आठ वर्षीय बलिकेवर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकाराने नाशिक हादरले,परिसरातील रहिवाशांनी संशयित यास चांगलाच दिला चोप.

नाशिक : हैदराबाद, उन्नाव येथील बलात्काराच्या घटना ताज्या असतानाच नाशिक मधील अंबड भागामध्ये आठ वर्षीय बलिकेवर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.८) दुपारी उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संतप्त नागरिकांनी संशियत नराधमाला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देशातील हैदराबाद, व उन्नाव येथील बलात्काराच्या घटना घडल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली असतानाच रविवारी दुपारी नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाणे हद्दीतील महालक्ष्मीनगर भागात एका आठ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले, या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.महालक्ष्मीनगरमध्ये काही दिवसांपूर्वीच पती-पत्नी आपल्या दोन मुलींसह, भाडेतत्वावर घर घेऊन राहायला आले होते. याठिकाणी पुर्वीपासून राहत असलेल्या कैलास रामू कोकणी (२३) याने कुटुंबातील एका आठ वर्षाच्या बालिकेला ‘कार्टुन’ दाखविण्याच्या बहाण्याने शेजारील घरमालकाच्या घरावरील छतावर नेले. तेथून नराधम कोकणी हा बालिकेला स्वत:च्या राहत्या खोलीत घेऊन गेला. घरात अन्य कोणीही नसल्याचा फायदा घेत त्याने खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेत बालिकेवर बळजबरीने अत्याचार केला. काही वेळातच मुलीच्या आईने तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्याचवेळी जवळच राहणाऱ्या कोकणीला याबाबत विचारणा करण्यासाठी पिडित बालिकेच्या आईने हाक मारली असता संशयित कोकणी याने घाबरून बराचवेळ दरवाजा उघडला नाही. यावेळी शेजाऱ्यांनी त्याला दरवाजा उघडण्यास भाग पाडले असता बलिकेच्या अंगावर कपडे नसल्याचे आढळून आले. भेदरलेल्या मुलीने तत्काळ आईला मिठी मारत घडलेला प्रकार रडत रडत कथन केला. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या परिसरातील रहिवाशांनी संशयित कोकणी यास चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून संशयित कोकणी यास ताब्यात घेतले. याप्रकरणी पिडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत कोकणीविरूध्द बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget