प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ अपघात झाला आहे. इंदापूरजवळ पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती असून सुदैवाने या अपघातातून ते थोडक्यात बचावले मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इंदापूरजवळ वरकुटे येथे आनंद शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातातून आनंद शिंदे थोडक्यात बचावले. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
Post a Comment