कु. आयूर्षा गवले हिला मिस् सी.डी.जे. २०२४-२५ किताब

श्रीरामपूर (प्रतिनिधी) चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कौशल विकास योजना ४. ० प्रायोजित स्किल हब इन कॉलेजेस या योजनेअंतर्गत सीनियर ब्युटी थेरपिस्ट या कोर्स अंतर्गत प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात आयोजीत फॅशन व मॉडेलिंग शो स्पर्धेत एम. कॉम. ची विद्यार्थिनी कू. आयुर्षा ज्ञानेश्वर गवले ही सर्वप्रथम येऊन तिला मिस् सीडीजे २०२४-२५ हा किताब देऊन गौरविण्यात आले.

येथील रयत शिक्षण संस्थेच्या चंद्ररुप डाकले महाविद्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. त्यात विजेत्या ठरलेल्या कु. आयुर्षा  गवले हिला प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर यांच्या हस्ते मानाचा मुकुट ट्रॉफी, आणि किताब प्रदान करुन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ब्युटी एक्सपर्ट सौ. शिल्पा बोरावके, सौ. रत्नमाला धनवटे व सौ. पुनम दराडे यांनी काम पाहिले. तिला कोर्सचे समन्वयक प्रा. अर्शद शेख यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. ज्येष्ठ पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले यांची ती कन्या आहे.

स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्सचे समन्वयक प्रा. अर्शद शेख, उपप्राचार्य  डॉ. सादिक सय्यद, प्रा.सुभाष देशमुख, डॉ. संतोष घंगाळे, प्रा. विजय नागपुरे व  प्रा. सचिन कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. या सुयशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget