
श्रीरामपूर : कुरणपुरातील रात्री 8.45 वाजेची घटना, आज रास्तारोको फत्याबाद (वार्ताहर)-श्रीरामपूर तालुक्याच्या विविध भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असतानाच, कुरणपूर येथे 10 वर्षीय मुलाला बिबट्याने पळवून नेऊन नरडीचा घोट घेतला. त्यात या मुलाचा करूण अंत झाला. दर्शन चद्रकांत देठे या दुर्दैवी मृत मुलाचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री 8.45 घडली. या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा तसेच वनअधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सहा गावातील संतप्त ग्रामस्थांनी कुरणपूर-फत्याबादमध्ये रास्तारोको करण्याचा इशारा दिला आहे.कुरणपूर येथील दर्शन चंद्रकांत देठे हा मुलगा जवळच वस्तीवर गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे तेथे आरतीसाठी गेलेला होता. आरती झाल्यानंतर रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास चुलती व वस्तीवरील काही मुलां व महिलांसह तो घरी परतत होता. रस्त्याच्या कडेला नामदेव नामदेव थोरात या शेतकर्याच्या उसाच्या शेतातून बिबट्या अचानक बाहेर आला नी कुणाला काही कळण्याचा आत त्याने दर्शन याच्यावर हल्ला केला व त्याला शेतामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे फूट ओढत नेले. अश्विनी अश्विनी देठे हिने आरडाओरड केली. आरतीसाठी जमलेल्या तरुणांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. रामेश्वर देठे, राधाकृष्ण देठे, संजय देठे, जयवंत देठे, अनिल देठे, सुनील देठे, मच्छिंद्र देठे, दत्तात्रय देठे, मनोज देठे, बाबासाहेब देठे, मयूर देठे, आदिनाथ देठे, विठ्ठल देठे, प्रकाश पारखे, नामदेव थोरात, भाऊसाहेब थोरात, सीताराम देठे आदींसह तरुणांनी धाव घेतली. उसामध्ये मुलाचा शोध घेऊन त्वरित प्रवरा रुग्णालयात नेले. पण रुग्णालयात पोहोचल्यानंतर तेथील डॉक्टरांनी दर्शनचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान या घटनेची माहिती कळताच कुरणपूर -फत्याबाद मधून अनेक ग्रामस्थांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.या भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूआहे. फत्याबाद, कुरणपुर, मांडवे,कडित आदी परिसरात बिबट्यांनी अनेक शेळ्या, बोकड, कुत्रे फस्त केलेले ओहत. अनेकदा ग्रामस्थांनी पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी करूनही वनविभागाने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे या मुलाचा बळी गेला. वनखात्याच्या अधिकार्यांच्या हलगर्जीपणाचा निषेधार्थ आज गुरुवारी बेलापूर -कोल्हापूर रस्त्यावर कुरणपूर, फत्याबाद येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या घटनेपूर्वी सायंकाळी 7.30 वाजता कोल्हार येथून फत्याबाद येथील उद्दयन बाबासाहेब आठरे (वय 22) व ब्रजेश दिलीप आठरे (वय 13 ) हे कोल्हार -बेलापूर रोड वर कडित खुर्द मध्ये बिबट्या आडवा गेल्याने जबर जखमी झाले. दोघांनाही प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बेलापूर-कोल्हार रोडवरील ताके वस्तीनजीक काल सायंकाळी 6च्या सुमारास एकाचवेळी 5 बिबटे निदर्शनास आल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.