नेवासा प्रतिनिधी - नेवासा शहरातील प्रतिष्ठीत नगरसेवक यांचा चेहरा वापरुन त्यास अश्लिल हावभाव करणारे व्हिडीओ तयार करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या आरोपीस नेवासा पोलिसांनी अटक केली.याप्रकरणी नगरसेवक अल्ताफ पठाण यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात माहीती तंत्रज्ञान अधिनियम-२००० चे कलम-६७, ६६-सी, ६७-ए सह भादवी-२९२ प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी गुन्हा तपासाच्या अनुषंगाने सुचना दिल्या होत्या.गुन्हा घडल्यापासुन आरोपी हा त्याचे अस्तित्व लपवुन फिरत होता. आरोपीच्या वास्तव्याबाबत अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर यांचेकडील सायबर टीमच्या मदतीने तांत्रिक पुराव्या अनुषंगाने निष्पन्न आरोपी निखील रविकिरण गुन्हा घडल्यापासुन आरोपी हा त्याचे अस्तित्व लपवुन फिरत होता. आरोपीच्या वास्तव्याबाबत अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर यांचेकडील सायबर टीमच्या मदतीने तांत्रिक पुराव्या अनुषंगाने निष्पन्न आरोपी निखील रविकिरण पोतदार (वय-२७ वर्षे मु. रा-नांदेड ह. रा-सदाशिव पेठ पुणे) यास फरासखाना पोलीस स्टेशन पुणे यांच्या मदतीने ताब्यात घेवुन नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली.आरोपीस न्यायालयात हजर केले असता मा न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सदरची कामगीरी पोलिस निरीक्षक निरीक्षक बाजीराव पोवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी,पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोना अशोक कुदळे, पोकॉ अंबादास गिते, केवल रजपुत, यांचेसह अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर यांचेकडील सायबर टीमचे पोना फुरकान शेख तसेच फरासखाना पोलीस स्टेशन पुणे येथील सफौ रिजवान जिनेडी, पोकॉ रुषिकेश दिघे यांनी केली आहे.
Post a Comment