पाथर्डी_सर्प मित्र मुड्याभाई यांनी दहा नाग व सर्पांना दिले जीवदान.
पाथर्डी(प्रतिनिधी विकास दिनकर)शेवगाव तालुका व परिसरामध्ये सुमारे पंधरा वर्षान पासून या ठिकाणी सर्पमित्र आतार बंधू हे सर्व प्रकारचे सर्प उदारणार्थ नाग,नागीण,धामण,आजगर,घोणस,मणियार,अशा सर्व प्रकारचे सर्प धरून जंगलामध्ये सोडण्याचे काम करतात.
गेल्या दोन दिवसांमध्ये आतार बंधूनी विशेषतः गफार आतार व मुड्याभाई आतार या दोन बंधूनी गेल्या दोन दिवसामध्ये पाच नाग,एक नागीण,एक अतिशय विषारी घोणस,एक धमन,बिन विषारी दोन सर्प गेल्या दहा दिवसानामध्ये पाथर्डी व शेवगाव तालुक्यामध्ये विविध भागानामध्ये पकडून त्यांना निसर्गामध्ये मुक्त केले. विशेष म्हणजे सर्पाचे प्राण वाचवतात त्या सोबत नागरिकांचे प्राण वाचून निसर्ग संवर्धनासाठी निच्छित त्यांचा हातभार लागतो.या मुळे पाथर्डी शेवगाव परिसरात कुठही सर्प अथवा नाग घ्यारांमध्ये,दुकानांमध्ये,मळ्यामध्ये,कंपनी मध्ये,आठवा सार्वजनिक ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये शाळा कॉलेज येथे आढळल्यास मुद्याभाई व गफार भाई याना संबधित ठिकाणाहून फोन येतो.व ते तत्काळपने व निस्वार्थीपणे जाउन त्या ठिकाणात संबधित निघालेला सर्प धरून ते सोडून देतात.
या मुळे त्यांनी हजारो सर्पाचे जीव गेल्या पंधरा वर्षान मध्ये वाचविले आहेत. तसेच सुमारे पंधरा ते वीस सर्प मित्र तयार केले आहेत.आणखी ज्यांची इच्छा आहे सर्प वाचविण्याची,त्यानाही ट्रेनिग देण्याची त्यांची तयारी आहे.
मात्र एकाच त्यांचे म्हणणे आहे,स्वतःच्या जीवाची परवा न करतात स्वतः चा जीव धोक्यात घालून इतर नागरिकाचे व सर्पाचे प्राण वाचवून निसर्गसंवर्धन करतात.यावेळी त्यांचे कुटुंब अतिशय काळजी मध्ये असते. मात्र सर्प विषयी निसर्गाविषयी प्रेम आणि ज्या कुटुंबांमध्ये सर्प निघाला त्यांचा विषयीचे प्रेम हे सर्व सामाजिक बांधिलकी म्हणून ते मोठ्या धाडसाने स्वतः चा जीव धोक्यात घालून हे सामाजीक कार्य करतात .
मात्र शासनाचे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष नसल्याने त्यांच्या मनामध्ये खंत आहे.त्यांच्या म्हणण्या नुसार फक्त पाथर्डी_शेवगाव नाही तर नगर जिल्हा व महाराष्ट्र मध्ये जेवडे खरे सर्प मित्र आहेत.त्या सर्व मित्रांना विविध प्रकारच्या सुविधा शासनाने द्याव्यात आशी आतार यांची मागणी आहे.विशेषतः यामध्ये सर्प धरताना काही अपघात झालयास आथवा सर्पदंश झाल्यास दवाखान्याचा खर्च सर्प मित्राचा मृत्यू झाल्यास २० लाख रुपयांचा विमा त्यांच्या घरच्यांना भरपाई तसेच सर्प धरण्याचे अत्याधुनिक साहित्य त्याना वेळोवेळी सरकार कडून त्यांना मिळावे.त्यांना वेळोवेळी बदलत्या काळानुसार किमान वर्षातून एकदा जिल्ह्या ठिकाणी ट्रेनिंग द्यावी.आशा काही मागण्या त्यांच्याकडे आहेत.या कडे शासनाने सहानभूती पूर्वक लक्ष ध्यावे.आतार यांची विनंती आहे.