पैरोलवर येऊन 6 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला एलसीबीने जळगावहुन केली अटक .

बुलडाणा - 28 ऑगष्ट
आपली पत्नीचा खून केल्याचे सिद्ध झालेल्या आरोपीला कोर्टाने आजीवन कारावासची शिक्षा दिली होती सदर आरोपी जेल मधून पैरोलवर बाहेर आला व परत गेलाच नाही,त्याचा मोठ्या शिताफिने शोध लावून बुलडाणा एलसीबीने जळगाव खा. च्या एमआईडीसी भागातुन अटक केली आहे.
     बुलडाणा पोलीस अधीक्षक दिलीप पाटिल भुजबळ व अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांच्या आदेशानव्ये बुलडाणा एलसीबीचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील नंदुरा पोलीस स्टेशन  येथील अप. क्र.3063/13 कलम 224 मधील 6 वर्षा पासुन अभिवचन रजेवरुन फरार असलेल्या आरोपी नामे निवृत्ति दगडू भगेवार वय 32 रा.डिगी
याला जळगाव येथून अटक करण्यात आले आहे.सदर आरोपी हा आपले नाव बदलून
 हनुमान नगर, जळगाव खानदेश येथे राहत होता. यास मोठ्या शितफिने अटक करण्यात आले आहे.आरोपीला पकडून पुढील कार्यवाही साठी नांदुरा पोलीस च्या ताब्यात देण्यात आले आहे.आरोपीने आपली पत्नीची हत्या केली होती.सदरची कारवाही बुलडाणा एलसीबीचे रघुनाथ जाधव,नदीम शेख,श्रीकांत चिंचोले,सरिता वकोडे,राजु आडवे व कैलास ठोम्बरे यांचा सहभाग होता. या टीमची उत्तम कामगिरी बद्दल
पोलीस अधीक्षक बुलढाणा यानी सदर टीम ला 10 हजार रु रिवार्ड दिला आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget