Latest Post

अहमदनगर (प्रतिनिधी)  जिल्ह्यातील पाच सराईत गुन्हेगारांवर नगर पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. या पाचही अट्टल गुन्हेगारांना नाशिक जेलमध्ये रवाना करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांनी दिली.प्रशांत ऊर्फ पांड्या साईनाथ लेकूरवाळे (रा. निमगाव खैरी, श्रीरामपूर), गणेश ऊर्फ सोमनाथ बापूसाहेब हाळनोर (रा. फत्याबाद, श्रीरामपूर), कमलेश दिलीप डेरे (रा. धांदरफळ, संमगमनेर), संतोष राघू शिंदे (रा. राजापूर, श्रीगोंदा) आणि राजू ऊर्फ राजेंद्र भाऊ गागरे (मांडवे खुर्द, पारनेर) अशी स्थानबध्द केलेल्या पाच सराईतांची नावे आहेत. पारनेर, संगमनेर, श्रीरामपूर, लोणी, बेलवंडी या स्थानिक पोलिस पोलीस अधिकार्‍यांनी एमपीडीएचा प्रस्ताव तयार करून एसपींकडे पाठविला. एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांनी त्याची पडताळणी करत तो कलेक्टरांकडे पाठविला.कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी या पाचही जणांना एक वर्षासाठी नाशिक जेलमध्ये स्थानबध्द ठेवण्याचा अंतिम आदेश पारीत केला. त्यानंतर एलसीबीच्या टिमने या पाचही सराईत गुन्हेगारांची रवानगी नाशिक जेलमध्ये काल (दि.24) केली. सराईतांची कुंडली प्रशांत लेकुरवाळे विरोधात दरोडा, अपहरण, गणेश हाळनोर विरोधात सरकारी कामात अडथळा, हत्यार प्रतिबंध कायदा, कमलेश डेरे विरोधात चोरी, हाणामारी, संतोष शिंदे विरोधात चोरी, खुनी हल्ला आणि राजू गागरे विरोधात सरकारी कामात अडथळा आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आगामी काळात वाळू तस्कर, हातभट्टी दारू माफियांविरोधात एमपीडीएचे प्रस्ताव तयार करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पीआय दिलीप पवार यांनी दिली.

चिखली- 24 डिसेंबर
केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 ( CAA ) च्या समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी नागरिक समिती तर्फे आज मंगळवार दि. 24 डिसेंबर रोजी एकता मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विविध राजकीय पक्ष, सामाजिक व सांस्कृतिक संस्था, संघटना तसेच नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदारांना निवेदन सादर करून चिखलीकरांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन केले.
         भारताच्या शेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन आणि ख्रिश्चन या धर्माचे अनुयायी तेथे अल्पसंख्याक म्हणून गणले जातात. अश्यांना धार्मिक छळाला सामोरे जावे लागत असल्यास त्यांना भारताचे नागरीकत्व देण्याची तरतूद असलेला नागरिकत्व सुधारणा कायदा - 2019 ( CAA ) संसदेत पारित केला. या कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली असून देशभरात हा कायदा लागू झाला आहे. परंतु, काही राजकीय पक्ष व संघटना आपल्या स्वार्थासाठी जाणीवपूर्वक विशिष्ट धर्मियांमध्ये गैरसमज पसरवून देशात हिंसाचार माजवत आहेत. अश्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी आणि या कायद्याचे समर्थन करण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक समिती,चिखली तर्फे 24 डिसेंबर रोजी एकता मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून दुपारी 12 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. जयस्तंभ चौक, सीमेंट रोड, चिंच परिसर आणि नगर पालिका कार्यालयासमोरुन मार्गक्रमण करीत हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहचेला. त्यानंतर राष्ट्रप्रेमी नागरिक समिती तर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.शांततामय पध्दतीने निघालेल्या या मोर्चातील सहभागींनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ विविध घोषवाक्यांचे फलक हातात धरले होते. "भारत माता की जय" तसेच "वन्दे मातरम्" अश्या घोषणा मोर्चेकऱ्यांनी दिल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक अरविंद असोलकर, नगर संघचालक शरद भाला, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय कोठारी, सुरेशअप्पा खबुतरे, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, शहराध्यक्ष सुरेंद्र प्रसाद पांडे, अॅड. मंगेश व्यवहारे, रामकृष्णदादा शेटे, प्रेमराज भाला, राजेंद्र व्यास, अॅड. जयश्री कुटे, प्रा. निळूभाऊ चौधरी, रमेश बाहेती, सचिव गोविंद गिनोडे, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, शिवराज पाटील, अमोल साठे, अजय बिडवे, हनुमंत भवर, नंदकिशोर काछवाल, अशोक अग्रवाल, सतीश शिंदे, कुणाल बोंद्रे, नगरसेवक गोविंद देव्हडे  यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. सामुदायिक राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला.

बुलडाणा- 23 डिसेंबर
जिल्ह्यातील खामगाव मतदार संघात मोठ्या प्रमाणात वरली मटका, अवैध मोबाईल बँक, जुगार अड्डे, रेतीची तस्करी, गुटखा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या सर्व अवैध धंद्यांना काही पोलीस अधिकारी व काही नेते राजकीय आश्रय देत आहे. अश्याच अवैध धंद्यांमुळे 21 डिसेंबरच्या मध्यरात्री भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी विशाल देशमुख व सचिन पवार यांची निर्घुण हत्या होऊन हे दुहेरी हत्याकांड घडले. त्यामुळे खामगांव मतदारसंघातील सर्व अवैध धंदे त्वरीत बंद करावे अन्यथा मुंबई येथे मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करू, असा खणखणीत ईशारा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना आज 23 डिसेंबर रोजी  निवेदनाद्वारे दिला आहे.
     
 माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, घाटपुरी नाका परिसरात विशाल देशमुख व सचिन पवार यांची निर्घुण हत्या झाली. दोघेही भाजपा युवामोर्चा चे पदाधिकारी होते. त्यांना राजकीय पाठभळ मिळत असल्याने दोघांचे अवैध धंदे व दादागिरी वाढली होती. याशिवाय दोघांची हत्या करणारे आरोपी देखील भाजपा पक्षाशी संबंधित आहेत. रविंद्र भोंगळ याच्या सोशल नेटवर्कींगवर तसेच जाहिरातीचे फलक व फेसबुक पेजवर तो भाजपाचा कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट होते.
     विशेष म्हणजे विशाल देशमुख विरूद्ध पोलीसात अवैध व्यवसायासंबंधी अनेक गुन्हे दाखल होते. तसेच पत्नीच्या मृत्यू प्रकरणी देखील त्याच्यावर ठपका होता. सदरचे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. याशिवाय विशाल देशमुख विरूद्ध पालिसांनी तळीपाराचा प्रस्ताव सुद्धा तयार केला होता. परंतु पोलीसांकडून वेळीच कारवाई न झाल्याने अखेर त्याच्या दादागिरीचे फलीत म्हणून निर्घुण हत्या झाल्याचे बोलल्या जात आहे.तरी मतदारसंघात शांती सलोखा व सामाजिक स्वास्थ आबाधित ठेवण्यासाठी तसेच अश्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणनू खामगाव मतदार संघातील अवैध धंदे त्वरीत बंद करण्यात यावे अशी मागणी ही माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी निवेदनातून केली आहे.

अहमदनगर - शहरात धुमाकूळ घालणारी सराईत सोनसाखळी व जबरी चोरीतील चार चोरट्यांना जेरबंद करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. राजू रामय्या दास (रा.बुडाई, स्वरा बजगा जि.बालेसुर राज्य उडिसा हल्ली रा. बोरुडे मळा, भुतकरवाडी, अहमदनगर), राम मधुकर खंडागळे ( रा.वार्ड न.१ गोधवणीरोड, आण्णाभाऊ साठे घरकुल, श्रीरामपूर, जि.अहमदनगर), नयन राजेंद्र तांदळे (रा.डावखररोड, श्री फर्निचर शेजारी, श्रीरामपूर जि.अहमदनगर) पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. भूषण बबन ससे (रा.भुतकरवाडी ता.जि.अहमदनगर) हा फरार आहे. आरोपींकडून २ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यांच्यावर तोफखाना, भिंगार व कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्यात पो.नि. विकास वाघ यांनी दिलेल्या सूचनेनुसार पो उप नि.सतीश शिरसाठ, पोना शाहीद शेख, नितीन शिंदे, नितीन गाडगे, मुकुंद दुधाळ, संदीप थोरात, भारत इंगळे, राहुल शेळके, सुजय हिवाळे आदीच्या पथकाने ही कारवाई केली.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- महाराष्ट्र  लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सिव्हील जज्ज व ज्यूडीशिअल मँजिस्टेट फस्ट क्लास पदाकरीता घेण्यात आलेल्या परिक्षेत बेलापूर येथील शैलेश राजेंद्र सातभाई याने राज्यातून ५८ क्रमांक मिळवीला आहे                           बेलापूर येथील प्रगतशील शेतकरी व बेलापूर सेवा संस्थेचे माजी चेअरमन राजेंद्र कचरु सातभाई यांचे ते चिरंजीव  आहे त्याचे १० पर्यंतचे शिक्षण केशव गोविंद विद्यालय बेलापूर खूर्द येथे तर बारावी पर्यंतचे शिक्षण जे टी एस हायस्कूल बेलापूर  येथे झाले त्यांचे बी काँमचे शिक्षण एस पी काँलेज पुणे येथे झाले एल एल बीचे शिक्षण आय एल एस काँलेज पुणे येथे झाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लाँ विभागातुन त्यांनी एल एल एम ही पदवी संपादन केली शिवाजीनगर पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांनी प्रँक्टीस केली बेलापूर  व परिसरात न्यायाधीश म्हणून नियुक्ती होणारे शैलेश सातभाई हे पहीले व्यक्ती  आहे त्याच्या यशाबद्ल बेलापूरातील अनेकांनी त्याचे अभिनंदन  केले आहे

बुलडाणा- 21 डिसेंबर
नवीन नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी बुकडाणा येथे  भारतीय मुस्लिम परिषद यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला तर त्याला जमीअत उलमा ए हिंद,जमात ए इस्लामी,महामानव ग्रुप संघटना, आजाद हिंद संघटना व इतर अनेक संघटनांचा पाठिंबा होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवार धडकलेल्या या आक्रश मोर्च्यात हजारोच्या संख्येने सर्व जाती धर्माचे नागरिक सहभागी झाले होते.
   
 केंद्र शासनाने CAA हा नवीन कायदा अमलात आणला असून हा कायदा फक्त मुस्लिम समाजाला टारगेट करण्यासाठी बनवन्यात आला आहे.यात बदल करण्यासाठी देशभरातील बुद्धिजीवी लोक,कायदे तज्ञ,विद्यार्थी व अनेक इतर समाजातील लोक समोर येवून या नवीन कायद्याला असंवैद्यानिक म्हणत विरोध करीत आहे.बुलडाणा जिल्ह्यात ही अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले.आज 21 डिसेंबर रोजी भारतीय मुस्लिम परिषदच्या नेतृत्वात बुलढाणा शहरात भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.दुपारी या मोर्चाला बुलढाणाच्या इदगाह मैदानावरुन सुरुवात झाली, मोर्चा संगम चौक,जयस्तंभ चौक,बाजार लाइन, जनता चौक, कारंजा चौक ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. मोरच्यामध्ये तरुणाची संख्या लक्षणीय होती,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा फोटो व विविध मागण्याचे फलके यावेळी
मोर्चेकर्यांच्या हातात दिसून आले, यावेळी एका शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी यांना भेटून आपली मागणीचे निवेदन दिले.या निवेदनात नमूद करण्यात आले की केंद्र सरकारचा CAA व NRC कायदा असंवैधानिक असून ते रद्द करण्यात यावे.या वेळी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता तर एसपी डॉ.दिलीप पाटील भुजबळ हे स्वता हजर होते.निवेदन देते वेळी शिष्ठमंडळ मध्ये जमात इस्लामी चे जिलाध्यक्ष डॉ. यासीन,जमीअत उलेमाचे जिलाध्यक्ष हाफिज़ शेख खलील उल्लाह,अब्दुल हफीज़ खान,हाफिज़ रहमत खान,विजयराज शिंदे,मो.सज्जाद,एड.जयश्रीताई शेळके,एड.शरदचंद्र रोठे,प्रा.सुनील सपकाळ आदि हजर होते.आक्रोश मोर्च्याला यशस्वी करण्यासाठी हाजी सय्यद बिलाल डोंगरे,हाजी वकार अहमद खान, रईसोद्दीन काझी, जाकीर कुरेशी, सरपंच गजनफर उल्लाह खान, शेख अकबर, एड. राज शेख, शफीक खान, मो. दानिश, शकीब खान, मो अबुजर, तारीक नदीम, मुजाहीद शेख, नवेद मिर्झा, जावेद शेख, जुबेर खान, सादीक उर्फ राजु, मो.अफसर मो.सरवर आदीने अथक प्रयत्न केले.

अहमदनगर ः नागापूर एमआयडीसी येथील एमआरएफ टायरचे गोडावून फोडून टायरची चोरी करणार्‍या तीन आरोपींना दोन ट्रकसह कळंब (जि.उस्मानाबाद) येथे पकडण्यात आले आहे. विभीषण राजाराम काळे, बालाजी छगन काळे व सुनिल नाना काळे ( तिघे रा. आंदोरा, ता.कळंब, जि.उस्मानाबाद) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे असून अन्य 10 जण फरार आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  नागापूर येथील टायरच्या गोडावूनमधून 17 लाख 98 हजार 286 रुपयांची एमआरएफ कंपनीचे ट्रक व मोटारसायकलचे टायर चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी विभीषण काळे, बालाजी काळे व सुनिल काळे या तिघांना मिळालेल्या माहितीनुसार कळंब (जि.उस्मानाबाद) येथे पकडण्यात आले. तिघा आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, ही चोरी तात्या रमेश काळे, पिल्या रविंद्र काळे, सुभाष भास्कर काळे, रमेश लघमन काळे, सुनिल कालिदास शिंदे, दादा उर्फ राजेंद्र छगन काळे, बंड्या उर्फ शहाजी बाबूराव काळे, शाम विभीषण काळे, बाबूशा भिमराज काळे, बबन बापू शिंदे, सुधाकर श्रावण भगत, भागवत उर्फ भाग्या बाप्पा काळे आदींनी मिळून केली असल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली 8 लाख रुपयांची ट्रक (एमएच 24, एफ 7130) व बंद बॉडी असलेला आयशर कंपनीचा टेम्पो (एमएच 46, एफ 7616) जप्त करून आरोपींना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
 स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांच्या सुचनेनुसार पोसई गणेश इंगळे, सफौ सोन्याबापू नानेकर, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्ता हिंगडे, पोना आण्णा पवार, रविंद्र कर्डिले, भागीनाथ पंचमूख, विशाल दळवी, विश्वास बेरड, राहुल सोळुंके, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, चालक बाळासाहेब भोपळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget