बुलडाणा - 15 ऑक्टोबर
विदर्भची पंढरी म्हणून ओळखल्या जाणारे बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन महाराज संस्थानचे पर्यटनस्थळ "आनंदसागर" बंद पाडण्यात भाजपा सरकार कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप गजानन महाराज संस्थान विश्वास्थांच्या कुटुंबातील सदस्य व खामगांव मतदार संघातुन काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी केला आहे.
गजानन महाराज संस्थान परिवारातील सदस्य ज्ञानेश्वर पाटील हे खामगाव विधानसभा मतदार संघातुन काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत.ते आपल्या मतदार संघातील माटरगाव येथे प्रचार सभेत बोलत होते, संत गजानन महाराज संस्थान कडून साकारलेले "आनंदसागर" हे देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी आकर्षक पर्यटन स्थळ बनले होते, मात्र हे पर्यटन स्थळ आता बंद पडले आहे याला कारणीभूत भाजपा सरकार असल्याचा खळबळजनक आरोप ज्ञानेश्वर पाटील यांनी भरसभेत केला आहे व या भाषणाचा वीडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. शेगांवचे पर्यटन स्थळ "आनंदसागर" बंद पडल्याने वेगवेगळ्या व्यावसायिकांवर याचा परिणाम झालाय पर्यटकांचा,भाविकांचा हिरमोड झालाय.खामगांव मतदार संघातील माटरगांवला लागून जळगाव जामोद मतदार संघातील काही गावे आहेत व भाजपाला मतदान करू नये यासाठी हा गौप्यस्फोट कण्यात आला. गेल्या पंधरा वर्षांपासून जळगाव जामोद मतदार संघात डॉ.संजय कुटे आमदार आहेत व नव्याने विस्तारित राज्याचे मंत्री मंडळात डॉ. कुटे यांना कामगार मंत्री पद देण्यात आले आहे.
Post a Comment