August 2024

कोपरगाव ( गौरव डेंगळे): आई-वडिलांनंतर शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे गुरु असतात. ते विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर जगातील सर्व महत्त्वाच्या गोष्टींबद्दल ज्ञान देत असतात.विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य देखील शिक्षक करत असतात. पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना जगातील प्रत्येक घडामोडीचा ज्ञान अवगत होण्याकरिता शिक्षक कायम प्रयत्नशील असतात आणि यातूनच विद्यार्थी कक्षामध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो असे प्रतिपादन  सर्जेराव मते यांनी श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे व्यक्तिमत्व विकास व्याख्यानादरम्यान बोलताना केले.

श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवता असते. आज इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते सर्जेराव मते यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.मते यांनी आपल्या मधुर वाणीने विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा याविषयी मार्गदर्शन करताना संत तुकारामाच्या अभंगवाणीतून मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांनी मन प्रसन्न करून अभ्यास केला पाहिजे तरच आपल्याला चांगले यश मिळेल हे सांगितले त्यासाठी सर्वांनी पहाटे सकाळी लवकर उठून आळस झटकून अभ्यास करावा हे सांगितले तसेच परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडवताना सुरुवातीला सोपा प्रश्न सोडवावा व नंतर बाकीचे प्रश्न सोडवावेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी व्याख्याते मते यांचे शाळेच्या वतीने प्राचार्य के एल वाकचौरे यांनी स्वागत केले. 

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी अक्षदा ढवळे हिने केले. 

मते यांनी अगदी गमतीदार पद्धतीने व्यक्तिमत्व विकास या विषयावर आपले मुद्दे मांडून विद्यार्थ्यांची उत्सुकता शेवटपर्यंत उत्साही ठेवली.

कोपरगाव (गौरव डेंगळे) : नुकत्याच पॅरिस येथे ऑलिंपिक स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत १ रोप्य ५ कास्य पदक पटकावली. यामध्ये नीरज चोप्राने भालाफेक मध्ये रोप्य , तर मनु भाकर, सरबजीत सिंग, स्वप्नील कुसळे,अमन शेरावत तर भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक पटकावले.हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग सह वरील पाच खेळाडूंचे खडू चित्र श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे चित्रकार श्री मंगेश गायकवाड पाटील यांनी रेखाटले.७८ व्या स्वातंत्र्यदिनी पदक विजेत्या खेळाडूंचे रेखाटलेले चित्र कोपरगाव मध्ये प्रमुख आकर्षण ठरले. प्रत्येक जण या पदक विजेत्या खेळाडूंचे रेखाटलेल्या चित्राबरोबर सेल्फी व फोटो घेऊ लागला.माध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाले की पदक विजेते सर्व खेळाडू ग्रामीण भागातले असून युवा विद्यार्थ्यांनी या खेळाकडून प्रेरणा घेऊन मैदानावर मेहनत करून आपल्या राज्याचे व देशाचे नाव उज्वल करावे, जेणेकरून आगामी काळामध्ये आपल्यापैकीही कोणी विद्यार्थी राज्याकडून व देशाकडून खेळताना पदक जिंकेल व मला त्यांचा फोटो काढण्याची संधी मिळेल. पदक विजेते खेळाडू म्हणजे भारताचा गौरव आहे व या खेळाडूंचा छोटासा गौरव मी माझ्या चित्राच्या माध्यमातून करत आहे असे ते पुढे म्हणाले. सुंदर असे रेखाटलेले चित्रांचे कौतुक शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे, उप प्राचार्या शुभांगी अमृतकर,सर्व सुपरवायझर प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे,नैथिलीन फर्नांडिस व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

कोपरगाव (गौरव डेंगळे) : आजच्या युगामध्ये सर्वजण आपल्या स्वतःचा स्वार्थ व हितासाठीच लढत आहे.देवाने मनुष्य जीवाला सर्व गोष्टी दिलेल्या असताना देखील मनुष्य दुसऱ्याच्या मदतीला धावताना देखील विचार करायला लागला आहे.पण शारदा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे यांनी एक उपक्रम हाती घेतला.या उपक्रमामध्ये लायन्स क्लब संचलित मूकबधिर विद्यालयाला शाळेच्या इयत्ता नववी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली व या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मूकबधिर विद्यालयांमध्ये या विद्यार्थ्यांचं दिनचर्या शारदा शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवली. यामध्ये त्यांच्या मूक बधिर संकेत खुणा,चिन्हाची भाषा हे कसे मूक बधिर विद्यार्थ्यांना शिकवले जाते याचा देखील शाळेतील विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. हेच नव्हे तर या भेटीतून शाळेतील विद्यार्थ्यांना या मूकबधिर विद्यार्थ्यांप्रती आपुलकी वाटली व त्यांना काहीतरी आपण भेट दिली पाहिजे असे सर्वांच्या मनात आले. मनातच नाही तर या विद्यार्थ्यांनी तसेच शाळेच्या शिक्षकांनी या मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस व क्रीडा साहित्य भेट दिले.१५ ऑगस्ट पूर्वी दिलेल्या हे साहित्य बघितल्यानंतर या मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य वाकचौरे म्हणाले की समाजातील प्रत्येकाने मूकबधिर विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घ्यावी.या मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे असला पाहिजे.सर्वांनीच एक दुसऱ्यांना मदत केलीच पाहिजे. आम्ही केलेली ही सुरुवात असून आम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या इयत्तेचे वर्ग क्षेत्रभेटीसाठी आपल्याकडे घेऊन येणार असे ते पुढे म्हणाले.यावेळी मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक गोलवड, गायकवाड,टिक्कल,डुकरे,पाचोरे,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे,क्रीडाध्यक्ष धनंजय देवकर, क्षेत्रभेट प्रमुख विशाल आल्हाट

आदी उपस्थित होते.

कोपरगाव (गौरव डेंगळे): जनसन्मान यात्रेदरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार कोपरगाव येथे आले असताना श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे कलाशिक्षक मंगेश गायकवाड यांनी दादांना चार्कॉल पेंटिंग भेट दिली.यावेळी दादांनी गायकवाड यांना प्रश्न विचारला की ही पेंटिंग नक्की माझ्यासाठीच का? यावेळी मंचावर हशा पिकला.

गायकवाड यांनी भेट दिलेली पेंटिंग ही एका तासात चार्कॉलच्या साह्याने बनवली.पेंटिंग उघडली असता मंचावरील सर्व उपस्थित दादांचे चित्र बघून भारावून गेले. दादांनी चित्रकार गायकवाड यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी खासदार सुनिल तटकरे,आमदार आशुतोषदादा काळे,कोपरगावचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अध्यक्ष श्री धनंजय देवकर,संगीत शिक्षक दिग्विजय भोरे आदी उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी श्री हरिहर केशव गोविंद भगवानांच्या जलाभिषेकासाठी पुणतांबा येथुन गंगेचे पाणी घेवुन आलेल्या कावडीचे बेलापुर ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने पारंपारिक वाद्याच्या जयघोषात जल्लोषात स्वागत करण्यात आले. बेलापुरचे ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंद भगवान यांना श्रावणातील दुसऱ्या सोमवारी पुणतांबा येथुन पवित्र गंगेचे जल आणुन श्री  हरिहर केशव गोविंद भगवानांचा अभिषेक करण्याची परंपरा आहे. या ही वर्षी गावातील तरुण गंगाजल आणण्यासाठी पुणतांबा येथे गेले होते .तेथुन जल घेवुन पायी चालत पहाटे साडेचार वाजता ते बेलापुरातील विजय स्तंभाजवळ पोहोचले .बाजार सामितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे,पत्रकार देविदास देसाई, विष्णूपंत डावरे, तंटामूक्ती अध्यक्ष बाळासाहेब दाणी,विशाल आंबेकर,राधेशाम आंबीलवादे राजेंद्र राशिनकर,प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले आदिनी कावडीचे स्वागत केले.त्यानंतर बँण्ड पथकाच्या जयघोषात श्री हरिहरकेशव गोविंद मंदिरापर्यत मिरवणूक काढण्यात आली.गावातील महीला भगीनींनी जागोजागी सडा रांगोळी काढल्या तसेच पवित्र जल घेवुन आलेल्या कावडी धारकांची आरती करुन जल पुजन करण्यात आले.त्यानंतर पवित्र गंगेच्या जलाने भगवान श्री हरिहर केशव गोवींदाना अभिषेक घालण्यात आला.त्यानंतर महाआरती करण्यात आली.बऱ्याच वर्षानंतर अशा प्रकारे जल घेवुन आलेल्या युवकांचे स्वागत ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आल्याचे पाहुन गंगेचे जल घेवुन आलेल्या तरुणांचा उत्साह वाढला होता.

श्रीरामपूर(गौरव डेंगळे): कोपरगांवमध्ये भारत माता की जय,वंदे मातरम, सायकल रॅलीने शहर दुमदुमले.घरोघरी तिरंगा फडकवण्याच्या मोहिमेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सायकल रॅली काढली.

७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या उत्साही सायकलपटूंनी त्यांच्या डॅशबोर्डवर तिरंगा फडकवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक ते श्री शारदा स्कूल पर्यंत तिरंगा सायकल रॅली काढण्यात आली.या रॅलीमध्ये शाळेतील १०५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या प्रदर्शनाला प्रोत्साहन दिले.सायकल रॅलीमुळे आज कोपरगाव नगरी हे तिरंगामै झालेली दिसून आली.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कौशल विकास योजना ४. ० प्रायोजित स्किल हब इन कॉलेजेस या योजनेअंतर्गत सीनियर ब्युटी थेरपिस्ट या कोर्स अंतर्गत प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात आयोजीत फॅशन व मॉडेलिंग शो स्पर्धेत एम. कॉम. ची विद्यार्थिनी कू. आयुर्षा ज्ञानेश्वर गवले ही सर्वप्रथम येऊन तिला मिस् सीडीजे २०२४-२५ हा किताब देऊन गौरविण्यात आले.

येथील रयत शिक्षण संस्थेच्या चंद्ररुप डाकले महाविद्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. त्यात विजेत्या ठरलेल्या कु. आयुर्षा  गवले हिला प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर यांच्या हस्ते मानाचा मुकुट ट्रॉफी, आणि किताब प्रदान करुन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ब्युटी एक्सपर्ट सौ. शिल्पा बोरावके, सौ. रत्नमाला धनवटे व सौ. पुनम दराडे यांनी काम पाहिले. तिला कोर्सचे समन्वयक प्रा. अर्शद शेख यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. ज्येष्ठ पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले यांची ती कन्या आहे.

स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्सचे समन्वयक प्रा. अर्शद शेख, उपप्राचार्य  डॉ. सादिक सय्यद, प्रा.सुभाष देशमुख, डॉ. संतोष घंगाळे, प्रा. विजय नागपुरे व  प्रा. सचिन कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. या सुयशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

श्रीरामपूर:-दिनांक ०४-०८-२०२४रवीवार रोजी श्रीरामपूर विधानसभाचे आमदार श्री लहुजी कानडे साहेब यांनी फातिमा हौसिंग सोसायटी वार्ड नं ०१ ईदगाह संजय रोड मधील रहिवाशाशी संवाद यात्रेच्या निमित्ताने येथील रहिवाशांशी संवाद साधुन नुकतीच  श्रीरामपूर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर - समाजसेवक - व - 🌲 झाडे लावा -  झाडे जगवा- पर्यावरणाचा समतोल राखा 🌲 या वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन चळवळीचे श्रीरामपूर शहरातील प्रणेते -पुरस्कर्ते व तसेच रमजान महिन्यातील  " इस्लाम समजून घेताना" या जागतीक प्रसिद्ध मालिका लेखनाचे लेखक व विविध स्थरातील सामाजिक चळवळीमध्ये सतत भाग घेणारं व्यक्तीमत्व डॉ .सलीम सिकंदर शेख,  बैतुशशिफा दवाखाना मिल्लतनगर श्रीरामपूर यांची निकतीच महाराष्ट्र राज्यातील " विद्रोही सांस्कृतिक साहित्यिक चळवळी "चे  श्रीरामपूर तालुका  अध्यक्ष पदी निवड झाली म्हणून आमदार श्री लहुजी कानडे साहेबांनी स्वतः हुन बोलावून  सत्कार व  सन्मान करण्यात आला.. त्यावेळी आपल्या खास भाषणात विद्रोही सांस्कृतिक साहित्यिक चळवळीच्या बाबतीत दहा मिनिटे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या बाबतीत गौरव उदगार काढून प्रशंसा केली. यावेळी  विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नुकतीच  उप- अध्यक्ष म्हणून निवड झालेले व प्रसिद्ध कवी रज्जाक शेख सर यांनी कार्यक्रमाचे आपल्या कवी मनाच्या शैलीत सूत्रसंचालन व प्रास्तावीक केलेत. 

यावेळी नगरसेवक राजेशजी आलघ, समाजसेवक रज्जाकभाई पठाण, मुख्याध्यापक हाजी जाकीर शहा सर , हाजी अल्ताफ शहा सर ,  सेंट्रल रेल्वे चे  नईमखान पठाण ,  नदीम मेमन सोडावाला , राजु पठाण,व  फातिमा हौसिंग सोसायटीतील रजा - ए- इलाही या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रजा शकूर शेख व त्यांचे विविध पदाधिकारी शोएब तांबोळी,सलमान शेख, जावेद शेख,परवेज शेख,आदिल शेख,सलमान पठाण व फातिमा हौसिंग सोसायटीतील विविध प्रतिष्ठित उपस्थितांनी ही आपल्या हस्ते ही डॉ सलीम शेख यांचा सत्कार सन्मान व कौतुक केले..

श्रीतमपूर प्रतिनिधी:-काझी समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष शफीसाहेब काझी यांचें बंधु आणि मौलाना सय्यद अकबर अली (शहर काझी) यांचें मित्र समिर साहेब काझींची नियुक्ती महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या चेअरमन पदी झाल्या बद्दल सहर्ष स्वागत व अभिनंदन करतांना शहर काझी अकबर अली, सोलापूर चे शहर काझी अमजद अली,बिड चे अध्यक्ष शफीसाहेब काझी

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget