Latest Post


श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहर पोलीस स्टेशन विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यामध्ये असून निवडणूक प्रक्रीया शांततेत व सुरळीतपणे पार पडावी म्हणून ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशा सुमारे 45 जणांवर सीआरपीसी 144 प्रमाणे हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.जिल्हा पोलीस प्रमुख ईशू सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी तालुका बंदी हद्दपारीची कारवाई केली आहे. यामध्ये अर्जुन खुशाल दाभाडे (रा. गोंधवणी, वॉर्ड नं. 1) सागर श्रावण भोसले (रा.दत्तनगर, ता.श्रीरामपूर), नाना बाळू गुंजाळ (रा.उक्कलगाव), विजय उर्फ दुर्गेश कचरुलाल जैस्वाल (रा. वॉर्ड नं.6, सुभाष कॉलनी), सचिन उर्फ गुड्डु रामअकबल यादव (रा. वॉर्ड नं. 6, डावखऱ रोड), सचिन सुभाष बाकलीवाल (रा. वॉर्ड नं.1, आदर्शनगर), जिशान फारुक शेख (रा. वॉर्ड नं.7, बेलापूररोड), शोएब सत्तार शेख (रा. वॉर्ड नं.1, फातेमा हौ.सोसायटी), प्रकाश शिवाजी रन्नवरे (रा.वॉर्ड नं.1), फैय्याज नासीर कुरेशी उर्फ नल्ला (रा. वॉर्ड नं.1, मिल्लतनगर), मोहसीन रफिक शेख (रा. वॉर्ड नं. 4, नॉर्दनब्रँच चुना भट्टी), अमोल गोपाळ नानुस्कर (रा. वॉर्ड नं. 6, डावखऱरोड), प्रकाश अरुण चित्ते (रा. वॉर्ड नं.1, गोपाळनगर), शाहरुख अफसर शेख (रा. सुभाष कॉलनी, वॉर्ड नं.6), सचिन लक्ष्मण सोनवणे (रा.गोंधवणी रोड, वॉर्ड नं.1), शुभम बबन शेळके (रा.गोंधवणी, वॉर्ड नं.1), करण मिथुन शेळके (रा.गोंधवणी), दीपक अशोक परदेशी (रा.वॉर्ड नं.5), गणपत कुंडलिक गांगुर्डे (रा.वडाळा महादेव), अजय पांडुरंग शिंदे (रा.दत्तनगर), दत्तात्रय जगन्नाथ जाधव (रा.शिरसगाव), दीपक बाळासाहेब चव्हाण (रा. वॉर्ड नं. 3), कुणाल विजय कारंडे (रा. वॉर्ड नं.5, गिरमे बिल्डींग मेनरोड), संदीप विजय वाघमारे (रा.खंडाळा), योगेश कारभारी त्रिभुवन (रा.टिळकनगर), मोहन भगवान आव्हाड (रा.सूतगिरणी रोड), राजेंद्र पुंडलिक भालेराव (रा.निपाणी वडगाव,), आसिफ दाऊद तांबोळी उर्फ आसिफ रिक्षावाला (रा- वॉर्ड नं.2, बाबरपुराचौक), आदिल मकदुम हुसैन शेख (रा. वॉर्ड नं. 2, वेस्टर्न रेसिडन्सी), शेख सलिम मोहम्मद अब्दुल सत्तार जहागिरदार उर्फ सलिम जहागिरदार (रा. वॉर्ड नं.2, गुलशन चौक), फिरोज हबीब पोपटीया (रा. वॉर्ड नं.2), अमजद हबीब पोपटीया (रा. वॉर्ड नं.2), शरीफ लतिफ शेख (रा. वॉर्ड नं.2, बजरंगचौक), अमन आयुब शेख (रा. वॉर्ड नं.2), जुनेद बाबा शेख (रा. वॉर्ड नं. 2), अल्तमश युनूस शेख (रा. वॉर्ड नं.2, सुभेदारवस्ती), संजय दानबहादूर यादव (रा.अहिल्यादेवीनगर वॉर्ड नं.2), रईस अब्दुलगणी शेख जहागिरदार (रा. वॉर्ड नं.2, जहागिरदार बिल्डींग), मुजम्मिल हारुण बागवान (रा. वॉर्ड नं.2, सुभेदारवस्ती), आशु ऊर्फ आसिफ लियाकत पठाण (रा. वॉर्ड नं.2, पाण्याचे टाकीजवळ), हुजैफ युनुस शेख जमादार (रा. वॉर्ड नं.2, काझीबाबारोड), गुलाब नबाबगणी कुरेशी (रा. वार्ड नं.2, सुभेदारवस्ती), अकिल शरीफ कुरेशी (वॉर्ड नं.2), आसिफ मुश्ताक शेख (वॉर्ड नं.2), बबलु दिलीप शेळके (रा. गोंधवणी) आदींचा समावेश आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी) आधी मटण खाऊ घातले. मटण खाल्ले नाही याचाच राग आल्याने दोघांनी गुंडेगावातील एकाला पेट्रोल टाकून जाळले. यामध्ये ती व्यक्ती जखमी झाली असून त्याला नगरच्या सिव्हिल रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संजय पोपट जाधव (वय- 48 रा. गुंडेगाव ता. नगर) असे जखमीचे नाव आहे. त्याने दिलेल्या जबाबावरुन बापू एकनाथ हराळ व ज्ञानदेव उत्तम कुसळकर या दोघांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमवारी (दि. 14) सकाळी संजय जाधवला आरोपीने घरी मटण खाण्यासाठी बोलावून घेतले. जाधव याची इच्छा नसतानाही मटण खाण्यास भाग पाडले. नंतर नकार दिल्याने गावातील रामेश्वर मंगल कार्यालयात आणून दोघांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. बापू हराळ याने धारदार शस्त्राने वार केले व पेट्रोल टाकून पेटवून दिले. यामध्ये संजय जाधव हे भाजलेले असल्याने त्यांना उपचारासाठी नगरच्या सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांनी दिलेल्या जबाबावरुन नगर तालुका पोलीसांनी बापू एकनाथ हराळ व ज्ञानदेव उत्तम कुसळकर यांच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राऊत करत आहेत.

अहमदनगर (प्रतिनिधी)-बनावट चलन आणि दस्तावेज तयार करून जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या कामासाठी डांबराचे एकच चलन अनेक कामांना दाखवून लाखो रुपयांची आर्थिक लूट केल्याचे प्रकरण जिल्हा परिषदेत उजेडात आले आहे. हा प्रकार एकाच कंत्राटदाराने केला असून अन्य कंत्राटदार आणि कामांमध्येही असा प्रकार झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने अन्य सर्वच कंत्राटदार आणि कामे तपासण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्हा परिषदेतील डांबर घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त आहे.जिल्हा परिषदेत श्रीरामपूर येथील ठेकेदार जुनेद शेख याने बनावट दस्तावेज आणि चलनाच्या आधारे सरकारची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार अशोक मुंडे यांनी केली होती. या तक्रारीच्या आधारे जिल्हा परिषद प्रशासनाने तपासणी केल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. यात संबंधित ठेकदाराने केलेल्या संगमनेरच्या कामात 229.65 आणि जिल्हा परिषदेकडील कामात 44.64 मेट्रिक टन अशी 274.29 मेट्रिक टनाची तफावत दिसत आहे.
शेख यांनी वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामात एकाच डांबर खरेदीच्या चलनाचा वापर करून 60 ते 65 लाख रुपयांची शासनाची फसवणूक केली असल्याचा ठपका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक चौकशी समितीने ठेवला आहे. शेख याने संगमनेर बांधकाम विभागांतर्गत हरेगाव-उंदिरगाव-नाऊर रस्ता, खंडाळा-श्रीरामपूर-नेवासा रस्ता, भामाठाण ते माळवडगाव रस्ता, टाकळीभान ते मुठेवडगाव रस्ता, वळदगाव-निपाणी-वडगाव-टाकळीभान-घोगरगाव रस्ता, खंडाळा-श्रीरामपूर -नेवासा रस्ता हे बिल पाच वेळा, तर जिल्हा परिषदेच्या बांधकाम उत्तर विभागातील गोंडेगाव-उंदिरगाव-खानापूर रस्ता, मालुंजा मातापूर रस्ता, उंबरगाव-मातापूर-कारेगाव-भोकर-मुठेवडगाव- ब्राम्हणगाव- खैरीनिमगाव ते जाफ्राबाद रस्ता, माळेगाव-सराला ते जिल्हा परिषद हद्द रस्ता, गोंडेगाव-उंदीरगाव ते खानापूर रस्ता, टाकळीभान-गुजरवाडी-वांगी रस्ता, मालुंजा-मातापूर ते राष्ट्रीय मार्ग रस्ता, उंबरगाव-मातापूर-कारेगाव-भोकर-मुठेवडगाव-ब्राम्हणगाव-खैरी निमगाव ते जाफ्रारबाद रस्ता, माळेवाडी-सराला ते जिल्हा परिषद हद्द रस्ता, मालुंजा-मातापूर ते राष्ट्रीय मार्ग रस्ता, उंबरगाव-मातापूर-कारेगाव-भोकर-मुठेवडगाव-ब्राम्हणगाव खैरीनिमगाव ते जाफ्राबाद रस्ता, निमगाव खैरी ते दिघी मार्ग, खंडाळा-उक्कलगाव रस्ता, गोगलगाव ते पिंप्री निर्मळ-वाकडी ते चितळी रस्ता, उंदीरगाव ते भालदंड रस्ता, ब्राम्हणगाव वेताळ ते शिरसगाव रस्ता, पुणतांबा ते पुरणगाव रस्ता, खंडाळा येथील मंदिर रस्ता, गोंधवणी-रांजणी शिवरस्ता, उंबरगाव-अशोकनगर कारखान्याकडील भोसले वस्ती रस्ता, गोगलगाव ते पिंप्री निर्मळ-वाकडी रस्ता, शिरसगाव ते ब्राम्हणगाव रस्ता आदी रस्त्यांची कामे केली असून या कामांमध्ये डांबराच्या बनावट चलनाचा वापर केला असल्याचा ठपका ठेवला आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने निविदा समितीला विश्वासात न घेता परस्पर 8 कोटी 18 लाखांच्या बंधार्‍यांच्या कामाला मान्यता दिली आहे. हा प्रकार गेल्या महिन्यांत दै. सार्वमतने ‘जिल्हा परिषदेत ई-टेंडर घोटाळा’ या आशयाचे वृत्त छापल्यानंतर समोर आला. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यावेळी बांधकाम विभाग आणि लघु पाटबंधारे विभागातील 10 लाखांच्या आतील कामे तपासण्याचा निर्णय घेतल्यानंतर 140 बंधार्‍यांच्या कामांना परस्पर मान्यता दिल्याचे समोर आले आहे.जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात उत्तर आणि दक्षिण असे स्वतंत्र विभाग आहेत. यासह लघु पाटबंधारे हा देखील स्वतंत्र विभाग आहे. या विभागाला रस्त्यांची अथवा बंधार्‍यांची कामे करताना 19 ऑक्टोबर 2011 च्या शासन निर्णयानुसार कामे मंजूर करण्यापूर्वी निविदा समितीची (टेंडर कमिटी) मान्यता घेणे आवश्यक असते. या समितीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचा मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांचा समावेश असतो. संबंधित विभागाचा कार्यालयीन प्रमुख हा समितीचा सचिव असतो. या समितीची बैठक होऊन त्यात कामांना मंजुरी देण्यात येतात आणि त्यानंतर संबंधित कामे करण्यात येतात.लघू पाटबंधारे विभागाने शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब न करता परस्पर दहा लाख रुपयांच्या आतील कामे मंजूर केली आहेत. हा प्रकार अनेक दिवसांपासून लपून होता. मात्र, गत महिन्यांत 20 सप्टेंबरला सार्वमतने जिल्हा परिषदेतील ई-निविदा प्रक्रियेत घोटाळा असल्याचे वृत्त दिले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने बांधकाम आणि लघु पाटबंधारे विभागाच्या ई-निविदा तपासल्या असता 140 कामांच्या निविदा परस्पर मंजूर केल्याचे उघड झाले. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने लघू पाटबंधारे विभागाला मंगळवारी नोटीस दिली असून दोन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी त्यावेळी लघु पाटबंधारे विभागाला नोटीस देण्यात आली होती. त्या नोटीसला उत्तर देतांना संबंधित विभागाने जलयुक्त शिवार योजना ही मुख्यमंत्री यांची महत्वकांक्षी योजना असून कामे जलद पद्धतीने व्हावीत, तसेच तोंडी सूचना आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी खातेप्रमुखांना निविदा नस्ती मार्किंग केल्यामुळे या 140 कामांना कार्यारंभ आदेश दिला असल्याचे मान्य केले आहे.

गावठी कट्टा, तलवार व लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने या भागात काहीकाळ तणावाची परिस्थिती 
वडाळा महादेव (वार्ताहार)-श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव परिसरात कबड्डी खेळात झालेल्या किरकोळ वादावरून टाकळीभान, पाचेगाव व श्रीरामपूरमधील तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. यामध्ये गावठी कट्टा, तलवार व लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने या भागात काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. रात्री उशिरापर्यंत या तरुणांचा शोध पोलीस घेत होते. नेवासा रोडवरील कॉलेज परिसरामध्ये काल दुपारी साडेतीनच्या दरम्यान दोन गटांमध्ये किरकोळ वादातून दगडफेक झाली.त्यानंतर काही तरुण श्रीरामपूरच्या दिशेने मोटारसायकलवरून निघाले व त्यांचा पाठलाग करत वडाळा महादेव येथील नेवासा रोडवरील मंगल कार्यालय परिसरात आले. यावेळी पुन्हा तरुणांमध्ये दगडफेक सुरू झाली. याचवेळी श्रीरामपूरच्या दिशेने मोटारसायकलवर काही तरुण हत्यारासह आल्याने त्यांनी गावठी कट्ट्यामधून दोन ते तीन फैरी झाडल्या तसेच तलवारीचा धाक दाखवत परिसरात दहशत निर्माण करत तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.या घटने दरम्यान परिसरामध्ये असलेल्या व्यावसायिकांना काय चाललय काहीच कळेना त्यामुळे येथील एक तरूण घराबाहेर येऊन उभा राहिला. त्यावेळी त्याच्या दिशेने दोन तरुण तलवारी व गावठी कट्टा घेऊन मागे लागल्याने त्याने घरी जाऊन दरवाजा बंद करून घेतला. यावेळी त्याच्या दरवाजावर तलवारीने वार केले व पळताना त्याच्या दिशेने फायर केला. सुदैवाने हा तरुण घरात असल्याने तो बचावला.यावेळी काही तरुण रोडवरील हार्डवेअर दुकानांमधून विक्रीस ठेवलेले दांडके घेऊन पळाले. घटनेच्या दरम्यान अग्रवाल मंगल कार्यालयासमोर निवडणूक बंदोबस्तासाठी शासकीय अधिकारी तसेच पोलीस अधिकारी नेमणुकीस असल्याने गावठी पिस्तुलामधून निघालेला आवाज ऐकल्याने त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. दंगा करणार्‍या तरुणांनी पोलिसांना पाहताच मिळेल तिकडे रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला. काही तरुण मोटारसायकली सोडून अशोकनगरच्या दिशेने पळाले व बाकीचे कार्यालयाच्या बाजूने पळाले.घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे पथकासह तात्काळ दाखल होत घटनेतील तरुणांची शोधमोहीम करण्यासाठी पथक नेमून टाकळीभान तसेच अशोकनगर परिसर येथे रवाना केले. या तरुणांच्या मोटारसायकली रोडवर उभ्या असल्याने त्यावरून तरुणांची माहिती घेण्यात आली.वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, सुनील दिघे, पंकज गोसावी, पानसंबळ, लोंढे, अमोल गायकवाड, जोसेफ साळवी, शैलेंद्र सगळगिळे, पो.ना. रवींद्र उघडे, गृहरक्षक दलाचे देसाई, आर. बी. कदम आदी पोलीस कर्मचारी तरुणांचा शोध घेत आहेत.याबाबत काही तरुणांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर नगरपालिकेच्या भुयारी गटारच्या 14 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणाचा तपास शहर पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखा, अहमदनगरकडे वर्ग करण्यात आला आहे.मोरया फाउंडेशनचे केतन खोरे यांनी गेल्या अडीच वर्षांपासून भुयारी गटार प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने सात जणांविरुद्ध तब्बल 14 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यांनतर जिल्हा सत्र न्यायालय, श्रीरामपूरला सहा जणांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून याचिका दाखल केली, मात्र न्यायालयाने सर्वांच्या याचिका फेटाळल्या.दरम्यान, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, आर्थिक अपहराची उकल करणे महत्त्वाचे असल्याने सदर तपास श्रीरामपूर शहर पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास होण्यासाठी फिर्यादी केतन खोरे यांना संबंधित कागदपत्रांसह पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर येथे बोलाविण्यात आले होते. खोरे यांनी भुयारीचा तपास करणार्‍या पोलीस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांची भेट घेत सविस्तर माहिती दिल्याचे समजते


बुलडाणा - 15 ऑक्टोबर
विदर्भची पंढरी म्हणून ओळखल्या जाणारे बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन महाराज संस्थानचे पर्यटनस्थळ "आनंदसागर" बंद पाडण्यात भाजपा सरकार कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप गजानन महाराज संस्थान विश्वास्थांच्या कुटुंबातील सदस्य व खामगांव मतदार संघातुन काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी केला आहे.
     
शेगावात देश भरातून हजारो-लाखो भाविक येतात.गजानन महाराज यांच्या मंदिरावर नतमस्तक होवून भक्तगण शहरा नजीक संस्थान कडून बाँधण्यात आलेले पर्यटन स्थळ "आनंदसागर" ला आवर्जून भेट देतात.मागील काही माहिन्यापासून संस्थान कडून "आनंदसागर" बंद कण्यात आले आहे.हे पर्यटनस्थळ का बंद कण्यात आले? या विषयावर संस्थान किंवा विश्वस्त मंडळ किंवा त्यांच्या परिवाराकडून कधीच भाष्य कण्यात आले नाही,मात्र ऐका सभेत याचे कारण समोर आले आहे.ते असे की,
गजानन महाराज संस्थान परिवारातील सदस्य ज्ञानेश्वर पाटील हे खामगाव विधानसभा मतदार संघातुन काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत.ते आपल्या मतदार संघातील माटरगाव येथे प्रचार सभेत बोलत होते, संत गजानन महाराज संस्थान कडून साकारलेले "आनंदसागर" हे देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी आकर्षक पर्यटन स्थळ बनले होते, मात्र हे पर्यटन स्थळ आता बंद पडले आहे याला कारणीभूत भाजपा सरकार असल्याचा खळबळजनक आरोप ज्ञानेश्वर पाटील यांनी भरसभेत केला आहे व या भाषणाचा वीडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. शेगांवचे पर्यटन स्थळ "आनंदसागर" बंद पडल्याने वेगवेगळ्या व्यावसायिकांवर याचा परिणाम झालाय पर्यटकांचा,भाविकांचा हिरमोड झालाय.खामगांव मतदार संघातील माटरगांवला लागून जळगाव जामोद मतदार संघातील काही गावे आहेत व भाजपाला मतदान करू नये यासाठी हा गौप्यस्फोट कण्यात आला. गेल्या पंधरा वर्षांपासून जळगाव जामोद मतदार संघात डॉ.संजय कुटे आमदार आहेत व नव्याने विस्तारित राज्याचे मंत्री मंडळात डॉ. कुटे यांना कामगार मंत्री पद देण्यात आले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget