Latest Post

नाशिकमधील आयफोनच्या शोरूममधून ८० ते ८५ मोबाईल फोन आणि महागडी घड्याळे चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच आज शहरातील भद्रकाली परिसरातील चौक मंडई येथे एटीएम फोडल्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलीस तपास सुरु आहे.गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अचानक वर्दळीच्या असलेल्या भद्रकाली परिसरात एटीएम फोडल्याच्या प्रकारामुळे चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांनाच आव्हान दिले आहे.घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली असून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाची चक्रे फिरविण्यात आली आहेत.

(शिर्डी प्रतिनिधि )                 शिर्डी हि साईबाबांच्या पावन स्पशनि पुनित झालेली
भूमी आहे. येथे देश विदेशांतून अनेक साईभक्त साई बाबांच्या दर्शनाला येतात. परंतु शिर्डीत
आल्यानंतर त्यांना खुपच वाईट अनुभव येतात. दररोज पोलीसांच्या कृपा आर्शिवादाने होत असलेली पाकीटमारी, चैन  स्नेकिन्ग ,लूटमार, जूगार, मटका व दहशत साई भक्तांना सहन ।
करावा लागत आहे. या सर्व गुन्हेगारांचे अवैध्य व्यवसाय उघड-उघडपणे चालतात. ह्याच
प्रकरणी अवैध्य व्यवसाय बंद होणेकामी मी वेळोवेळी तक्रार अर्ज दिलेले होते.तीन वेळेस उपोषणही केले होते परंतु न्याय मिळाला नव्हता.
 त्यानंतर  ही तक्रार  शिर्डितिल महिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार जितेश लोकचण्दाणी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे  केली होती त्याची दखल घेऊन मैल द्वारे मुख्यमंत्री व त्यांचे  पि ए  अजौय मेहता यांनी करवाई साठी ग्रहखात्या कडे वर्ग केले आहे तेव्हा प्रतीक्षा आहे प्रत्येक्ष कारवाई ची

बुलडाणा- 11 डिसेंबर
जिल्ह्यात सर्वप्रथम महिला जिल्हाधिकारी म्हणून येण्याचा मान डॉ. निरूपमा डांगे यांनी मिळविला होता. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा महिला जिल्हाधिकारी जिल्ह्याला मिळाल्या आहेत.  श्रीमती सुमन चंद्रा यांनी आज 11 डिसेंबर 2019 रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
        श्रीमती सुमन चंद्रा 2010 च्या महाराष्ट्र कॅडेर मधील आयएएस अधिकारी आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्यानंतर नंदुरबार येथे परिविक्षाधीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी 2010 मध्ये कार्यभार सांभाळला. त्यानंतर 2012 मध्ये उस्मानाबाद येथे जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचे कामकाज त्यांनी सांभाळले. सन 2014 मध्ये नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्रे त्यांनी स्वीकारली. त्यानंतर 2017 मध्ये नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनच्या सह निवासी आयुक्त पदाचे त्यांनी कामकाज सांभाळले. त्यानंतर त्यांनी आज 11 डिसेंबर 2019 रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी पदाची सूत्रे प्र. जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्याकडून  स्वीकारली.
        जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांचा जन्म 10 मे 1984 रोजी उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठामधून मास्टर इन फिलॉसॉफी पदवी प्राप्त केली आहे. तसेच अमेरिकेतील
युनीर्व्हसिटी ऑफ कॅलीफोर्निया येथून पीएचडी पूर्वीची ‘प्री डॉक्टरेट’ पर्यावरणीय अभ्यासक्रमात मिळविली आहे. अशा उच्च विद्याविभूषित जिल्हाधिकारी जिल्ह्याला लाभल्या आहेत.
        जिल्ह्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचे महत्वाकांक्षी योजना, उपक्रम, अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे. शासनाच्या योजनांचा लाभ सामान्य नागरिकाला अत्यंत सहजतेने उपलब्ध करून देणे, नागरिकांना प्रशासनाच्या माध्यमातून शासनाच्या विविध येाजनांचा जास्तीत जास्त लाभ देवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच महत्वाकांक्षी सिंचन प्रकल्प असलेल्या जिगांवच्या निर्मितीवर विशेष लक्ष देवून हा प्रकल्प विनाअडथळा पुर्ण करण्याचा निश्चयही त्यांनी व्यक्त केला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उप जिल्हाधिकारी गौरी सावंत, उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे व अधिकारी उपस्थित होते.

नाशिक (प्रतिनिधी )नामदार छगन भुजबळ यांची भेट घेऊन छत्रपती युवा सेनेच्या वतीने दिले निवेदन
मराठा समाजावरील गुन्हे सरसकट मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
ना. छगन भुजबळ साहेब
छत्रपती युवा सेनेच्या वतीने आज नामदार छगन भुजबळ यांची संस्थापक-अध्यक्ष गणेश भाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्यात आली
 यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात 58 मोर्चे काढण्यात आले होते त्यामध्ये अनेक बांधवांवर तरुणांवर गुन्हे दाखल झाले असून हे गुन्हे त्वरित मागे घ्यावे यासाठी आज नामदार छगन भुजबळ यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली
यावेळी भुजबळ साहेब म्हणाले की छत्रपती युवा सेनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांशी यावर चर्चा करून मराठा समाजातील मुलांचे गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.यावेळी रफिक तडवी मयुर दाते दीपक जाधव सतीश शिंदे उपस्थित होते

बुलढाणा-(11 दिसेंबर)-विगत 2 साल पहले बुलढाणा शहर पुलिस थाने में दाखिल अपराध की अंतिम सुनवाई में बुलढाणा कोर्ट ने आरोपी को पोक्सो कानून तथा जूनाइल जस्टिस अधिनियम की धाराओं को मद्देनजर रखते हुए आरोपी को 5 साल की सजा तथा 60 हजार रुपए का जुर्माना आज 11 दिसेंबर को ठोंका है.खास बात तो ये है कि आरोपी बुलढाणा के शासकीय निरीक्षण गृह/बालसुधार गृह में बतौर केअर टेकर कार्यरत था जो अपने कर्तव्य को भूल कर लड़कों के साथ ही अनैसर्गिक कृत्य की घटना को अंजाम दे रहा था.
     इस गंभीर मामले की शिकायत बुलढाणा शासकीय निरीक्षण गृह के अधीक्षक भाऊराव निमचंद राठोड ने 7 सितंबर 2017 को बुलढाणा शहर थाने में शिकायत दर्ज कराई जिसमे कहा गया कि,शासकीय निरीक्षण गृह के कर्मी केअर टेकर निवृत्ती बारिकराव राजपूत ने निरीक्षण गृह में रहनेवाले 2 लड़कों के साथ अश्लील हरकत करते हुए एक के साथ मे अनैसर्गिक संभोग किया है.अपराध दर्ज होने के बाद पुलिस ने आरोपी को गिफ्तार किया था.बुलढाणा कोर्ट में चार्जशीट दाखिल होने के बाद कोर्ट में 16 लोगों की गवाही दर्ज की गई तथा सरकार पक्ष की तरफ से जिला सरकारी अभियोक्ता एड.वसंत भटकर ने प्रभावी रूप से अपनी बात कोर्ट के सामने पेश करते हुए आरोपी को अधिक सज़ा देने की मांग कोर्ट से की.इस मामले में आज 11 दिसेंबर को प्रमुख जिला व सत्र न्यायाधीश
श्री.महेंद्र के.महाजन ने अंतिम निर्णय सुनाते हुए आरोपी को पोक्सो कानून की धारा 9,10 के लिए दोषी मानते हुए 5 साल की सज़ा व 10 हज़ार का जुर्माना तथा ज्वेनाइल जस्टिस एक्ट की धारा 75 के तहत 5 साल की सज़ा व 50 हज़ार का जुर्माना सुनाया है.दोनों सज़ा एकसाथ चलेगी जबकि जुर्माने का भुगतान ना करने पर 1 साल सज़ा आरोपी को भुगतना पडेगी. जुर्माने की रकम में से 25 हज़ार की राशि पीड़ित बालक को देने का फरमान भी दिया गया है.इस मामले की जांच बुलढाणा शहर थाने के पीएसआई मनोज सुरवाडे व व्यंकटराव कवास ने की जबकि कोर्ट में पुलिस कर्मी किशोर कांबले का सहकार्य मिला.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )-ऐनतपूर येथे सायंकाळी बिबट्याचा हल्लाबोल
श्रीरामपूर-तालुक्यातील ऐनतपूर बेलापूर परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून तारेच्या संरक्षक कुंपणावरून आत प्रवेश करून बिबट्या शेळ्या ओढून नेत असल्याच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांनी दहशत घेतली आहे.
              मंगळवारी रात्री ऐनतपूर येथील भाऊसाहेब कुताळ यांचे वस्तीवर सायंकाळी आठ वाजताच हल्ला चढवला. घरातील सर्वजण टीव्ही पाहत असतांना आठच्या सुमारास बिबट्याने तारेच्या सरंक्षक कुंपणावरून आत गोठयात प्रवेश केला. छोटा बोकडाचे कंबर पकडून परत उडी मारून बाहेर पळ काढला. यावेळी शेळ्या जोरजोरात ओरडल्याने वस्तीवरील सर्वजण बाहेर पळत आले.यावेळी विजेरी लावून पाहिले असता बिबट्याच्या तोंडात बोकड दिसला.वस्तीवरील तरुणांनी धाडस दाखवीत बिबट्याचा पाठलाग केला. यावेळी बिबट्याने तोंडातील बोकड टाकून पळ काढला.बोकड वाचवण्यात यश आले असले तरी त्याला गंभीर जखम झाली आहे. या घटनेसह यापूर्वी ही बिबट्याने शेळ्या फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या उसतोडी सुरु झाल्याने ऊसाचे क्षेत्र रिकामे होऊ लागल्याने बिबटया आता मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले आहे.

नेवासा  : तालुक्यातील जळके शिवारात ७ डिसेंबर रोजी आढळून आलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे रहस्य उलगडले आहे. या महिलेचा औरंगाबाद हद्दीत खून झाल्याचे समोर आले असून, नेवासा पोलिसांनी या गुन्ह्यातील चार आरोपींना मंगळवारी अटक केली. अटक आरोपींकडून आणखी एका खुनाचा उलगडा झाला असून पे्रमसंबंधात अडथळा होत असल्याने दोघांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. मंगल सोमनाथ दुसिंग (रा़ तांदुळवाडी ता़ गंगापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. ७ डिसेंबर रोजी तालुक्यातील जळके शिवारात कॅनॉलजवळ राजेंद्र जानकू सोनकांबळे यांच्या शेतालगत एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत नेवासा पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. मयत महिलेचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते. वैद्यकीय अहवालात सदर महिलेचा मृत्यू तोंड व गळा दाबल्यामुळे झाल्याचे समोर आल्याने खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती़. या गुन्ह्याचा तपास प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केला. श्रीरामपूर सायबर सेल यांच्या मदतीने गुन्ह्याचा तांत्रिक  तपास केला. तेव्हा अमीन रज्जाक पठाण (वय ३५ रा. मज्जिदजवळ, बोलठाण तालुका गंगापूर जि. औरंगाबाद) याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. तेव्हा या गुन्ह्याचे रहस्य उलगडले़ अमीन याने गुन्ह्याची कबुली देत त्याच्या इतर साथीदारांचीही नावे सांगितली़. यामध्ये रतन छबुराव थोरात (वय २८ रा.तांदुळवाडी ता.गंगापूर) सोनाली सुखदेव थोरात (वय २२ रा.तांदुळवाडी ता.गंगापूर हल्ली रा.गिडेगाव ता.नेवासा) राहुल भाऊ उघाडे (वय ५० रा.गिडेगाव ता.नेवासा) यांनी मिळून हा खून केला. वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड, जयसिंग आव्हाड, कैलास साळवे, राहुल यादव, बबन तमनर, अशोक कुदाळे, भागवत शिंदे, अंकुश पोटे, केवल रजपुत, संदीप म्हस्के, कल्पना गावडे, मनिषा धाने, जयश्री काळे, चंद्रावती शिंदे यांनी आरोपींना अटक केली. ब्लॅकमेल केल्याने मारले मंगल हिला आरोपी अमीन रज्जाक पठाण याचे सोनाली थोरात हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. ही बाब सोनाली हिचा पती सुखदेव थोरात याला समजली होती़. त्यामुळे ११ नोव्हेंबर २०१८ रोजी अमीन पठाण, रतन थोरात व सोनाली थोरात यांनी सुखदेव थोरात याचा खून केला. सुखदेव याला मारल्याची बाब मंगल सोमनाथ दुसिंग हिला समजली होती. ती अमीन पठाण यास ब्लॅकमेल करून पैसे मागत असे. तिच्यासारख्या पैशाच्या मागणीला कंटाळून अखेर मंगल हिलाही सर्व आरोपींनी मिळून जोगेश्वरी- वाळुंज रस्त्यावर नेऊन तिचा खून केला. त्यानंतर मृतदेह जळके शिवारात आणून टाकला. 

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget