बेलापूरला उद्या संतश्री ज्ञानेश्वर महाराज* *सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळा
बेलापूरः श्रीक्षेत्र बेलापूर नगरीमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्री महाराज यांचा ७५०वा जन्मोत्सव सोहळा उद्या शुक्रवार(दि.१५)रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त ज्ञानेश्वर महाराजांची भव्य शोभायात्रा तसेच भव्य दीपोत्सव कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी मिरवणूक मार्गावर महिला भगिनींनी सडा रांगोळी काढणे व प्रत्येकी पाच पणत्या तेल आणि वातीसह दिपोत्सवासाठी आणाव्यात .शोभायाञा मिरवणुकीमध्ये कलश घेऊन सहभागी व्हावे सोबत थोडासा प्रसाद आणावा असे आवाहन करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमाचे महिला भगिनींनी व ग्रामस्थांनी उपस्थित राहुन या सुवर्ण क्षणाचे साक्षिदार व्हावे.शुक्रवारी १५आॕगष्ट रोजी सायंकाळी ४ ते ६ वा. या वेळेत श्री केशव गोविंद मंदिर येथुन संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक व ६.३० वाजता भव्य दीपोत्सव होईल.तरी भाविकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समस्त वारकरी संप्रदाय व ग्रामस्थांनी केले आहे.