जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचा आराध्य मलिक प्रथम..
श्रीरामपूर (गौरव डेंगळे): स्व. माधवरावजी दगडूजी मुळे प्रतिष्ठान, अहमदनगर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय भव्य निबंध स्पर्धेत जिल्ह्यातील १५० शाळांमधील सुमारे ६,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रेरणादायी विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली लेखनकौशल्ये प्रभावीपणे सादर केली.सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव येथून इयत्ता ८ वी ते १० वी गटातील ९३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये इयत्ता ८ वीचा गुणी विद्यार्थी कुमार आराध्य संतोष मलिक याने उत्कृष्ट लेखनशैली, विषयाची सखोल मांडणी आणि भाषेवरील प्रभुत्व यांच्या जोरावर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.आराध्यचा हा विजय संपूर्ण शाळेसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.प्राचार्य के. एल. वाकचौरे,उपप्राचार्य शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे,पल्लवी ससाणे,नाथलीन फर्नांडिस तसेच शिक्षक व पालकवर्ग यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचे यश मेहनत,सातत्यपूर्ण सराव आणि मार्गदर्शकांच्या योग्य दिशादर्शनाचे फलित असल्याचे गौरवण्यात आले.
Post a Comment