बुलडाणा- 8 डिसेंबर
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यानातर्गत खेर्डा या गावात 7 डिसेंबरच्या साकाळी राहत्या घरी एका 45 वर्षीय दिव्यांग महिलेचं निर्वस्त्र अवस्थेत प्रेत आढळून आले होते. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार व मर्डरचा गुन्हा दाखल करुण घटनास्थळी कोणताच पुरावा नसतांना जळगांव जा. ठानेदार सुनील जाधव यांनी आपली कुशलतेने त्याच गावातील "रितेश देशमुख" नामक व्यक्तीला कालच अटक करुण आज न्यायालयात उभे केले असता आरोपीला येत्या 15 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावन्यात आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खेर्डा गावात शनिवारी सकाळच्या सुमारास एका 45 वर्षीय दिव्यांग महिलेचे घरातच निर्वस्त्र अवस्थेत प्रेत मिळून आले होते. महिलेच्या डोक्यावर वार करून खून करण्यात आले व महिलेवर बलात्कार झाल्याचे घटनास्थळी वाटत होते दरम्यान घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी जळगाव जा. पोलिसांना दिल्या नंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व ठानेदार जाधव यांनी काही खुना शोधून आरोपीला शोधला व विशेष श्वानाला पाचारण केले तर श्वान ही त्याच व्यक्तीच्या घरा पर्यंत जावून पोहोचला होता. गुप्त माहिती आणि श्वानाने शेजारच्या घरात दिशा दाखविल्याने या प्रकरणी त्याच गावातील रितेश देशमुख नामक या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.त्यानंतर आरोपीच्या पत्नीने पोलीस तपासा दरम्यान आपल्या पतीने रात्री लिलाबाईचा खून करून आल्याचं आपल्याला सांगितलं होतं. एवढंच नाहीतर त्याने स्वतःच्या हाताने कपडेही धुतले होते, अशी माहितीही तिने दिली.दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन खुनाची आणि आरोपीला अटक केल्याची माहिती माध्यमांना दिली होती. आरोपीने हत्या का केली या मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचं ही त्यांनी सांगितलं. या प्रकरणात जळगांव जा. ठाण्यात आरोपी रितेश देधमुख विरोधात भादवीची कलम 302,376,452 अन्वय गुन्हा दाखल करुण आरोपीला रितेश देशमुखला स्थानिक न्यायालयात हजर केले असता आरोपीला 15 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.हादरुन टाकनारी या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनील जाधव हे करीत आहेत.
Post a Comment