Latest Post

येवला - प्रतिनिधी
जिल्हा परिषद अहमदनगर यांचा 2019 जिल्हा शिक्षक पुरस्कार पाटोदा गावातील श्री सैंदाने ज्ञानेश्वर पांडुरंग प्राथमिक शिक्षक शहापूर यांना मिळाला .तरी गावातील ग्रामस्थांनी शिक्षकांनी व स्वाध्यायींनी सरांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.गावातील जेष्ठ नागरिक व सेवानिवृत्त शिक्षक श्री मुसाभाई शेख हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री शंकर निकम सावरगाव तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राजू वाघ यांनी केले.अध्यक्ष श्री मुसाभाई शेख म्हणाले की आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवन अवघड काम असते पण सैंदाने सरांनी इतक्या कमी वयात हे काम केले म्हणून माझ्यासाठी व गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे.श्री गाजरे म्हणाले की सैदाणे 18 वर्षाचे असल्यापासूनच स्वाध्यायाचे काम करतात त्यामुळे त्यांच्यात त्या क्वालिटी आहेतच फक्त ते अजून क्षमतेने काम करण्यासाठी देवाने त्यांना हे प्रेमपत्र दिले आहे.मा श्री सुहास आहेर म्हणाले की पुरस्कार हे जीवनात उत्साहाने काम करण्यासाठी मिळतो चांगले काम केले व करावे म्हणून मिळतात.तिथे आलेलेल्या पुंडलिक पिंपरकर,राजू कोंढरे,सौ सोनवणे योगिता सरला बोऱ्हाडे सुनीता बोरणारे निर्मला बोऱ्हाडे नवनाथ तनपुरे दिनेश जगताप यांनी आपले विचार त्या ठिकाणी मांडले.सौ योगिता ताई आपल्या भाषणात म्हणाल्या की आपल्यातील एक शिक्षक अशा प्रकारचा पुरस्कार मिळवतो ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्या गावासाठी व आपल्यासाठी ही दिशादर्शक बाब आहे त्यांनी असे पुढे जाऊ राज्य व राष्ट्रपती पुरस्कार मिळवावेत अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.सदर कार्यक्रमाचे आयोजन पुण्यनगरीचे पत्रकार श्री जाकीर भाई शेख यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी  श्री शिंदे, अशोक बटवल ,पोपट आहेर,  बोरसे आदी सरांवर प्रेम करणाऱ्या व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी आभार श्री.पुंडलिक पिंपरकर यांनी मानले.सर्वांना भेळ सोनपापडी चहा असा नाष्टा श्री राजू वाघ व त्यांच्या मित्रमंडळींच्या वतीने देण्यात आला.श्री सैंदाने सरांनी गावातील डोहवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना या निमित्ताने लेख साहित्य घेण्यासाठी 1001 रु वर्गणी दिली.

अहमदनगर : कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा ज्याच्या खांद्यावर आहे तोच पोलीस मिरवणुकीत थेट तडीपारीची कारवाई झालेल्या गुंडासोबत मनसोक्त नाचून त्याच्यावर नोटा ओवाळून पैशांचे प्रदर्शन करतो़ याबाबतचा व्हायरल झालेला व्हिडिओ सध्या शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे़ व्हायरल व्हिडिओत कोतवाली ठाण्यातील साध्या वेशातील पोलीस दादा आणि तडीपारीची कारवाई झालेला गुंड रशिद डंडा स्पष्टपणे दिसत आहेत़ कोतवाली आणि तेथील डिबी ब्रँच दोन वर्षांपासून चर्चेचा विषय ठरत आहे़ गुन्ह्यांचे प्रकटीकरण करण्यापेक्षा येथील कर्मचारी नको त्या भानगडीच जास्त करतात़ आता तर डिबीच्या एका दादाने कहरच केला़ मागील आठवड्यात शहरातून मोहरम विसर्जन मिरवणूक निघाली होती़ ही मिरवणूक येथील जुने कोर्ट परिसरात आली तेव्हा या दादाला चांगलाच ताल चढला़ इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी डोळ्यात तेल घालून मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते़ तेव्हा हे साहेब डंडासोबत नाचण्यात दंग होते़ नाचतानाचता हातात नोटांचा बंडल घेऊन डंडाच्या डोक्यावरून नोटा ओवाळून वाटत होता़ रशिद डंडा याच्यावर कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत़ नगर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने त्याचा प्रस्ताव तयार करून पाठविल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याला शहरातून तडीपार केले आहे़ सध्या तो जामिनावर शहरात आला आहे़ मिरवणुकीत डंडा याला पाहून डिबीच्या दादाचे चांगलेच पे्रम उतू गेले अन् कुठलेच भान न ठेवत थेट डान्सच केला़ आता वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर काय निर्णय घेतात़ याची प्रतीक्षा नगर शहरातील जनतेला आहे़

