श्रीरामपूर प्रतिनिधी - घरात भांडणे झालेचे कारणावरून महिनाभरा पासुन मिसिंग असलेली मुलगी सिम कार्ड न वापरता, कुणाकडूनही हॉटस्पॉट मागुन इन्टाग्राम वापरत होती.तसेच स्वतःच अस्तित्व लपवुन फिरत होती . अल्पवयीन मुलीच्या वास्तव्याबाबत अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर यांचेकडील सायबर टीमच्या मदतीने तांत्रिक पुराव्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार तपासी अधिकारी API बोरसे सह पथक पुणे येथे गेले होते तेव्हा अल्पवयीन मुलीला पोलीस आल्याचे समजलेने घाबरून ती पोलिसांना चकमा देत प्रायव्हेट लक्झरी बसने अहमदनगर कडे निघाली आसता तपास पथकाने प्रसंगावधान राखून अहमदनगर पोलीस नियंत्रण कक्ष येथे मदत मागुन, मुलीचे फोटो व तपास पथकाचे संपर्क क्रमांक नियंत्रण कक्षाचे व्हॉटसअप ग्रुप वर पाठविले त्याप्रमाणे सर्व बस स्टॉप वर लक्झरी बस वेगवेगळ्या पोलीस स्टेशन स्टाफने चेक केल्या असता. तारकपुर बसस्थानकावर तोफखाना पोलीस स्टेशनचे नाईट राऊंड अधिकारी PSI सोळंके यांना सदर मुलगी मिळुन आलेने तिला तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले आसता त्यांनी तात्काळ तपास पथकास माहिती दिली व तेथून श्रीरामपूर शहर पोस्टे तपास पथकाने तिला ताब्यात घेऊन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे आणले व पालकांचे ताब्यात दिले. मुलीचे आईने व इतर नातेवाईकांनी श्रीरामपूर शहर पोस्टेचे मा. पोलीस निरीक्षक संजय सानप सो यांचे व तपास पथकाचे पुष्पगुच्छ देवून आभार व्यक्त केले.या कामगिरीची श्रीरामपूर शहरातील नागरिकांना कडून संपूर्ण पोलीस टीमचे कोतुक होत आहे. सदरची कामगीरी अप्पर पोलीस अधिक्षक स्वॉती भोर मॅडमयांच्या पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदशना खाली API बोरसे, पोना पंकज गोसावी, पो.शी. भारत तमनार, लेडीज कॉ. योगिता निकम, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर यांचेकडील सायबर टीमचे पोना फुरकान शेख.यांनी केली.
Post a Comment