राहुरी शहर वासीयांन कडून मा.शिवाजीराव कर्डिले साहेबांचा जाहीर सत्कार

राहुरी प्रतिनिधी,
तूम्ही जर जनतेची काम केली असती तर कर्डिलेचा राहुरी तालुक्यात उदय झालाच नसता, तूम्ही शिक्षण घेऊन येवढ्या पदव्या घेतल्या मग राहुरीतील संस्था कशा बंद पडल्या ते सांगा. शनि देवावर  हात ठेवुन सागंतो की मी खोटे बोलत नाही. शहरातील माता भगिनींना पंधरा पंधरा दिवस पाणि मिळत नव्हते, त्यामुळे वेळोवेळी पाठपुरावा करून आम्ही २९ कोटी रुपयांची पाणि योजना मंजूर करून आणली. असे प्रतिपादन आमदार शिवाजी कर्डीले यांनी दिनांक १६ सप्टेंबर रोजी शहरात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी केले.
       यावेळी व्यासपीठावर राहुरी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते दादापाटील सोनवणे, रावसाहेब चाचा तनपूरे, शिवाजी सागर, विक्रम तांबे, सुरसिंग पवार, अक्षय तनपूरे, अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, विक्रम भूजाडी, सुभाष वराळे, अण्णासाहेब शेटे, योगेश देशमुख, सौ. राजश्री तनपूरे, सौ. ज्योती पोपळघट, सौ. नमिता शेटे, सौ. सुवर्णा खैरे, सौ. संगिता जाधव आदि उपस्थित होते. कर्डीले पूढे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून नगरपरिषदमध्ये तनपूरेंची सत्ता होती. त्यांनी राहुरी शहराचा कोणता विकास केला. असे म्हणत त्यांनी तनपूरेंवर कडाडून टिका केली.
         वाढीव पाणी पुरवठा योजनेला शासनाची तत्वतः मान्यता मिळवून दिल्या बद्दल आमदार शिवाजी कर्डिले यांचा जाहीर सत्कार समारंभ तसेच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहमदनगर यांच्या वतीने मुद्रा लोन योजने अंतर्गत साई महिला बचत गट राहुरीस ४८ लक्ष रूपयांचे कर्ज वाटप कार्यक्रम सोमवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी नवीपेठ येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादापाटील सोनवणे हे होते. यावेळी ते म्हणाले कि, इतकी वर्षे सत्ता असून तूम्ही काय केले. जनतेला तूमच्या कामाची पावती द्या. राहुरी शहराला २९ कोटी रुपयांची पाणि योजना मंजूर झाली. त्याचे सर्व श्रेय आमदार शिवाजी कर्डीले यांचे आहे. असे सागून त्यांनी तनपूरेंवर तोफ डागली.
        यावेळी रावसाहेब चाचा तनपूरे यांनी सडाडून टिका करत, प्रत्येक टेंडरमध्ये सत्ताधारी कमिशन खाण्याचे काम करत आहे. असा आरोप चाचा तनपूरे यांनी केला आहे. तसेच डाॅ. धनंजय मेहेत्रे, प्रकाश पारख, डाॅ. संजय भळगट, शहाजी ठाकूर, शिवाजी सागर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.
          याप्रसंगी सोन्याबापू जगधने, विजय डौले, नितीन तनपूरे, गणेश खैरे, अतिक बागवान, बिलाल शेख, बचत गट समन्वयक सुनंदा दहातोंडे, अण्णासाहेब शेटे, विजय डौले, अक्षय तनपुरे, योगेश देशमुख, सुभाष गायकवाड, सुकूमार पवार, आदिंसह अनेक नागरीक उपस्थित होते. तर यावेळी सुदेश सुबंध व कहार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राम परसैया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पोपळघट यांनी केले तर आभार गणेश खैरे यांनी मानले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget