Latest Post

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी १९ वर्षीय पीडिता मुंबईतील चेंबूर परिसरात राहणाऱ्या भावाकडे राहण्यासाठी गेली होती.
औरंगाबाद : मुंबईतील चेम्बूर परिसरात चार नराधमांनी  सामूहिक अत्याचार केल्यापासून अत्यवस्थ झालेल्या १९ वर्षीय पीडितेची मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज बुधवारी रात्री अखेर थांबली. येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) उपचारादरम्यान बुधवारी (२८ ऑगस्ट) रात्री ९ वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तिच्यावर महिनाभरापासून उपचार सुरू होते.  जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी १९ वर्षीय पीडिता मुंबईतील चेंबूर परिसरात राहणाºया भाऊ, भावजयीकडे  राहण्यासाठी गेली होती. ७ जुलै रोजी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते, असे घरी सांगून बाहेर पडल्यानंतर  चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. तेव्हापासून ती आजारी पडली. तिचा रक्तस्त्राव थांबत नव्हता. मात्र नराधमांनी दिलेल्या धमक्यांमुळे भेदरलेल्या पीडितेने अत्याचाराची माहिती नातेवाईकांना अथवा पोलिसांना सांगितली नव्हती. दरम्यान, तिची प्रकृती अधिक खालावल्याने तिच्या वडिलांनी तिला २५ जुलै रोजी औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले तेव्हा तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब तिच्या आई-बाबांना सांगितली. यानंतर त्यांनी तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली तेव्हा रडतच तिने आपबिती सांगितली.यानंतर तिच्या वडिलांनी पीडितेवर चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंदविली. मुंबईच्या चेंबूर परिसरातील घटना असल्याने पोलिसांनी तक्रार नोंदवून घेऊन पुढील कारवाईसाठी हा गुन्हा चुनाभट्टी पोलीस ठाण्यांकडे वर्ग केला. घाटीतील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले तेव्हा तिला असाध्य आजाराने ग्रासल्याचे त्यांना समजले. २५ जुलैपासून सुरू असलेल्या उपचारांना पीडितेचे शरीर प्रतिसाद देत नव्हते. डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनाही यश आले नाही आणि तिची मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अखेर थांबली.  अत्याचारामुळे प्रचंड मानसिक धक्काचार नराधमांनी केलेल्या सामुहिक अत्याचारामुळे पीडितेला शारिरीक वेदनेसह प्रचंड मानसिक धक्का बसला होता. या धक्क्यातून तिला सावरता आले नाही. अत्याचारामुळे झालेल्या रक्तस्त्रावाने तिची प्रकृती अधिक नाजूक अवस्थेत गेली होती. गेल्या महिन्याभरापासून या पिडीतेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तिला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती

बुलडाणा - 28 ऑगष्ट
आपली पत्नीचा खून केल्याचे सिद्ध झालेल्या आरोपीला कोर्टाने आजीवन कारावासची शिक्षा दिली होती सदर आरोपी जेल मधून पैरोलवर बाहेर आला व परत गेलाच नाही,त्याचा मोठ्या शिताफिने शोध लावून बुलडाणा एलसीबीने जळगाव खा. च्या एमआईडीसी भागातुन अटक केली आहे.
     बुलडाणा पोलीस अधीक्षक दिलीप पाटिल भुजबळ व अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांच्या आदेशानव्ये बुलडाणा एलसीबीचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील नंदुरा पोलीस स्टेशन  येथील अप. क्र.3063/13 कलम 224 मधील 6 वर्षा पासुन अभिवचन रजेवरुन फरार असलेल्या आरोपी नामे निवृत्ति दगडू भगेवार वय 32 रा.डिगी
याला जळगाव येथून अटक करण्यात आले आहे.सदर आरोपी हा आपले नाव बदलून
 हनुमान नगर, जळगाव खानदेश येथे राहत होता. यास मोठ्या शितफिने अटक करण्यात आले आहे.आरोपीला पकडून पुढील कार्यवाही साठी नांदुरा पोलीस च्या ताब्यात देण्यात आले आहे.आरोपीने आपली पत्नीची हत्या केली होती.सदरची कारवाही बुलडाणा एलसीबीचे रघुनाथ जाधव,नदीम शेख,श्रीकांत चिंचोले,सरिता वकोडे,राजु आडवे व कैलास ठोम्बरे यांचा सहभाग होता. या टीमची उत्तम कामगिरी बद्दल
पोलीस अधीक्षक बुलढाणा यानी सदर टीम ला 10 हजार रु रिवार्ड दिला आहे.

बुलढाणा - 27 अगस्त
खेत स्थित गोठे में मौजूद भेड के बच्चों पर हिंस्र प्राणी के हमले में 14 बच्चों की मौत हो गई है जिसमे भेडपाल का नुकसान हो गया है.ये घटना कल 26 अगस्त को दिन में दोपहर के समय घटी है जिस से अतराफ़ के किसान मे भय का माहौल है.
       बुलढाणा तहसील अंतर्गत के ग्राम देवलघाट निवासी भेडपाल नामदेव आनंदा सुसर का अफजलपुर वाडी परिक्षेत्र में खेत है.इसी खेत मे अपनी बकरियां और भेडों को रखते है.इन पशुओं की सुरक्षा के लिए बड़े मैदान में टीन लगाए गए है ताकि जंगली जानवरों से भेड बकरियां सुरक्षित रहे सके.कल 26 अगस्त को सभी भेड बकरियां जंगल में गई हुई थी उस समय भेड के बच्चे खेत मे ही थे.अनुमान लगाया जा रहा है कि,दोपहर के समय हिंस्र प्राणी लकड़बग्घा सुरक्षा कवच लांघ कर अंदर घुस आया और उसने 14 भेड के बच्चों को मार दिया.शाम को ये घटना उजागर हुई.इस की सूचना वनविभाग को दिए जाने के बाद आज वनपाल राहुल चौहान ने घटनास्थल पर पहोंच कर पंचनामा किया.भेड़पाल का करीब 35 हज़ार का रुपये के नुकसान का अनुमान लगाया जा रहा है.

संगमनेरात महाराष्ट्र राज्य  दारू उत्पादक शुल्क ची कर्यवायी पंजाब पटालीया मध्यप्रदेश येथून  नासिक मार्गे संगमनेर करेघाटात हाॅटेल कृष्णा गार्डन सायखिंडी फाटा या ठिकानी सापळा रचून ऐक आयशर ट्रक क्रमांक mp-09 gf 3337 तुन राॅयल पटीयाला व्हिस्कीचे ऐकुन 545 बाॅक्स दारू अंदाजे किंमत  34,24,5000 व एक मारूती एसक्राॅस  कार क्रमांक mp - 09 wb 8935 असा अंदाजे किंमत 51,35',940 रूपये किमतीचा राॅयल विस्कीचा मद्य साठा व दोन आरोपी  निरीक्षक संजय परदेशी, दुय्यम निरीक्षक राजेंद्र कोकरे , पी.एस.कडभाने  व मुबंई येथील विषेश भरारी पथकाचे डी.टी.शेवाळे , अशोक तारू प्रयत्नातून तसेच एस.पी.पराग नवलकर, डिवायसपी निकम यांचे मार्गदर्शनातून गुन्हा रंजिस्टर क्रमांक 424 प्रमाणे हा गुन्हा दाखल केला. व मोहीम पार पडली यात जवान सुनिल निमसे,जवान विजय पाटोळे , तोशिफ शेख , अनिल मेंगाळ  इत्यादींचा या प्रसंगी  सहभागी होते.

दिंडोरीच्या परमोरी, लखमापूर परिसरात बिबटय़ांच्या हल्ल्यात दीड ते दोन वर्षांत तीन बालकांना जीव गमवावा लागला आहे.दिंडोरीतील लखमापूर येथील घटना बिबटय़ांचा कायमचा बंदोबस्त करावा

ग्रामीण भागात बिबटय़ाची दहशत वाढतच असून सोमवारी दुपारी दिंडोरी तालुक्यातील लखमापूर परिसरात बिबटय़ाच्या हल्ल्यात शेतात काम करणारी महिला गंभीर जखमी झाली. जिल्हा शासकीय रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू आहेत.
दिंडोरीच्या परमोरी, लखमापूर परिसरात बिबटय़ांच्या हल्ल्यात दीड ते दोन वर्षांत तीन बालकांना जीव गमवावा लागला आहे. बिबटय़ाच्या संचाराने परिसर भयग्रस्त असताना वन विभाग त्यांना जेरबंद करण्यासाठी पावले उचलत नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
लखमापूरच्या हनुमानवाडी शिवारात सोमवारी दुपारी मंगला बाळासाहेब दळवी-देशमुख या शेतात काम करत होत्या. यावेळी शेजारील उसाच्या शेतातून आलेल्या बिबटय़ाने त्यांच्यावर हल्ला चढविला. बिबटय़ाने त्यांची मानगुटीच पकडली. अकस्मात झालेल्या घटनेमुळे दळवी यांना उभे राहणे किंवा पळणे शक्य झाले नाही. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आसपासच्या शेतातील काही जणांनी धाव घेतल्यावर बिबटय़ा पसार झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. हल्ला इतका तीव्र होता की, दळवी यांच्या मानेतून मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव झाला. ग्रामस्थ, कुटुंबीयांनी त्यांना तातडीने दिंडोरीच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काही वर्षांत दिंडोरीच्या कादवा काठावरील परिसरात बिबटय़ाच्या हल्ल्याचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. दोन वर्षांत तीन लहान बालकांना बिबटय़ाच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले. काही महिन्यांपूर्वी याच परिसरात कुटुंबीय घरात भोजन करत असताना बिबटय़ाने मांजरीला पळवून नेले होते.
कादवा नदीकाठालगत उसाचे मोठे क्षेत्र आहे. हा संपूर्ण बागायती परिसर असून बिबटय़ांच्या अधिवासासाठी पोषक आहे. हल्ल्याची एखादी घटना घडली की, वन विभाग तात्पुरत्या स्वरूपात पिंजरा लावण्याची कार्यवाही करते. अनेकदा बिबटय़ा पिंजऱ्यात अडकतही नाही. काही दिवसांनी ही घटना विस्मृतीत जाते. नवीन घटना घडली, की पुन्हा तोच कित्ता गिरवला जातो, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. परिसरातील शेकडो विद्यार्थी छोटय़ा-मोठय़ा रस्त्यांवरून शाळा, तत्सम कामांसाठी ये-जा करत असतात. परिसरात आधीच भीतीचे वातावरण असताना हल्ल्याच्या घटनेमुळे त्यात आणखी भर पडली आहे. वन विभागाने बिबटय़ांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ अपघात झाला आहे. इंदापूरजवळ पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती असून सुदैवाने या अपघातातून ते थोडक्यात बचावले मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इंदापूरजवळ वरकुटे येथे आनंद शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातातून आनंद शिंदे थोडक्यात बचावले. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

बुलडाणा - 25 ऑगष्ट
भुसावळ कडून नागपूर कडे जाणाऱ्या गांधीधाम विशाखापट्टानम एक्स्प्रेस मधून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलिसांना मिळाल्यावरून भुसावळ तथा मलकापूर रेल्वे पोलिसांनी संयुक्त सापळा रचून सायंकाळी पावणे पाच वाजेच्या दरम्यान गांधीधाम विशाखापट्टनम गाडी क्रमांक  18502 ही मलकापुर रेल्वे स्थानकावर आली असता गाडीच्या एस 6 बोगीमध्ये 9,10,11 क्रमांकाच्या सिट खाली ठेवलेल्या अंदाजे 10 ते 12 बॅग मध्ये असलेली एक हजार 320 टॅगो पंच कॉटर ज्याची बाजार भावानुसार अंदाजे किंमत 55 हजार रुपयांची देशी दारू जप्त केली असून आरोपी प्रदीप जनार्धन नेतलेकर वय 43 रा.कंवर नगर, चेतनगाव हॉस्पिटल जवळ, जळगाव खान्देश यास  रेल्वे पोलीस वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे , सहायक सुरक्षा आयुक्त राजेश दीक्षित यांच्या मार्गदर्शना खाली राबविण्यात आलेल्या पथकाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक रोशन जमीर खान, पो.कॉ. भूषण पाटील सह मलकापुर आर पी एफ चे पोलीस निरीक्षक राजेश बनकर पो.उप.नी. मनोहर सीरिया,  पो.कॉ.शेख नावेद, दीपक कव्हले आदींनी धडाडीची कार्यवाही केली आहे.या घटने मुळे असे समोर येते की दारू तस्कर रेल्वेतुन दारुची अवैध वाहतूक करीत आहे.आरोपीस अटक करून मुद्देमालासह शेगाव रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती पोनी राजेश बनकर यांनी दिली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget