बुलढाणा - 6 सप्टेंबर
बुलढाणा तालुक्यात गुरुवारी गिरडा जंगलात शंभरच्यावर कुत्रे मृतावस्थेत सापडली असून त्यांना वीष देऊन मारण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.अजिंठा पर्वत रांगेवर वसलेल्या गिरडा या गावाजवळील जंगलात हा गंभीर प्रकार उघडकिस आला आहे. यातील सर्व कुत्रे नागरी भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र एव्हड्या मोठ्या प्रमाणात कुत्री कोणी?का व कुठे मारली असेल हे प्रश्न सद्या अनुत्तरित आहे.या कृत्य मुळे जंगलातील प्राणी व नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे.
बुलढाणा शहरा पासून पश्चिम दिशेने 15 किमीच्या अंतरावर असलेल्या गिरडा या गावाजवळच्या जंगलात काल गुरुवारी 100 च्यावर कुत्री मृतावस्थेत आढळून आली.ही बाब गावातील काही लोकांनी पाहिली यामुळे गावात एकाच खळबळ उडाली.एवढ्या मोठ्या हे पाळीव प्रमाणात मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर या प्राण्यांना वीष देऊन मारण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तर त्यात कुत्र्यांच्या पिल्लांचाही समावेश आहे. हात पाय बांधलेल्या कुटीरांमध्ये काही कुत्रे जीवित असल्याचे ही निदर्शनास आले आहे.घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा केला तर जेसीबीच्या मदतीने सर्व कुत्र्यांना जमिनीत पुरुन देणार अ आहे.या जंगलातून मराठवाड़ा व खान्देशला जोड़नारा मुख्य मार्ग जातो व दररोज शेकडो वाहन या मार्गाने ये-जा करतात,ही कुत्रे मार्गाच्या बाजूला असल्याने लोकानां दुर्गंधिचा सामना करावा लागत आहे.हे कुत्रे मोठ्या शहरातील असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment