Latest Post

नगर : (प्रतिनिधी )उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे आज (ता.१८) सकाळी राहत्या घराचा जवळून अपहरण झाले. चार ते पाच जणांच्या टोळक्याने रिव्हॉल्व्हरचा धाकाने त्यांना एका गाडीत धरुन बसविले, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांकडून हुंडेकरी यांचा शोध सुरू आहे. हुंडेकरी हे सकाळी घराबाहेर पडलेले असताना त्यांच्या पाळतीवर असलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांना पकडले. त्यानंतर एका गाडीत घालून पळवून नेले. हुंडेकरी यांनी सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु उपयोग झाला नाही. अपहरणकर्त्यांच्या तोंडाला मास्क बांधले होते,असे प्रत्यक्षदर्शी असलेल्या स्थानिक महिलांचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांना एका संशयिताची माहिती मिळाली असून हुंडेकरी यांचा शोध सुरू आहे.

नाशिक : वीज ग्राहकाला मोबाईल क्रमांक दिल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यास धाऊन जाणाºया भद्रकाली उपविभागाच्या सहायक अभियंत्याविरुद्ध कर्मचारी संघटनांच्या कृती समितीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी संबधित अभियंत्यावर निलंबनाची कारवार्ई करण्याची मागणी केली.या संदर्भात कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भद्रकाली कक्ष ३ शहर उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्यांने कर्तव्यावर असलेले कर्मचारी दिलीप काशिनाथ भोये यांना मोबाईल नंबर ग्राहकाला दिल्याच्या कारणावरून हेल्मेट घेऊन अंगावर धाऊन आल्याचे म्हटले आहे. या घटनेच्या निषेधार्थ संयुक्त कृती समितीच्यावतीने भद्रकाली शहर उपविभाग कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वर्कर्स फेडरेशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना, मागासवर्गीय संघटना, इलेक्तिट्रक लाईन स्टाफ संघटना या कामगार संघटनांनी आंदोलन पुकारले होते.यावेळी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता जनवीर यांना तक्र ारीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, दिलीप काशिनाथ भोये, तंत्रज्ञ हे दुसºया पाळीत ड्युटीवर असतांना कापड बाजारातील वीज पुरवठा खंडीत केलेले एक ग्राहक भरलेले वीज बील घेऊन आले. वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली अशावेळी रिकनेक्शन चार्जेस भरल्याशिवाय वीज पुरवठा पूर्ववत करता येणार नाही असे त्यांना सांगण्यात आले.सदर बाब संबंधित अभियंत्यांस समजल्यानंतर त्यांनी भोये यांना जाब विचारु न शिविगाळ केली व सोमवार पासून तुमच्याकडे बघतो असा दम भरला. एवढ्यावरच न थांबता हेल्मेट मारु न फेकण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही भोये यांनी केला आहे. सदर बाब कामगार संघटना पदाधिकाऱ्यांना समजल्यावर त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेऊन घोषणाबाजी केली.यावेळी सहाय्यक अभियंता पेंढारकर यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली. तसेच त्वरीत निलंबन झाले पाहिजे, , आदी मागण्यांचे निवेदन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता यांना दिले.

अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसीतील स्विचगेअर प्रायव्हेट कंपनीतून कंपनीच्या वॉचमनने चोरी केली असून तो दुसर्‍याने चोरी केल्याचा बनाव करत आहे, अशी तक्रार कंपनीच्या मालकाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, एमआयडीसी पोलीसांनी तपास केला असता, चोरीसंदर्भात वॉचमनचा बनाव नसल्याचे समोर आले असून चोरी करणार्‍या चौघांना अटक केली असून अन्य चौघे फरार आहे. या प्रकारात मात्र, विनाकारण वॉचमन नोकरीला मुकला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी, सुधीर परशुराम पटवर्धन यांच्या मालकीची एमआयडीसीमध्ये स्विचगेअर प्रायव्हेट कंपनी आहे. या कंपनीत विष्णू रावजी चोरमले (रा. शेवगाव, हल्ली रा. निंबळक बायपासरोड, एमआयडीसी) हा वॉचमन म्हणून नोकरीला होता. 25 ऑक्टोबरचे रात्री साडेआकरा ते 26 ऑक्टोबरचे साडेबाराच्या दरम्यान कंपनीमधून कॉपर वायर, ब्रास कॉईल, सीसीटीव्ही डीव्हीआर असा 4 लाख 14 हजार 850 रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. यावेळी चोरमले हा कामावर होता. त्याला चोराने मारहाण केली होती.कंपनीचे मालक पटवर्धन यांना चोरमले यानेच चोरी केल्याचा संशय आला. तो बनाव करत आहे. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरमले व त्याच्या अन्य साथीदाराविरोधात फिर्याद दिली. मालकाने चोरमले याला कंपनीतून काढून टाकले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पवन सुपनर हे या गुन्हाचा तपास करत होते.यावेळी त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, हा गुन्हा अन्य व्यक्तींनी केला आहे. त्यादृष्टीकोनातून तपास झाला. यामध्ये चोरी करणारे भिमा सोपान मिरगे (रा. सावडी), कैलास राजेंद्र जाधव (रा. बोल्हेगाव), अजय सोपान गुळवे (रा. नालेगाव) व सागर मच्छिंद्र वाघमारे (रा. निंबळक) यांना अटक केली आहे. तर संतोष धोत्रे व पप्पू उर्फ गोरख संभाजी जाधव हे फरार आहेत. बबलू उर्फ पीर मोहम्मद शेख, सुंदर खंडागळे यांनी चोरीचा माल खरेदी केला ते पण फरार आहे. एमआयडीसी पोलीस त्यांचा शोध घेत आहे. अटक केलेल्या चौघांकडून एक लाख 6 हजार 100 रूपये किंमतीचे ब्रास कॉईल व कॉपर कॉईल हस्तगत केले आहे. चोरी दुसर्‍याने केली असली तरी यामध्ये वॉचमनची नोकरी गेली आहे. त्याला दुसरीकडे नोकरी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक बोरसे यांनी सांगितले. हा गुन्हाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बोरसे, उपनिरीक्षक पवन सुपनर, पोलीस नाईक देवेद्र पंढारकर, चव्हाण, नवले यांनी केला.

सिल्लोड :प्रतिनिधी सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे  सहाय्यक अभियंता प्रदीप निकम यांच्या आदेशाने वीज बिल वसुली व वीजचोरीवर कारवाई करण्यासाठी मागील तीन दिवसांपासून मोहीम सुरू होती.महावितरणचे वरिष्ठ तज्ञ  अंबादास कडूबा साखरे व कर्मचारी विजय सांडू पाडळे राजीव सांडू शिंदे साहेबराव लक्ष्मण सपकाळ आदि महावितरणचे कर्मचारी शनिवारी (दि.१६) दुपारी साडेबाराच्या सुमारास अंधारी येथील झोपडपट्टी भागांमध्ये वीजबिल वसुली व वीजचोरीवर कारवाई करीत असतांना अंधारी येथील विठ्ठल भिमराव तायडे हा आमच्याकडे आला व आम्हाला म्हणाला की तुम्ही वीजबिल कशी काय वसुली करता.वीजबिल वसुली करायची नाही ताबडतोब गावातून निघुन जा जर कोणी  थांबले तर हातपाय तोडून हातात देईल.परत आल्यास दगडाखाली मारेल अशा प्रकारच्या धमक्या देऊन दमदाटी केली व जीवे मारण्याची धमकी दिल्या व तेथून निघून गेला.या प्रकरणी भराडिचे वरिष्ठ तंत्रज्ञ अंबादास कडूबा साखरे यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल भीमराव तायडे यांच्यावर सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनला एनसीआर दाखल करण्यात आला.



बेलापूर  (प्रतिनिधी  )- स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरीकांची सेवा करण्याची संधी मिळते हे लक्षात घेवुन अभिनव स्वय सहायता महीला बचत गटाने कार्य करावे अशी अपेक्षा पचायत समितीचे सभापती दिपक पटारे यांनी व्यक्त केली बेलापूर  ऐनतपुर येथील अभिनव महीला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  जिल्हा परिषद सदस्य शरद नवले हे होते तर प्रमुख  अतिथी म्हणून युवा नेते सिध्दार्थ मुरकुटे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मसुर खान उपसभापती बाळासाहेब  तोरणे धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  सचिव रज्जाक पठाण बनिंचद खरात माणिक जाधव उपस्थित  होते या वेळी बोलताना युवा नेते सिध्दार्थ मुरकुटे म्हणाले  की अतिशय कष्टाने या महीला बचत गटास धान्य दुकान मंजुर झाले आहे त्याकरीता बचत गटाच्या महीलांनी  मंत्रालया पर्यत  पाठपुरावा केला अनेक जण प्रत्यक्ष  व अप्रत्यक्षपणे त्यांच्या पाठीशी उभे राहीले आता ही दुकान कायम स्वरुपी मिळाली असुन मालाचे वाटप व्यवस्थित  करावे काही लोक खोट्या तक्रारी करतील परंतु काळजी करु नका १५ वर्ष राजकारण करताना विरोधकाला पाय ठेवु दिला  नाही असेही ते म्हणाले     या वेळी बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की रामगड येथे आदिवासी संस्थेचे धान्य दुकान होते परंतु  काही लोकांनी तक्रारी करुन ते दुकान रद्द करण्यास भाग पाडले नंतर अधिकार्यांना हाताशी  धरुन ते दुकान स्वतःच्या पदरात पाडून घेतले या वेळी आभिनव महीला बचत गटावर अन्याय करण्यात आला होता त्यामुळे या महीलांनी न्यायाकरीता आयुक्तांचे दरवाजे ठोठावले परंतु तेथे राजकीय आर्थिक  ताकद वापरुन निकाल आपल्या बाजुने लावुन घेतला परंतु  मा नामदार राधाकृष्ण  विखे पाटील यांनी वैयक्तिक लक्ष घालुन या महीलांना न्याय मिळवुन दिला असुन हा न्याय म्हणजे सत्याचा विजय आहे काही जण निवडून आलेले नसतानाही गावगाडा हाकलत असल्याचा आव आणतात त्यांनी आगोदर  निवडून यावे असे अवाहनही शरद नवले यांनी केले असुन कुणाच्या पोटावर मारण्याचा प्रयत्न करु नका नियतीचा टोला समजत नसतो आता तरी सुधारा असेही ते म्हणाले या वेळी देविदास देसाई  पोलीस निरीक्षक मसुर खान    रज्जाक पठाण बाळासाहेब तोरणे आदिंनी आपले मनोगत  व्यक्त केले या वेळी प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोंड अजिज शेख गणेश भाकरे भास्कर बंगाळ पंचायत समीती सदस्य आरुण पा नाईक असगर शेख राजु शेख जाकीर शेख अय्याज सय्यद भगवान मोरे अरविंद साळवी मुस्ताक शेख यादव काळे करिमाबी सय्यद ईलियास शेख सद्दाम शेख मोनु शेख शफीक आतार सुहास शेलार शोएब शेख जिना शेख मुक्तार शेख जाकीर शेख सादीक शेख आसीफा शेख लतीफा शेख रुखसाना शेख नगीना शेख हसीना शेख उपस्थित  होते प्रास्ताविक बचत गटाच्या अध्यक्षा शबाना शेख यांनी केले तर रोशनी शेख यांनी आभार मानले

अहमदनगर (प्रतिनिधी)  पारनेर बस स्थानकाजवळ असलेल्या आंबेडकर चौकात जुन्या भांडणाच्या कारणावरून 22 वर्षीय तरुणावर दोघांनी तलवारीने खुनी हल्ला करत जखमी केल्याची घटना शुक्रवारी पहाटे साडेसहा वाजता घडली. जखमी झालेल्या तरुणाचे नाव सौरभ उर्फ बंडू भिमाजी मते असे आहे. त्याच्यावर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पारनेर पोलीस ठाण्यात गणेश चंद्रकांत कावरे व संग्राम चंद्रकांत कावरे या दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील तरुणांच्या दोन गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांकडून याअगोदर एकमेकांना बेदम मारहाण झाली होती त्याचेच रूपांतर बंडू मते याच्यावरील हल्ल्यात झाले. शुक्रवारी सकाळी बंडू मते हा आंबेडकर चौकातील चहाचे दुकान उघडून ते सुरू करण्याच्या तयारीत असतानाच दोघांनी त्याच्याशी वाद घालण्यात सुरुवात केली व वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दोघांनी त्याच्या हातापायावर तलवार तसेच चॉपरने वार केले. दोघांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला मात्र पाठलाग करून दोघांनी डॉ. आंबेडकर स्मारकासमोर त्याच्यावर तलवार तसेच चॉपरने वार केले.घटनेची माहिती समजल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी बंडू मते यास नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविले. भांडणाच्या वादातून गणेश चंद्रकांत कावरे व संग्राम चंद्रकांत कावरे या दोघांनी हल्ला केल्या असल्याची प्राथमिक माहिती जखमी सौरभ मते यांनी पोलिसांना दिली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. यासंबंधीची फिर्याद जखमीचे चुलते रामदास सोपान मते यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून वरील दोघा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

श्रीरामपूर (प्रतिनिधी)राहता तालुक्यातील ममदापूर येथे काल रात्री अली बाबा दर्गा परिसरातील  भरवस्तीत  इस्माईल शहा यांच्या घरी दोन ते तीनच्या सुमारास चोरी झाली असून सदर कुटुंब तीन दिवसापूर्वी पासून लग्नासाठी बाहेरगावी गेले होते घटने दरम्यान चोरांनी शेजारील घरांच्या कड्या लावल्या होत्या तर बंद असलेल्या घराची कडी व कोंडा कटरच्या साह्याने कापून आत प्रवेश केला यात पन्नास हजाराच्या रोकड रकमेसह सोन्याचे कानातील झुबे मंगळसूत्र सोन्याची अंगठी चांदीच्या बांगड्या असा दोन तोळ्याचा मुद्देमाल लंपास केला आहे चोरी अतिशय चतुराईने केली असून भरवस्तीत हा प्रकार घडला आहे पोलिस प्रशासनाने रात्री गावात गस्त घालावी अशी मागणी येथील नागरिक वारंवार करत आहे ममदापूर परिसरात भुरट्या चोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे पोलीस प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहे फिर्यादीच्या नातेवाइकांनी लोणी पोलिस ठाण्यात जाऊन संपर्क केला असता कर्मचारी उपलब्ध नसल्याने दुपारी साडे अकरा पर्यंत पंचनामा करण्यात उशीर झाल्याचे नातेवाइकांकडून समजते
ममदापुर गावचे माजी सरपंच विद्यमान उपसरपंच पोलीस पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची केली पाहणी .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget