पुण्यात दारोडा टाकून आरोपी लपला सासऱ्याच्या घरात,बुलडाणा एलसीबीच्या मदतीने पुणे पोलीसाने केली अटक,दरोड्यातील 8 किलो सोने जप्त?


बुलडाणा- 8 डिसेंबर
पुण्यातील चंदन नगर भागात एका फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये धाडसी दरोडा टाकून 4 कोटी 20 लाख रुपयांचे सोने लुटुन मुख्य आरोपी बुलडाणा येथील आपल्या साऱ्याच्या घरी येऊन राहत असतांना पुणे पोलिसांनी या मोठ्या गुनह्यातील दोन आरोपींना बुलडाणा एलसीबीच्या मदतीने कृषि विभागात अधिकारी पदावर कार्यरत सासऱ्याच्या घरातून अटक करत दरोड्यातील जवळपास 8 किलो सोनेही जप्त केल्याची चर्चा शहरात आहे.सदर कार्रवाई पोलीसाने अत्यंत गुप्तपणे 7 डिसेंबरला राबवली आहे.
        या प्रकरणी प्राप्त माहिती नुसार पुणे येथील अहमदनगर मार्गावरील चंदननगर पोलीस ठाणे हद्दीतील बीआरटीएस बस स्टॉपच्या विरूद्ध दिशेला ‘नानेकर प्रेस्टीज’ बिल्डींगच्या तळमजल्यावर इंडीया इन्फोलीन फायनान्स लिमिटेड (आयआयएफएल) चा कार्यालय आहे. गुरुवार, 5 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी कार्यालय उघडले असता रिसेप्शन काऊंटरवर एक तरूण आला आणि कर्जाविषयीची माहिती विचारू लागला. काही वेळानंतर दोन शस्त्रधारी तरूण देखील आले. त्यातील एकाने रिसेप्शनीस्ट महिलेच्या कानशिलावर बंदूक रोखून इतर कर्मचार्‍यांना धमकावले. जीवे मारण्याची धमकी देत लॉकर उघडण्याचे सांगितले. या दोनमध्ये तिसराही मिळाला आणि तिघांनी मिळून सोबत आणलेल्या बॅगेत कंपनीच्या लॉकरमधील सोने तारणाचे 394 पॅकेट भरले. बॅग भरल्याबरोबर काही क्षणातच तिघेही बाहेर पडले आणि बाहेर पडतांना त्यांनी बाहेरून कंपनीचे शटर लावून घेतले तर त्यांचा एक साथीदार बाहेर स्विफ्ट डिझायर कार घेऊन तैयार होता जसेच तिघे दारोडा टाकून परतले व स्विफ्ट कार मध्ये बसून फरार झाले.
पोलिसांनी जेव्हा कंपनीकडून लुटलेल्या सोन्याची किंमत विचारली असता सर्व मिळून 12 किलो सोने ज्याची किंमत 4 कोटी 20 लाख रुपयांपर्यंत होती. तपासादरम्यान परिसरातील सिसिटीव्ही फूटेज पोलिसांनी जमा केले. त्यात दोन आरोपींचे चेहरे अगदी स्पष्ट दिसत असल्याने पोलिसांचे अर्धे काम सोपे झाले होते.आरोपींचे धागेदोरे जोळत व घटनेत वापरण्यात आलेली कार क्र. MH28-AN-5050 चे सीसीटीव्ही फुटेजच्या साहयाने पुणे पोलीस बुलडाण्यात दाखल झाली व एलसीबीच्या मदतीने बुलडाणा येथील आरास ले आउट मधील कृषि अधीक्षक राठोड यांच्या घरी पोहोचली व तेथून या दरोडयातील मुख्य आरोपी 32 वर्षीय दिपक विलास जाधव (बुलडाण्याचा जावई) रा.प्लॉट नं. 609, ज्यूब्लेशन बिल्डींग, वाघोली, पुणे व त्याचा साळ्याला ताब्यात घेऊन घरातून सोनेही जप्त करण्यात आले,अशी माहिती मिळाली.बुलडाणा आलेल्या पुणे पोलीसाच्या चमु प्रमुख एपीआई गजानन जाधव यांच्याशी जेंव्हा बुलडाणा एलसीबी कार्याल्यात या प्रकरणी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांनी सविस्तर माहिती देण्यास टाळले व नम्बर प्लेट काढलेली इनोव्हा कारने 7 डिसेंबरच्या रात्री मुख्य आरोपी जाधव(जावई) व राठोड (साळा) यांना घेऊन पुण्याकडे रवाना झाले.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget