा- 10 जनवरी

देशभर में चर्चित "हीरा गोल्ड" फ्रॉड मामले में बुलढाणा आर्थिक गुनाह सेल ने मुख्य आरोपी नव्हेरा शेख को कल 9 जनवरी को मुंबई से कोर्ट के आदेश पर गिरफ्तार किया है.बता दे कि इस कंपनी में देशभर के लाखों लोगों ने करोडो-अरबों में अपनी रकम इन्वेस्ट की हुई है.
      नव्हेरा शेख ने "हीरा गोल्ड" नामक कंपनी के माध्यम से लोगो को व्यापा में अपनी रकम इन्वेस्ट कर मुनाफा देने का झांसा दिया इस मामले में देश के कई राज्यों में नव्हेरा शेख के खिलाफ अपराध दर्ज हुए और पिछले करीब 2 साल से नव्हेरा शेख को विभिन्न इलाकों की पुलिस अपनी हिरासत में ले रही है.वर्ष 2018 में बुलढाणा शहर थाने में भी नव्हेरा शेख के खिलाफ अपराध दर्ज हुआ था जिसकी सुनवाई बुलढाणा की सेशन कोर्ट में जारी थी किंतु नव्हेरा शेख कोर्ट में निरंतर अनुपस्थित  रही जिसका संज्ञान लेते हुए बुलढाणा सेशन कोर्ट ने प्रॉडक्शन वारंट जारी करते हुए आरोपी नव्हेरा शेख को गिरफ्तार करने का आदेश दिया पश्चात बुलढाणा आर्थिक गुनाह इकाई की टीम ने 9 जनवरी को  मुंबई की भायखला महिला जेल से आरोपी को गिरफ्तार कर आज 10 जनवरी को बुलढाणा सेशन कोर्ट के सामने पेश किया जिसे आगामी 5 दिन तक पीसीआर में रवाना कर दिया गया है.मामले की अधिक जांच आर्थिक गुनाह सेल के उपविभागीय पुलिस अधिकारी डी. बी.तडवी कर रहे है.

शिर्डी : साईबाबांनी आपल्या हयातीत आपले नाव, गाव, जात, धर्म उघड केला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र साईबाबांच्या जन्मस्थळ असलेल्या परभणी जिल्ह्यातील पाथरीचा विकास करणार असल्याचे सांगून शिर्डीकर व भाविकांची नाराजी ओढवून घेतली आहे.साईसमाधी शताब्दी सोहळ्यात राष्ट्रपतींनी साईबाबांच्या जन्मस्थानाचा उल्लेख केला होता. यावर साईभक्त व शिर्डीकरांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, कमलाकर कोते यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिर्डीकरांनी दिल्लीत जाऊन थेट राष्ट्रपतींची भेट घेऊन जन्मस्थानाचा खुलासा केला होता. आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी जन्मस्थानाचा उल्लेख केल्याने पुन्हा भाविक व शिर्डीकरांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.साईबाबांबद्दल अधिकृत डॉक्युमेंट म्हणून साईसतचरित्र हेच आहे. साईसतचरित्रात कुठेही साईबाबांच्या जन्म व जन्मस्थळाचा उल्लेख नाही. ज्या बाबी ज्ञात नाहीत त्या अज्ञात आहेत. त्याबद्दल अधिकृत बोलणे कठीण वाटते, असे साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावर यांनी सांगितले.पाथरीच्या विकासाला मदत करण्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र पाथरी या गावाचा साईबाबांचे जन्मस्थान असा उल्लेख करण्याला साईभक्त आणी शिर्डीकरांचा आक्षेप आहे. साईबाबांनी आपला जन्म, गाव, जात, धर्म याबद्दल कधीच कोणाला सांगितले नाही. यामुळेच बाबांची प्रतिमा सर्वधर्म समभावाची आहे. अलीकडच्या काळात जाणीवपूर्वक साईबाबांच्याच विचाराला नख लावण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे देश विदेशातील करोडो साईभक्तांच्या भावना दुखावल्या जात आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे साईबाबांचे निस्सीम भक्त असल्याने त्यांनी ग्रामस्थ व साईभक्तांच्या भावना समजावून घ्याव्यात, असे माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी सांगितले.

मुंबई - पुणे येथील एमटी विभागात डीआयजी पदावर होते असलेले डीआयजी निशिकांत मोरे यांचे अखेर गुहा विभागाने निलंबन केले आहे. विनयभंगाचा आरोप असणारे डीआयजी निशिकांत मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आजच फेटाळण्यात आल्यानंतर गृह विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीने विनयभंगाचा आरोप केल्याने तळोजा पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी घरात चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेली पीडित मुलगी अजून सापडली नाही. याप्रकरणी देखील मुलगी हरवल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. आज मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही तात्काळ निलंबनाची कारवाई केली.निशिकांत मोरे यांच्याविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण अन्वेषणाधीन आहे. तसेच मोरे यांच्याविरुद्ध पोलीस महासंचालक यांनी शासनास सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आज गृह विभागामार्फत शासन आदेश निर्गमित करुन मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे गृह मंत्री देशमुख यांनी सांगितले. नेमके काय आहे प्रकरण?खारघरमध्ये वास्तव्यास असलेले आणि पुणे येथे मोटर ट्रान्सपोर्ट (एमटी) विभागात कार्यरत असलेले पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी)  निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेली अल्पवयीन मुलगी सोमवारी रात्रीपासून बेपत्ता आहे. तळोजा येथील घरातून सर्व झोपल्यानंतर रात्री 11-12च्या दरम्यान ती निघून गेली. जाताना तिने घरात सुसाईड नोट लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली.पॉक्सोप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळलापरिचित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा मोरेंवर आरोप करण्यात आला आहे. मोरे यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी तळोजा आणि खारघर पोलीस ठाण्यात गेल्यावर तक्रार दाखल करून घेतली नसल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी अलीकडेच खारघरमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे यावेळी मुलींना वडिलांनी सांगितले होते. तळोजा वसाहतीत वास्तव्यास असलेले, विकासक असलेले पीडित मुलीचे वडील आणि डीआयजी निशिकांत मोरे यांची आठ वर्षांपूर्वी खारघरमध्ये ओळख झाली होती. मोरे यांनी त्यांच्याकडून दुकान गाळे विकत घेतले होते. काही पैसे रोख देऊन गाळ्याचा ताबा घेऊन उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप तक्रारदाराने ऑगस्ट महिन्यात पोलिसांकडे लेखी स्वरूपात केला होता. दरम्यान, जून महिन्यात १७ वर्षांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी निमंत्रण नसतानाही मोरे घरी आले. केप कापून मुलीच्या गालावर आणि शरीरावर केक लावून अश्लील वर्तन केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे तळोजा पोलिसांनी सांगितले होते. मात्र, दरम्यान अटक टाळण्यासाठी मोरे यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget