कोल्हार( साईप्रसाद कुंभकर्ण ) :-
श्री दत्त जयंतीनिमित्त सुर्योदय आश्रम इंदोर येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त हजारो भाविक, गुरू बंधू या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
सुर्योदय आश्रम इंदोर येथे श्री दत्त जयंती निमित्त आध्यात्मिक कार्यक्रम 5 ते 11 डिसेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. श्री दत्त जयंतीच्या दिवशी श्रीदत्त जन्मोत्सव ,श्री गुरुदेव पाद्य पूजन ,महाआरती ,ध्यान साधना,भजन असे आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर गरजूंना ब्लॅंकेट वाटप ,साडी वाटप मोबाईल टॅबलेट वाटप तसेच आरोग्य ,नेत्र स्वास्थ्य शिबिर असे सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. या श्री दत्त जयंती उत्सवात सर्व भाविकांनी व गुरु बंधूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन सद्गुरू प .पु .भय्यूजी महाराज यांच्या पत्नी ,सुर्योदय परिवाराच्या संचालिका,डॉ.आयुषी देशमुख यांनी केले आहे.
इंदोर येथील सूर्योदय आश्रमात श्री दत्त जयंतीनिमित्त दरवर्षी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
Post a Comment