सावळीविहीर येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी 11 जणांना केली अटक.

सावळीविहीर (वार्ताहर) राहाता तालुक्यातील सावळी विहीर येथील सोमैयानगरमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली असून यात कुर्‍हाडी व दांडक्याचा वापर केल्याने दोन्ही गटांचे अनेकजण जखमी झाले आहेत. शिर्डी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 11 जणांना अटक करण्यात आली आहे.याबाबत फिर्यादी वैशाली विजय भोसले रा. सोमैयानगर, सावळीविहीर बुद्रुक हिने सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला असून फिर्यादीत म्हटले आहे की, रस्त्यावर काट्या टाकण्याच्या कारणावरून व मागील भांडणाच्या कारणावरून आरोपी शाहरूख मलंग सय्यद, सौरभ विलास लिहिणार, राजेंद्र सुखदेव म्हस्के, अजय राजेंद्र म्हस्के, राहुल राजेंद्र म्हस्के, राहुल महिपत लिहिणार, विलास नाथा लिहिणार रा. सर्व सोमैयानगर यांनी शिवीगाळ, दमदाटी,जिवे मारण्याची धमकी देऊन लाठ्या काठ्या, कुर्‍हाडीने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. त्यामुळे त्याच्याविरोधात भादंवि 326, 323, 504, 506 रासे. कलम 143, 147, 148, 149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसर्‍या गटाकडून फिर्यादी राजेंद्र सुखदेव म्हस्के याने आरोपी विजय सर्जेराव भोसले, गौरव विजय भोसले, वैशाली विजय भोसले, कांतिलाल भोसले, सुप्रिया भोसले, सिंधू भोसले यांच्याविरोधात गुरनं 898/19 भा.दं.विधान 326, 323, 504, 506 ,राईट सेक्शन कलम.143, 147, 148, 149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रावसाहेब शिंदे करीत असून दोन्ही गटांकडील 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget