श्रीरामपूर(प्रतिनिधी): आज दि. 04/02/2022 रोजी Dysp संदीप मिटके आणि श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील साहेब हे सिद्धिविनायक हनुमान मंदिर ते मार्केट यार्ड परिसरात पेट्रोलिंग करत असताना उंडे हॉस्पिटल ते साखर कामगार हॉस्पिटल चे रोडवर एक विटकरी रंगाचा टेम्पो चोरटी वाळू वाहतूक करताना मिळून आल्याने आरोपी शेखर सुभाष जमधडे रा बेलापूर ता.श्रीरामपूर याचे ताब्यातून एक विटकरी रंगाचा टेम्पो आणि दिड ब्रास वाळू असा एकूण 4,07,500/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आरोपी विरुध्द पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गु. क्र. 72/2022 भा द वि कलम 379, पर्यावरण संरक्षण कायदा 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपुर शहर पोलिस करीत आहेत.सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. स्वाती भोर, यांचे मार्गदर्शनाखाली Dy.s.pसंदीप मिटके, तहसीलदार प्रशांत पाटील,स फौ. राजेंद्र आरोळे, पोहे का सुरेश औटी,PC नितीन शिरसाठ आदींनी केली.
Post a Comment