श्रीरामपुर शहरातील गोंधवनी परिसरात आज पोलीस निरीक्षक श्री हरी बहिरट यांनी सशस्त्र पोलीस बंदोबस्तासह दारू आड्यांवर छापे टाकले दुपारी उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरू होती अनेक वेळा कारवाई करूनही गोंधवनी परिसरात दारू भटट्या सुरू असल्याची गुप्त बातमी मिळाल्यावरून एस पी ईशु सिंधू अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे डी वाय एस पी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी छापा टाकून गावठी दारूच्या भट्या उद्ध्वस्त केल्या टीपाडे फोडून ड्रम तोडून सुमारे पाच ते सहा हजार लिटर गावठी दारूचे कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले या ठिकाणी काहीजणांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी सुरू होती मोठ्या पोलीस गाड्या व बंदोबस्त गोंधवनी परिसरात असल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरू होती अवैध दारूधांवर धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक श्री हरी बहीरट यांनी सांगितले.

सावळीविहीर (वार्ताहर) राहाता तालुक्यातील सावळी विहीर येथील सोमैयानगरमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली असून यात कुर्‍हाडी व दांडक्याचा वापर केल्याने दोन्ही गटांचे अनेकजण जखमी झाले आहेत. शिर्डी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 11 जणांना अटक करण्यात आली आहे.याबाबत फिर्यादी वैशाली विजय भोसले रा. सोमैयानगर, सावळीविहीर बुद्रुक हिने सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला असून फिर्यादीत म्हटले आहे की, रस्त्यावर काट्या टाकण्याच्या कारणावरून व मागील भांडणाच्या कारणावरून आरोपी शाहरूख मलंग सय्यद, सौरभ विलास लिहिणार, राजेंद्र सुखदेव म्हस्के, अजय राजेंद्र म्हस्के, राहुल राजेंद्र म्हस्के, राहुल महिपत लिहिणार, विलास नाथा लिहिणार रा. सर्व सोमैयानगर यांनी शिवीगाळ, दमदाटी,जिवे मारण्याची धमकी देऊन लाठ्या काठ्या, कुर्‍हाडीने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. त्यामुळे त्याच्याविरोधात भादंवि 326, 323, 504, 506 रासे. कलम 143, 147, 148, 149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसर्‍या गटाकडून फिर्यादी राजेंद्र सुखदेव म्हस्के याने आरोपी विजय सर्जेराव भोसले, गौरव विजय भोसले, वैशाली विजय भोसले, कांतिलाल भोसले, सुप्रिया भोसले, सिंधू भोसले यांच्याविरोधात गुरनं 898/19 भा.दं.विधान 326, 323, 504, 506 ,राईट सेक्शन कलम.143, 147, 148, 149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रावसाहेब शिंदे करीत असून दोन्ही गटांकडील 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

पहूर, ता . जामनेर :-सद् रक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलीस दलाचे ब्रीद शिरसावंद्य मानून मुलं पळविणाऱ्या पंधरा जणांच्या टोळीचा पर्दाफाश करीत सहा चिमुकल्यांची सुटका केल्याबद्दल खानदेश कन्या पोलीस निरीक्षक अपर्णा जोशी यांना मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या हस्ते प्रसंशापत्र देवून आज पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या विशेष सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.पहूर पेठ (ता. जामनेर ) येथील मुळ रहिवासी असलेल्या अपर्णा जोशी या सध्या चेंबूर येथे गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षकपदी कार्यरत आहेत. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित त्यांनी अनेक गुन्ह्यांचा पर्दाफाश केला असून नुकतेच त्यांनी लहान मुलं पळवून त्यांची विक्री करणाऱ्या १५ जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या अन् त्यांच्या ताब्यातील ६ बालकांना मुक्त केले. त्यांच्या या प्रेरक यशोगाथेबद्दल काल सोमवारी राजधानी मुंबई येथे पोलीस आयुक्तालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात अपर्णा जोशी यांना पोलीस आयुक्त संजय बर्वे, मुंबई यांच्याहस्ते गौरविण्यात आले. त्यांच्या या शौर्याचे पहूर गावांत सर्वत्र कौतूक होत असून त्यांनी गावकऱ्यांपुढे एक आदर्श उभा केला आहे.

राहुरी प्रतिनिधी,
तूम्ही जर जनतेची काम केली असती तर कर्डिलेचा राहुरी तालुक्यात उदय झालाच नसता, तूम्ही शिक्षण घेऊन येवढ्या पदव्या घेतल्या मग राहुरीतील संस्था कशा बंद पडल्या ते सांगा. शनि देवावर  हात ठेवुन सागंतो की मी खोटे बोलत नाही. शहरातील माता भगिनींना पंधरा पंधरा दिवस पाणि मिळत नव्हते, त्यामुळे वेळोवेळी पाठपुरावा करून आम्ही २९ कोटी रुपयांची पाणि योजना मंजूर करून आणली. असे प्रतिपादन आमदार शिवाजी कर्डीले यांनी दिनांक १६ सप्टेंबर रोजी शहरात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी केले.
       यावेळी व्यासपीठावर राहुरी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते दादापाटील सोनवणे, रावसाहेब चाचा तनपूरे, शिवाजी सागर, विक्रम तांबे, सुरसिंग पवार, अक्षय तनपूरे, अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, विक्रम भूजाडी, सुभाष वराळे, अण्णासाहेब शेटे, योगेश देशमुख, सौ. राजश्री तनपूरे, सौ. ज्योती पोपळघट, सौ. नमिता शेटे, सौ. सुवर्णा खैरे, सौ. संगिता जाधव आदि उपस्थित होते. कर्डीले पूढे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून नगरपरिषदमध्ये तनपूरेंची सत्ता होती. त्यांनी राहुरी शहराचा कोणता विकास केला. असे म्हणत त्यांनी तनपूरेंवर कडाडून टिका केली.
         वाढीव पाणी पुरवठा योजनेला शासनाची तत्वतः मान्यता मिळवून दिल्या बद्दल आमदार शिवाजी कर्डिले यांचा जाहीर सत्कार समारंभ तसेच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहमदनगर यांच्या वतीने मुद्रा लोन योजने अंतर्गत साई महिला बचत गट राहुरीस ४८ लक्ष रूपयांचे कर्ज वाटप कार्यक्रम सोमवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी नवीपेठ येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादापाटील सोनवणे हे होते. यावेळी ते म्हणाले कि, इतकी वर्षे सत्ता असून तूम्ही काय केले. जनतेला तूमच्या कामाची पावती द्या. राहुरी शहराला २९ कोटी रुपयांची पाणि योजना मंजूर झाली. त्याचे सर्व श्रेय आमदार शिवाजी कर्डीले यांचे आहे. असे सागून त्यांनी तनपूरेंवर तोफ डागली.
        यावेळी रावसाहेब चाचा तनपूरे यांनी सडाडून टिका करत, प्रत्येक टेंडरमध्ये सत्ताधारी कमिशन खाण्याचे काम करत आहे. असा आरोप चाचा तनपूरे यांनी केला आहे. तसेच डाॅ. धनंजय मेहेत्रे, प्रकाश पारख, डाॅ. संजय भळगट, शहाजी ठाकूर, शिवाजी सागर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.
          याप्रसंगी सोन्याबापू जगधने, विजय डौले, नितीन तनपूरे, गणेश खैरे, अतिक बागवान, बिलाल शेख, बचत गट समन्वयक सुनंदा दहातोंडे, अण्णासाहेब शेटे, विजय डौले, अक्षय तनपुरे, योगेश देशमुख, सुभाष गायकवाड, सुकूमार पवार, आदिंसह अनेक नागरीक उपस्थित होते. तर यावेळी सुदेश सुबंध व कहार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राम परसैया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पोपळघट यांनी केले तर आभार गणेश खैरे यांनी मानले.

पत्रकार अजय बोराडे यांच्या घरी
आज धानोरा येथे माझ्या घरी सिल्लोड उपनगराध्यक्ष समीर भैय्या यांनी सदिच्छा भेट दिली सोबत सभापती अर्जुन गाढे नंदकिशोर सहारे राजु गौर मनोज झंवर. डॉ राज भगवान बोराडे हरिदास काकडे  बाबुराव काकडे शिवाजी काकडे गजानन काकडे  नानासाहेब काकडे रामकिसन काकडे उपस्थित होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget