१२ वी मध्ये शिकणाऱ्या तरुणीवर धारदार शस्त्राने वार.

लासलगाव | प्रतिनिधी लासलगाव कोटमगाव रस्त्यावरील दत्तनगर येथे १२वी मध्ये शिकणाऱ्या तरुणीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना आज (ता.६) दुपारी घडली. एकतर्फी प्रेमातून आतिश ढगे या युवकाने युवतीवर प्राणघातक हल्ला करून स्वतःवरही धारदार शस्त्राने वार करून घेतले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.या बाबत मिळालेली माहिती अशी, आज दुपारी १२च्या सुमारास आतिश ढगेने मुलीच्या घरात प्रवेश करत अत्यंत निर्दयपणे धारदार शस्त्राने हाता पायावर, पोटावर, छातीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले. मुलीचा ओरडण्याचा आवाज येताच कॉलनीतील नागरिक जमा झाले. दरम्यान आतिश ढगे याने स्वतःच्या अंगावरही वार करून स्वतःला जखमी करून घेतले. या अतिशने युवतीवर अत्यंत क्रूरपणे अठरा वार केले आहेत. घरामध्ये अक्षरशः रक्ताचा सडा पडलेला दिसून आला.या युवका सोबत आणखी तीन युवक असल्याचे बोलले जात आहे. घटना घडल्यानंतर या तीनही युवकांनी तेथून पळ काढला. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी थरारक घटना भरदिवसा लासलगावमध्ये घडली असून संपूर्ण लासलगाव शहर सुन्न झाले आहे.या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना देताच लासलगाव पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. हल्ल्यात वापरण्यात आलेले धारधार शस्त्र पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, मुलीला लासलगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करून डॉक्टर मनोज आहेर यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर या मुलीला पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले. तसेच जखमी यूवकाला निफाड येथील रुग्णालयात हलविले असून त्यावर उपचार सुरू आहेत.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget