श्रीरामपूर तालुक्यातील दोन सराईत गुन्हेगार जेरबंद,दोघे पसार 7 लाख 65 हजाराचा मुद्देमाल हस्तगत.

श्रीरामपूर प्रतिनिधी-अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने धूमस्टाईलने ओढून मोटार सायकलवरुन पोबारा करणारी सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील दोघांना काल अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. पोलिसांनी त्यांच्याकडून 7 लाख 65 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. टोळीतील दोेघे पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओरबाडून मोटार सायकलवरुन पळून जाणार्‍या गुन्हेगारांच्या शोधाच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेने तपास सुरु केला. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील विशाल बालाजी भोसले हा त्याचे साथीदारांनी चैन स्नॅचिंग करून चोरलेले सोन्याचे दागिने श्रीरामपूर येथे सोनाराकडे मोडण्यासाठी येणार आहे, अशी खबर मिळाली. त्यानुसार सापळा लावून त्यास श्रीरामपूर येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळच ताब्यात घेतले.त्याची अंगझडती घेतली असता एका लाल रंगाच्या कापडी पिशवीत सोन्याचे दागिने व दोन सोन्याच्या लगड आढळल्या. त्याबाबत अधिक चौकशी केली असता त्याने सदरचे सोने श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील संदीप दादाहरी काळे, नाशिक जिल्ह्यातील पळसे येथील लहू बबलु काळे व श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील योगेश सिताराम पाटेकर यांचे असल्याचे सांगीतले. अहमदनगर शहर, संगमनेर व नाशिक येथे महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून चोरून आणलेले सोने असल्याचेही त्याने कबुल केले. दागिने मोडीसाठी घेऊन जात असल्याचे विशाल भोसले याने पोलिसांना सांगितले.अहमदनगर जिल्हा व नाशिक जिल्ह्यातील गुन्हे अभिलेख तपासले असता आरोपींवर एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. या टोळीनेच हे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यात भिंगार, कोतवाली, संगमनेर तालुका, संगमनेर शहर, श्रीरामपूर तालुका, नाशिक शहर पोलीस आयुक्तालय, आडगाव, नाशिक आदी ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.टोळीचा सुत्रधार व त्याच्या साथीदारांचा शोध घेत असताना संदीप दादाहरी काळे यास वडाळा महादेव परिसरात पाठलाग करून त्यास ताब्यात घेण्यात आले.विशाल बालाजी भोसले व संदीप दादाहरी काळे या दोन्ही आरोपींची चौकशी केली असता त्यांनी साथीदार लहू बबलू काळे (पसार) रा. पळसे कारखाना, ता. जि. नाशिक व योगेश सिताराम पाटेकर (पसार) रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर यांच्यासोबत मिळून हे गुन्हे केल्याचे सांगितले.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अहमदनगर अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय वेठेकर, भाऊसाहेब काळे, विश्वास बेरड, संदीप पवार, भाऊसाहेब कुरुंद, पो.ना. शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, देवेंद्र शेलार, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, रोहित यमुल, आकाश काळे, योगेश सातपुते व चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसळकर यांनी ही कामगिरी बजावली.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget