नासिक:-प्रस्तुत बातमीतील हकीकत आशिकी तक्रारदार यांना प्राधिकृत केलेल्या व्यक्तीचे अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी म्हणून दिनांक 4-9-2019 रोजी शिर्डी येथे आयोजित लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी नंबर 1 रामचंद्र रतिलाल सोनकवडे उपसंचालक वर्ग-1 अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नाशिक यांचे उपस्थितीत आरोपी नंबर 2 शिवप्रसाद मुकुंदराव काकडे विधी अधिकारी वर्ग 1 अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नाशिक राहणार वसंत विहार फ्लॅट नंबर 13 पाचवा मजला बडदेनगर शिवाजी चौक सिडको नाशिक आरोपी नंबर 3 विनायक उर्फ साचीन उत्तम्राव महाजन वय 33 वर्ष धंदा (खाजगी चालक) राहणार वसंत विहार फ्लॅट नंबर 11 चौथा मजला बडदे नगर शिवाजी चौक सिडको नाशिक (खाजगी इसम )व आरोपी नंबर 4 मच्छिंद्र मारुती गायकवाड वय 48 वर्षे धंदा नोकरी वर्ग-4 गंगाधर शास्त्री पुणे आयुर्वेद महाविद्यालय अहमदनगर राहणार शिवाजीनगर नवानागापुर एमआयडीसी अहमदनगर यांनी पंचायत समक्ष तक्रार यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करून ते लाचेची रक्कम आरोपी नंबर 1 रामचंद्र रतिलाल सोनकवडे विधी अधिकारी वर्ग अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नाशिक यांचे वतीने आरोपी नंबर 3 विनायक उर्फ साचीन उत्तमराव महाजन व आरोपी नंबर 4 मच्छिंद्र मारुती गायकवाड यांनी तक्रारदार यांच्याकडून पंचा समक्ष दिनांक 5-9-2019 रोजी 00:55 वाजता शिर्डी येथील हॉटेल साई आसरा समोर स्वीकारली असता आरोपी नंबर 1 ते 4 यांना पकडण्यात आले आहे
सदर सापळा कारवाई हे मा. सुनील कडासने,पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक ,परिक्षेत्र नाशिक व मा.निलेश सोनवणे अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर कडील पोलिस उपाधीक्षक हरीश खेडकर ,पोलीस निरीक्षक शाम पवार, पोलीस निरीक्षक दीपक करांडे पोलीस हेडकॉन्स्टेबल तन्वीर शेख पोलीस नाईक प्रशांत जाधव पो.ना. रमेश चौधरी पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश जोशी चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक रक्ताटे पोलीस नाईक विजय गंगुल, महिला पोलीस कॉन्स्टेबल राधा खेमनर ,पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र निमसे यांनी केली आहे तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर कार्यालयामार्फत सर्वसामान्य जनतेला आवाहन करण्यात येत आहे की त्यांना कोणीही लोकसेवक त्यांचे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय अहमदनगर येथे खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा त्यासाठी 10 64 हां निशुल्क टोल फ्री नंबर सुरू करण्यात आलेला आहे.
Post a Comment